Skip to main content

आम्हांला काय हवंय?

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 11/10/2012 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे सगळे शाळकरी मित्र इंजिनिअरिंग करताहेत. माझी सहामाही परिक्षा नुकतीच संपल्याने मला सध्या भरपूर वेळ असतो आणि म्हणून मी त्यांना "भेटायला येता का?' असं विचारायला फोन किंवा मेसेज करत असतो. एरवी त्यांचे क्लासेस, कॉलेज किंवा परिक्षा असल्या की ते "नाही' म्हणतात. पण मी परवापासून विचारतोय तर एकजात सगळ्यांचं एकच उत्तर - असाइनमेंट्‌स आहेत रे! खूप आहेत. सॉरी, नाही जमणार. पुढच्या आठवड्यात एक्साम्स आहेत, त्यांचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. मी विचारलं, की या असाइनमेंट्‌सचा मार्क मिळण्यापलीकडे काही उपयोग आहे का, तर सगळेच जण नाही म्हणाले.

ह्या कन्नडीगांना आलाय माज

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 11/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कन्नडीगांना आलाय माज ह्या कन्नडीगांना आलाय माज तो माज आता काढू मोडून अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ|| लई तुरूंगवास करवला रे तुम्ही काय सहन नाही केलं आम्ही मराठीसाठी किती रक्त वाहवलं ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं लई झालं आता उठला मराठी माणूस पेटून चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१|| अरे गल्या-बोळांना नावं आमची सार्‍या दुकानांना नावं आमची सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या सारी आडनावं आमची आमची बेळगाव महानगरपालीका आमची एका ठरावानं होईल का तुमची? आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन चलार
काव्यरस

मकई कोफ्ता - पालक

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 10/10/2012 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य कोफ्त्यांसाठी: १ वाटी उकडलेले मक्याचे दाणे १ वाटी किसलेले पनीर २-३ ब्रेड स्लाईस कडा कापून घेणे (व्हाईट ब्रेड चांगला लागतो ह्या कोफ्त्यांसाठी) १/२ टीस्पून जीरे १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १/४ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर ३-४ टेस्पून मैदा (तांदळाचे पिठ, ब्रेडक्रम्ब्स ही वापरू शकता) . कृ

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

मी आणि तू

लेखक रेशा यांनी मंगळवार, 09/10/2012 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी खोडकर ..माझी बडबड ..माझे प्रेम ..माझी गडबड तू खेळकर .. तुझी धडपड ..तुझा हट्ट ...तुझी तडफड.. मी हळवी .. माझी स्वप्न ...माझा रुसवा ..माझी तगमग तू जिद्दी .. तुझी नजर ..तुझा रुतबा .. तुझी झगमग.. मी चंचल.. माझे लाजणे.. माझी भीती... माझा चंद्र तू खंबीर.. तुझे हसणे.. तू धाडसी .. तुझी रात्र मी स्तब्ध.. तू लुब्ध .. माझे मौन ... तुझी प्रीती.. माझे भांडण..तुझी मिठी.. माझे हास्य.. तुझे आयुष्य

सर्वोच्च झेप

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 09/10/2012 10:55 या दिवशी प्रकाशित केले.

काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते.

खबरदारी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 09/10/2012 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून, मी थोडातरी विरघळेन, असे वाटले असेल तुला - माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस... माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना - माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे ! .
काव्यरस

वर्षा भोसले यांची आत्महत्या

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 09/10/2012 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक दुर्दैवी घटना. वर्षा भोसले ह्या प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले ह्यांच्या कन्या. त्यांनी डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली. एक उत्तम स्तंभलेखिका म्हणून त्यांचा एक मोठा चाहता वर्ग होता. पण गेले अनेक वर्षे त्यांनी ते लेखनही बंद केले होते. त्यांनी काही मोजकीच पण चांगली गाणी गायली आहेत. आशाबाईंना सिंगापूरमधे मिफ्टाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या तेव्हा त्यांच्या लेकीने हे भयंकर कृत्य केले. बहुधा आत्यंतिक नैराश्यामुळे हे झाले असावे. एका गुणी व्यक्तीचा असा अंत व्हायला नको होता.