Skip to main content

उपासाचा उपमा

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 19/10/2012 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य- २ वाट्या वरीचे तांदूळ, ४ वाट्या आधणाचे पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मध्यम बटाटा,पाउण ते १ वाटी दाण्याचे कूट, २ चमचे तूप,जिरे,मीठ,साखर,ओले खोबरे, कोथिंबिर कृती- वरीचे तांदूळ कोरडेच तांबूस भाजून घ्या. आचेवरुन खाली काढा.त्यात आधणाचे पाणी घालून साधारण अर्धा ते पाउण तास झाकून ठेवा.आता हे आचेवर ठेवायचे नाहीत.तांदूळ अधून मधून ढवळा.

' बस - डे '

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 19/10/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनेक ' डेज' ना बस ... बस... म्हणायची वेळ आली असताना, पुण्यनगरीत १ नोव्हेंबरला ' बस डे 'साजरा करण्यात येणार आहे असे कळते. या दिवशी ( च फक्त ) बहुतेक जणांनी सार्वजनीक वाहनातून ( पक्षी - पुण्याच्या शहरी बससेवेतून ) प्रवास करायचे ठरवले आहे. अनेक उद्योगपतींनी याकामी आपले बहुमुल्य योगदान ( म्हणजे फक्त पैसे का? ) दिले असल्याचे कळते. अनेक स्वयंसेवी संस्था, सकाळ समुह यांनी यात आघाडी घेतली आहे. अर्थात याचा मुख्य उद्देश काय आहे . केवळ तोट्यात चालणा-या शहरी बसेसना नवसंजीवनी देणे आहे का? का आणखी इतरही काही उद्देष्टे आहेत. पुणेकरांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी हे काथ्याकूट.

सावलीत माझ्या

लेखक ज्ञानराम यांनी शुक्रवार, 19/10/2012 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावलीत माझ्या , सुर्यही विसावला, अमावस्येला आज , चंद्र कसा डोकावला , तु नसता समीप , पाऊसही सोकावला विजेचे येता भान , मागे मग सरसावला भिजवूनी चिंब धरतीला, , तोही मग सुखावला ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.
काव्यरस

वसंततिलका

लेखक राजघराणं यांनी गुरुवार, 18/10/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : वसंततिलका (वसंत ऋतू. (Spring) त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणी त भ ज ज ग ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. वसंततिलका वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने.(माझे म्रुत्युपत्र) ही सावरकरांची कविता होय. .) कवितेचे नाव : वसंततिलका वृत्त : वसंततिलका कवितेचा विषय :वसंततिलका (Spring) वसंत ऋतू. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक.

'अल्लाह्'- 'अल्लाह्' मधील फरक

लेखक प्रदीप यांनी गुरुवार, 18/10/2012 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच तरूण मित्रमैत्रिणींच्या तोंडून नसरत फते अली खाँ ह्यांच्या 'अल्लाह् हू' विषयी ऐकले होते. सगळेच ऐकलेले केवळ कौतुकच होते, तेव्हा आज वेळ काढून मुद्द्दाम ते यूट्यूबवर पाहिले/ऐकले. हे संपूर्ण सुमारे पंचवीस मिनीटांचे सादरीकरण आहे. अगदी खरेच सांगतो-- कसेबसे शेवटपर्यंत पाहिले/ ऐकले. कारण जी स्तुति मी ऐकले होती, त्याचे कारण मला कुठेच सापडले नाही, तेव्हा 'आता काही सुंदरसे, आतून हलवणारे येईल, नंतर येईल' असे करत राहिलो. शेवट झाला आणि अत्यंत निराशाच पदरी पडली. एखाद्या गायकाने/ गायिकेचे गाणे, माझ्या मते, नुसते ऐकावे.

कोळीष्टके

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 18/10/2012 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
(विशेष सुचना: सदर जाळ्यांचे आम्ही फक्त फोटो काढलेत, याउपर, का/ कधी/ कसे/ कुठे/ कुणी/ कशाला असे प्रश्न ओरीजिनल कोळ्यास विचारावे.) 1 2 3 एकावर एक, पण छोटा बहुदा मरणार थोड्याच वेळात..

क्लाऊड ९..

लेखक गवि यांनी गुरुवार, 18/10/2012 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
क्लू नंबर वन वॉज व्हेन यू नॉक्ड ऑन माय डोअर.. क्लू नंबर टू वॉज द लुक दॅट यू वोअर.. दॅट्स व्हेन आय न्यू इट वॉज अ प्रिटी गुड साईन.. समथिंग वॉज राँग अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..
धुवांधार पाऊस पडत होता. कारच्या विंडशिल्डवरुन थळाथळा पाणी निथळत होतं आणि समोरचं काही दिसायला लागायच्या आत नव्या धारा बदबदून येत होत्या.

केरळ सहल

लेखक बंडा मामा यांनी बुधवार, 17/10/2012 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! बर्‍याच वर्षांनी आम्ही (मामा आणि मामी) देशांतर्गतच एक सहल करण्याचे ठरवतो आहोत. सध्या केरळ हा भाग निश्चित केला आहे. पूर्वी कधी पाहिलेला नसल्याने आणि सुंदर चित्रे पाहुन हा निर्णय घेतला आहे. मिपाकरांपैकी कुणी केरळ सहल केली असल्यास खालील बाबतीत मार्गदर्शन करावे म्हणून हा धागा टाकत आहे. ह्या माहितीचा फायदा इतरही केरळ जाण्यास उत्सुक लोकांना व्हवा हा उद्देश आहे. १. केरळ्ची सहल घडवणार्‍या चांगल्या ट्रॅवल कंपन्य कोणात्या? तुम्ही ट्रॅवल कंपनीमार्फत गेले असलास तुमचे अनुभव कसे अहेत? २. ट्रॅवलकंपनी शिवाय जाणार्‍यांचे अनुभव काय? ३. आमचे बजेट ५०,०००/- रुपये आहे.

राबर्ट्,खुर्शीद,नितिनभाऊ गडकरीजी

लेखक चिरोटा यांनी बुधवार, 17/10/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
'त्यागी' गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट नंतर खुर्शीद आणि आता नितिनभाउ गडकरींचा नंबर लागला आहे.पुढचा बॉम्ब गडकरींवर टाकणार आहोत हे Indian Against Corruption ने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे थोड्यावेळापूर्वी केजरीवाल ह्यांनी बॉम्ब टाकला आहे.