Skip to main content

सांग सखया.........

लेखक अनघा आपटे यांनी शुक्रवार, 26/10/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
चालताना तू थोडा थबकलास नुसताच थबकलास का दूरवर सोबत करण्याचा विचार तुझा बदललास? हाक मारताना तू अडखळलास नुसताच अडखळलास की ओठात माझेच नाव असण्याचा तुझा रिवाज तू बदललास? बोलताना तू जरासा थांबलास नुसताच थांबलास की माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा तुझा हक्कच तू विसरलास? निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास नुसताच आवंढा गिळलास की आयुष्यातून मला वजा करताना स्वत:लाच भागून मोकळा झालास? खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले? खरच संपलय कि आजही प्रीतीचे नाव घेता तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

मक्याचे आप्पे

लेखक neeta यांनी शुक्रवार, 26/10/2012 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
मक्याचे आप्पे १ वाटी कच्चे मक्याचे दाणे, एक उकडलेला बटाटा, चार पाच ब्रेड स्लाईस, आल लसूण मिरची पेस्ट, लिंबू रस एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथींबीर मक्याचे दाणे मिक्सरवर वाटून घेऊन त्यामध्ये , वरील सर्व साहित्य घालून, आप्पे पात्रात घालावे, मिश्रण पातळ नको व एकदम जाडे पण नकोए, हाताने आप्पे पात्रात घालता येईल एवढे ठेवावे. टोमेटो सोस बरोबर द्यावे, किंवा नारळाच्या चटणी बरोबर द्यावे.

अगदी सोपी कणकेची/गव्हाच्या पिठाची बिस्किटे (एगलेस व्हीट अल्मन्ड कुकीज)

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 26/10/2012 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
कुकीज बनवायचे खूप दिवसापासून मनात होते. आणि मला मैदा वापरायचा नव्हता. कणकेची बिकिटं बनवायची होती. म्हणजे केव्हाही खाता येतील, कितीही खाता येतील अशी हेल्दी आणि टेस्टी बिस्कीटं बनवायची होती :-) जनरली खाण्याच्या पदार्थात ‘हेल्दी आणि टेस्टी’ यापैकी कोणतीतरी एकच गूण असतो :-) मागे एकदा नेटवरून रेसिपी पाहून एक रेसिपी बनवली. ती बिस्किटं हेल्दी होती पण टेस्टी नव्हती. मग थोड्या अजून रेसिपी पाहून त्यात मला हवा असलेला बदल करून बनवलेली बिस्किटं खूप मस्त, टेस्टी आणि Crunchy झाली. तीच रेसिपी इथे देत आहे.

आझाद मैदानातील दंगलखोर लोकांना अभय!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 25/10/2012 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms मुंबई पोलिस आयुक्त मोठ्या गमजा करीत होते की पोलिसांवर हल्ले करणार्‍यांना आयुष्यातून उठवले जाईल वगैरे. पण जिथे हे प्रकार अमाप प्रमाणात झाले त्या आझाद मैदानातील दंगलीबद्दल संतापजनक बोटचेपेपणा दाखवत आहेत. सत्कार करण्याच्या निमित्ताने ह्या पोलादी पोलीस धुरंधरावर मुस्लिम नेत्यांनी दबाव आणला आणि त्याला हा माणूस बळी पडला असे वृत्त आहे. तेव्हा असा इस्लाम खतरेमे अशा आरोळ्या ठोकत प्रक्षोभक हिंसाचार करणार्‍या लोकांवर कुठलीही कारवाई होणार नाही असेच दिसते आहे.

स्टोरी सलील ची ...

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 25/10/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच सलीलचा फोन आला ,चांगला तासभर बोलला .मीही भारावलो ,चक्क अमेरिकेतून फोन! बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं... ३० वर्षांपूर्वीची गोष्ट .सलील ,माझ्या भावाचा एक मित्र .याचे वडील एका कारखान्यात मॅनेजर. पण स्वभाव लहरी. घरी बायको आणि एक मुलगा.पण त्या काळात सुमारे ३० हजार रुपये महिना पगार असलेली नोकरी सोडून माथेरानला हॉटेल काढायचे खूळ डोक्यात शिरले. नोकरी सोडून हॉटेल काढलेही ,पण पार्टनरने फसवल्यामुळे यांच्या हाती राहिले धुपाटणे!

घनगड आणि तेलबैला

लेखक saumitrasalunke यांनी गुरुवार, 25/10/2012 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
भेट दिलेले दुर्ग: घनगड आणि तेलबैला दिनांक: २० व २१ ऑक्टोबर २०१२ दुर्गयात्री: १. आतिश नाईक, २. किशोर सावंत, ३. सौमित्र साळुंके ------------------ लोणावळ्याच्या साधारण दक्षिणेला ३५ किलोमीटरवर घनगड स्थित आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून ७९४ मीटर असून गड पायथ्यापासून २०० मीटर उठावला आहे. १९ तारखेच्या रात्री साडे अकराच्या मुंबई (बोरीवली डेपो) – स्वारगेट एशियाडने मध्यरात्री अडीच वाजता लोणावळा डेपोत पायउतार झालो. भाम्बर्डे (बऱ्याच ब्लॉग्जमध्ये या गावाचा उल्लेख भाम्बुर्डे असा आढळला आहे) गावी जाणारी एस.टी नऊ वाजताची असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत थोडी विश्रांती घेतली.

जसपाल भट्टीना भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी गुरुवार, 25/10/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
f सामान्य माणसाना अवघड आणि चिड आणणारा विषय विनोदी अंगाने सांगणारा महान परफोर्मर. विनम्र श्रद्धांजली.

नेता की अभिनेता ?

लेखक विश्वजीत दीपक गुडधे यांनी गुरुवार, 25/10/2012 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
नेता की अभिनेता ? लई नाटकी नाटकी या देशामधला नेता मतलबापायी होतो घडीघडी अभिनेता झोपडीतल्या दीनाची त्याला येई ना कदर पण खुर्चीसाठी खातो गरीबासंगे भाकर तसे तर खुर्चीदास सदा एसीतच राहे पण मतासाठी मात्र डोईवर भार वाहे पैशांशीच देणे-घेणे विकासाला मारी लाता परि भाषणात त्यांच्या करी विकासाच्या बाता आपल्या छाताडावर उड्या मारती हे मस्त डोळ्यावरले झापड काढा, राहू नका सुस्त • विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती. ==================================

जागर

लेखक विश्वजीत दीपक गुडधे यांनी गुरुवार, 25/10/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जागर लोकांस आता जागवा पुन्हा विझल्या मशाली पेटवा पुन्हा डोक्यास टाळे लावती सदा सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा आजन्म सोसे बापुडा इथे सोशीक लोकां जागवा पुन्हा झोपून कैसे चालणार हो ? बळ आपलेही दाखवा पुन्हा संधी न येणे विश्वजित अशी संदेश माझा पोचवा पुन्हा • विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती. ==================================
काव्यरस