Skip to main content

फ्लॅश मोब डान्स

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 14/11/2012 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या मि.पा. कराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...:) मि.पा.येथे लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. या धाग्याकडे केवळ मनोरन्जनाच्या हेतूने पहावे ही अपेक्षा आहे... कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू/उद्देश नाही... फ्लॅश मोब डान्स या प्रकारा बद्दल कोणाला काही माहिती असल्यास जरुर सान्गावी. फ्लॅश मोब डान्स कळावा म्हणून खाली एक दुवा (लिन्क)देत आहे. http://www.youtube.com/watch?v=NXclwb_6LkE

नमस्कार ई दिवाळी अंक

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 14/11/2012 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! आपल्याला माहित आहेच की मराठी ईंटरनेटचा विकास करण्यासाठी नमस्कार हे ई मासिक गेले वर्षभर सुरु आहे . विविध क्षेत्रातील मान्यवरांना , जे सहसा ईंटरनेटवर लिहित नाहीत , त्यांना लिहिते करायचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातुन केला, ज्यामुळे इ वाचकाना नवनवे वैविध्यपुर्ण साहित्य वाचता येईल ,या उपक्रमात मिसळपाव. कॉम ने मोलाची साथ दिली आहे . त्यासाठी नीलकांत , प्रशांत व छोटा डॉन यांचे विशेष आभार . आता हीच भुमिका आणखी पुढे नेत आम्ही "नमस्कार ई दिवाळी अंक " आणला आहे . या अंकाचे प्रकाशन नुकतेच एबीपी माझा चे स्टार अँकर प्रसन्न जोशी यांच्या हस्ते झाले.

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

लेखक अनघा आपटे यांनी बुधवार, 14/11/2012 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
मेल बॉक्स उघडल्यावर नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते.

दिवाळीतली रांगोळी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 13/11/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 3053 public://devi.jpg 3052 public://Diwali_2013_Saarthbodh.jpg 3031 public://marathiboli.jpg 2489 public://DSC01744-003_3.JPG

सवा डॉलर चढाऊंगी (एक आध्यात्मिक दृष्टीकोन)

लेखक सूड यांनी मंगळवार, 13/11/2012 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सहज गाणं ऐकत ऐकत मला अचानक हा दृष्टांत झाला की ही लावणी नव्हेच!! ही तर एका ईश्वराच्या प्रेमात पडलेल्या कन्यकेने त्या ईश्वराला केलेली आळवणीच !! गाण्याची सुरुवात ऐकताच आपल्याला कन्यकेच्या आध्यात्मिक विचारांची जाणिव व्हायला लागते. गाण्याची सुरुवात काहीशी अशी आहे. हिंदी फिल्मों में देखा जीवन का सारा लेखा। पेडों के आगे बच्चन पेडों के पिछे रेखा॥ वरच्या ओळींमध्ये क्न्यकेला नव्वदच्या दशकात प्रसारीत होणारी रामायण ही मालिका अभिप्रेत आहे. 'हिंदी सिरीयलों मे देखा' हे मीटर मध्ये बसणार नाही म्हणून फिल्मों मे हा शब्द वापरला आहे. तर कन्यका म्हणते, या हिंदी रामायण मालिकेत जीवनाचं सारं सार आहे.

कोफ्ता करि....उपासाची

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 13/11/2012 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
Tayar Kofte Kofta Curry नमस्कार मंडळी, सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. हि दिवाळि सगळ्यांच्या सगळ्या ईच्छा / आकांक्षा सुफळ सपुर्ण करो. तर इतके दिवस मीपाचा नीयमीत वाचक होतो आणि इथे प्रकाशित होण्यार्या सर्व गोष्टींचा मनापासुन आनंद घेत होतो आणि राहिन.

झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो..................

लेखक रणजीत देशमुख यांनी मंगळवार, 13/11/2012 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाट्ते लहानपणी नककीच मी डोक्यवर पड्लो, झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........ सतत नाईलाज म्हणुन लिहाव्या लागतात असाइन्मेन्ट्स, विसराव्या लागल्या स्वत:शी केलेल्या क्मीट्मेन्ट्स.. म्रुगजळामागे धावल्यामुळे "माझ्या" आनन्दाला मुकलो, झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........ टयुटोरियल्सच्या नावाखाली आम्हाला दिला जातो मानसिक त्रास, सहन करावा लागतो कारण व्हायच असत पास.. गुलामगिरी करावी लागते सर्रास, नाहीतर शिक्शकच के टी लावतात हमखास.... माझ्या स्वप्नाला मी ह्याचमुळे हुकलो, झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........ कॉलेजच्य

डॉन

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 13/11/2012 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
दुबईच्या आलिशान हॉटेलच्या स्विमिंग पुलाच्या कठड्या वर बसून सिगारेट चे झुरके घेत तो बसला होता .संध्याकाळचा लालभडक सूर्य जसजसा अस्ताला जात होता ,तसतसा त्याला आपला २५ वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसू लागला ..... हैदराबाद मधल्या झोपडपट्टीतील ती छोटीशी खोली .पप्पा आणि मम्मी दिवसभर कामाच्या शोधात दिवसभर वणवण भटकत होते ,घरात दोन वेळच्या जेवणाची सुद्धा मुश्कील होती .तो आणि छोटी बहिण सुरीली तिथेच मातीच्या ढिगार्यात खेळत होते .तेवढ्यात तिथे एक गाडी आली .गाडीतून ३-४ माणसे उतरली आणि त्यातल्या एका गॉगलवाल्याने त्याला एक चॉकलेट दिले .दिवसभर भुकेला असल्याने त्याने पटकन ते खाल्ले

हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 13/11/2012 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ? असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर. तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा. सुरुवात स्वत:पासून करतो: --------------------------------------------------------------------------------------------------------------- सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.