Skip to main content

हायकू -

लेखक विदेश यांनी सोमवार, 19/11/2012 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
१. उत्साही माळी मोसम पावसाळी रोपटी चूप .. २. झाडाचे पान गळते अवसान पाला पसार .. ३. मेघ नभात बरसात ढंगात मोर रंगात .. .
काव्यरस

... देवाशी भांडण !

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 19/11/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
ओ माय गॉड अर्थात देवाशी भांडण एवढ्यातच 'ओह माय गॉड' पाहीला. मिसळीवरही खूप चर्चा झालेला हा चित्रपट आहे. एकाने त्याची गोष्ट मांडली आहे तर दुसर्‍याने त्या चित्रपटाच्या विषयावर लिखाण केले आहे. चर्चेला विषय मिळवून देणारा हा चित्रपट आहे हे नक्की. वरकरणी हा चित्रपट काही वेगळ्या विषयाला हात घालणारा, भाष्य करणारा वाटत असला तरी हा विषय नवा नाही. चावून चोथा झालेला हा विषय आहे त्यामुळे पिळून काढलेल्या चिपाडातून रस काढण्याचा हा प्रयत्न वाटतो. टिळेमाळा, ढोंग, बकध्यान, बुवाबाजी हे शब्द भाषेत अस्तित्वात येऊन कित्येक वर्षे होऊन गेली आहेत. विमलदांच्या 'परख' सारख्या चित्रपटातदेखील थोड्या प्रमाणात हा विषय

अभक्ष्य भक्षण => असत्य भाषण

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 17/11/2012 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17248448.cms मांसाहारी लोक खोटारडे असतात आणि बलात्कारासारखे गुन्हे मांसाहारी लोकांकडूनच जास्त घडतात असा आचरट धडा एन सी ई आर टी च्या पाठ्यपुस्तकात आढळला आहे. हा शोध कुणी आणि कसा लावला आणि तो पाठ्यपुस्तकात नेमावा हे कुण्या विद्वानाच्या भेज्यातून निघाले हे बघणे उद्बोधक ठरेल. मला वाटते भारतात ५० टक्क्याहून अधिक लोक मांसाहारी असावेत. इतक्या लोकांना खोटारडे आणि बलात्कारी ठरवणे केवळ ते अमुक एक प्रकारचे अन्न खातात म्हणून हे अगदी अचाट आहे.

ब्लाँडी (व्हाईट ब्राउनी)

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 17/11/2012 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बटर - १ कप पिठीसाखर - १/२ कप ब्राउन शुगर - १/२ कप अंडे - १ मैदा - १ कप आक्रोड - १ कप (चिरुन) चोकोचिप्स - १/२ कप बेकिंग पावडर - १/४ टिस्पुन मिठ - 1 pinch कॄती: १. मैदा व बेकिंग पावडर पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे. २. बटर वितळवुन घ्यावे. बटर गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व ब्राउन शुगर मिक्स करुन घ्यावी. ३. त्यात १ अंडे फेटुन टाकावे. हे निट मिक्स झाल्यावर त्यात मैदा, बेकिंग पावडर व मिठ टाकावे. ४. हे सर्व मिश्रण एकत्र करुन त्यात १/२ कप आक्रोड व १/४ कप चोकोचिप्स टाकुन पुन्हा एकत्र करावे. ५. बेकिंग ट्रेला सिल्व्हर फॉइल लावावी व त्यावर बटर लावावे. ६.

"जय जय सुरवरपुजित" विषयी

लेखक अस्वस्थामा यांनी शनिवार, 17/11/2012 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
अजय अतुल यांच्या एका गीत संग्रहामध्ये हे गाणे ऐकले.. अतिशय सुंदर लय आणि शब्द अगदी भारून टाकतात.. परंतु प्रयत्न करून ही याचे बोल कुठे मिळाले नाहीत. कुठलीही माहिती देखील नाही.. अजय अतुल यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी देखील याचे रचनाकार माहित नाहीत असे सांगितल्याचे आठवतेय.. तसा youtube वर एक audio सापडला.. मग बोल कसे-बसे लिहिले आहेत.. जाणकारांनी कृपया दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच अर्थदेखील सांगू शकलात तर उत्तमच.. धन्यवाद.. --- जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ । आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥ नवमी श्री भगवंतम् गणपती मति वरदम् । वरदंति मुखम् सुमुखम् सादर मे करदम् ॥ वरदम् विपदुधौतम् धौतमलम् शमलम् । शमलम् विदम् पिदतम् हत पापी शमलम् ॥ तरुणारुणरुचिरम् तरुणम् श्रीकांतम् । कांतम् कलितै कांतम् कलयेसुदुरम् ॥ करुणा वरुणा दयचरणम् दुजितरणम् शरणम् । या मोयमिरम् शरणम् द्रुतमतसुवितरणम् ॥ जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ । आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥ ---

बाळासाहेब....

लेखक उदय ४२ यांनी शुक्रवार, 16/11/2012 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तब्येतीची काळ्जी सध्या प्रत्येक मराठी माण्साला लागलेली आहे. आपणदेखील प्रार्थना करूयात

जगाच्या पाठीवर आणि आमच्या पोटावर....

लेखक वनक्या यांनी शुक्रवार, 16/11/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मला वाढत्या पोटाची भयंकर भीती वाटू लागली आहे आणि त्यापेक्षाही त्याच्यावर उगीचच सल्ले देन्यार्यांची तर जरा जास्तच...पोटा वर ( अर्थातच वाढत्या ) फुकट सल्ले देनार्याना सरकारने " पोटा " च्या कायद्या खाली अटक करावी असाच वाटू लागलय आता . " सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला,पहाटे उठून रोज पलायाला जावा " इति पितामह .." तू .... आसन करायला सुरवात कर आणि मघ बघ सकाळी केलास तर दुपारपर्यंत २ इंच पोट कमी ......८ दिवस कर पोट कुठ आणि पाठ कुठ आहे हे बघनार्याला शोधून ही सपदयाच नाही ....

कायदेविषयक अडाणी प्रश्न...(बरेच आहेत..!!)

लेखक गवि यांनी शुक्रवार, 16/11/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी काहीतरी कथा आणि गविछाप लेख लिहून मी कंटाळलो आहे. मलाही आता काथ्याकूट करायचा आहे. आणि खरंच जेन्युईन काथ्या मनात भरला आहे. शिवाय किमान वर्षभरात मी काथ्या कुटला नाही, तेव्हा खलबत्त्यावर गंज चढला आहे. तर... -अमुकअमुक न्यायालयाच्या खंडपीठाने अमुक निर्णय दिला. -न्यायाधीश अमुकतमुक यांनी ***वर कडक ताशेरे ओढले. -सुप्रीम कोर्टाने अमुक केसमधे दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार आता अमुक करता येईल. -सध्याही एका आयटेम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्त्रीने एका राजकारण्यावर बर्‍याच कोटींचा "अब्रूनुकसानीचा दावा" लावला आहे.. असं बरंच काही वाचण्यात येतं माझ्या.

केवढा चांगुलपणा असावा?

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 16/11/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुसर्‍यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुसर्‍यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.