दु:खाला गालबोट!
बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते.
एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते.
मिसळपाव