Skip to main content

पाऊस क्षण- प्रणय क्षण!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 27/11/2012 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!
काव्यरस

गाडीतल्या गप्पा

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 27/11/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी जरा लवकरच म्हणजे २:४५ ला चक्क हाफ डे घेऊन निघालो. विचार केलं ३:३० च्या आसपास कुठली तरी फास्ट लोकल मिळेल. आशेला नेहेमीच अपेक्षांचे पंख असतात नाही का? ऑफिस लोअर परळ येथे असल्याने दादरच्या गर्दीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भायखळापर्यंत जाणे परवडते. बरं, भायखळ्याला गेलं की गाडीत चढायला मिळणार हे नक्की. ती शाश्वती दादरला उभे असणारे टीसी देखील देऊ शकणार नाहीत. बऱ्यापैकी वेळ असल्या मुळे रमत गमत भायखळा स्टेशन वर पोचलो. नवरात्रीचे दिवस, रिकामा प्लाटफॉर्म, त्यामानाने खुपच कमी गर्दी होती. पुरुषांच्या प्रथम वर्गाच्या डब्याच्या इथे तर आम्ही मोजून २-३ जण पण स्त्रियांच्या डब्याजवळ गर्दी फार होती.

सचिननं काय करावं ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 27/11/2012 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच मटा मधली बातमी वाचली. सचिनचा एक निस्सीम चाहता म्हणून मनापासून वाईट वाटलं. परंतु कालाय तस्मै नमः...... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17372506.cms ही परिस्थिती आज न उद्या येणारच....तो एक खेळाडू म्हणून महान आहेच पण वयपरत्वे त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. निवृत्त होताना "का?" असे लोकांनी विचारले पाहिजे." का नाही?

चिकन जालफ्रेझी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 27/11/2012 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
Chicken Jalfrezi काल लग्नाचा वाढदिवस होता म्ह्टलं नवर्‍यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच. आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे. लग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा(?) मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.

सर्व मासेषु च उत्तम - कार्तिकाचे कौतुक

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 27/11/2012 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
|| वनस्पतीनाम् तुलसी, मासानाम् कार्तिकः प्रियः || || एकादशी तिथी नाम च क्षेत्रम् द्वारका मम || स्कंद पुराणातल्या या श्लोकात श्रीकृष्णाच्या प्रिय गोष्टींमध्ये ज्याचं नाव येतं तो सर्व महिन्यांत श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना. या महिन्यात श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात. दिवाळी, तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुण्ठ चतुर्दशी (शैव-वैष्णवांनी परस्परांच्या दैवतांना प्रणिपात करण्याचा दिवस), त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात. कार्तिक स्नानाचेही अपार महत्त्व आहे.

तू म्हणजे,,

लेखक मुरलीधर परुळेकर यांनी मंगळवार, 27/11/2012 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणजे अशी नशा ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला, की ग्लास सुद्धा होई शराब !!! तू म्हणजे अशी हट्टी की ; आधीच घाट रस्ता आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!! तू म्हणजे वैशाख वणव्यात वळवाचा पाऊस !! तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत आईस्क्रीम खायची हौस !!! तू म्हणजे काळे ढग आणि नाचणारा मोर तू म्हणजे हळूच चिमटा काढणारं खोडकर पोर तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी आणि हवासुध्दा अशी धुंद तू म्हणजे पावसची पहिली सर, आणि सुटलेला मातीचा गंध…. तू म्हणजे कागदी नाव, आणि इवलासा पाण्याचा ओहोळ, तू म्हणजे माझ्या डॊळ्यातलं पाणी आणि असंख्य आठवणींचा मोहोळ !! कधी

मनकर्णिका

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 27/11/2012 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे नाव मनकर्णिका. साताऱ्याची. अस्सल कऱ्हाडे ब्राह्मण घर. आज तिचा वाढदिवस. 19 नोव्हे. वय २९ - तेही एका युवतीचे - फार नव्हे. फारतर वय २९ असेल. म्हणजे तरुणाईच्या वसंताचा बहर. आज तिची मला आठवण येते. बहुदा दरच वर्षी. तिच्या आठवणीने उभारी येते. रक्त सळसळून उठते.उत्साह संचारतो. विषेत: मी खिन्न असतो तेव्हा.

पाटेश्वरचा गूढरम्य लेणीसमूह

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 27/11/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक ५० फक्त यांनी पूर्वीच येथे पाटेश्वरच्या अद्भूत लेणीसमूहाबद्दल लिहिलेले असल्याने पुन्हा त्यावर लिहायचा तसा विचार नव्हताच पण त्याबद्दलच जरा वेगळे काही लिहिता आले तर बघावे या उद्देशाने पाटेश्वरावर चार शब्द खरडायला बसलो. तर मी, ५० फक्त, विलासराव, किसनदेव, पिंगू आणि नाद खुळा असे ६ जण पुणे- सातारा-देगाव अशी मजल मारून एक पाटेश्वरला पोचलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवेगार वातावरण होते. पाटेश्वराच्या मुख्य मंदिरापाही जायला दीड दोन किमी पायी चालावे लागते.

सेन्टी- मेन्टी : बांधावर ....बांधातीरी....

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 26/11/2012 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
डॅड म्हणतात, आयुष्य जगणं म्हणजे बासरी वाजविण्यासारख आहे, एका बाजुने मुख-रध्रांतून शेवटचा श्वास असेपर्यंत ते फुकायचेच असते आणि दुसर्‍या बाजुला स्वर-रध्रांची उघड-झाप करावी लागते, ही स्वर-रध्रं म्हणजे मनाची कवाडे आहेत, जर सगळी सताड ऊघडी सोडशील किंवा सगळी बंद करशील तर त्यातुन निर्माण होणार संगीत एकसूरी असेल.

कंट्री क्लब चिकन

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 26/11/2012 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
कालपर्यंत कधी युरोपियन पदार्थ घरी करून बघण्याचे धाडस केले नव्हते. फारसे मसाले नसलेले पदार्थ घरी केले तर अगदीच बेचव होतील अशी अनाठायी भीती हे त्याचं कारण होतं की आळस हे सांगणं अवघड आहे. पण काल इतर सर्व कामांना आळशीपणामुळेच सुट्टी दिली आणि ही पाकृ करायला घेतली. चवीला फक्कड झाली ही नवर्‍याकडून पावती मिळाल्यामुळे इथेही देण्याचा उत्साह वाटला.