Skip to main content

बाळासाठी गिफ्ट्स

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 08/12/2012 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
सारे काही बाळासठी... माझ्या वहिनीच्या बाळासाठी या काही नेहमीच्याच बाळाच्या उपयोगाच्या गोष्टी जरा कल्पकतेने सजवल्या आहेत.मी आणि माझ्या बहिणीने या वस्तू तयार केल्या आहेत. १) बाळासाठी नेहमीच लागणारे डायपर्स- एकेक डायपर गोल गुंडाळून त्याभोवती रबर लावला. मध्ये जॉन्सन पावडरचा डबा ठेवला. त्याभोवती गोलाकार डायपरच्या गुंडाळ्या ठेवून मोठा रबर लावला. त्याभोवती अजून एक राउंड केला. केकच्या शेपमध्ये सजवले. सजावटीसाठी बाळाचीच खेळणी वापरली. २) बाळाची टोपी, मोजे, लंगोट इ.

रेसीपी सह पाटोड्यांची आमटी

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 08/12/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
वाटणासाठी-(प्रमाण 2 व्यक्ति) 3 कांदे पाव वाटी सुके खोबरे 1 गड्डा लसूण आल एक पेर मसाला- लाल तिखट आवडीप्रमाणे हळद – पाव चमचा कांदा लसूण मसाला- 2 चमचे तंदुरी किवा मटन मसाला- 2 चमचे कृती- कांदे बारीक कापून तेलावर फ्राय करावेत. सुक खोबर मिक्सरला लावून नंतर तेलात भाजून घ्यावं(यामुळे नंतर मसाला वाटताना लवकर वाटला जातो व छान पेस्ट होते.

पास्ता

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 08/12/2012 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम मिपाच्या सर्व बल्लवाचार्‍यांची माफी मागते. त्यांनी समृद्ध केलेल्या पाककृती विभागात माझी नापाक रेसीपीचा फक्त फोटो टाकते आहे म्हणून. मी पहिल्यांदाच पास्ता घरी करून बघितला खानेबल झाला होता. plz सांभाळून घ्या. a

२१ डिसेंबर

लेखक चाफा यांनी शनिवार, 08/12/2012 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोकॉपी मशीन समोर उभ्या राहिलेल्या प्रोफेसर देवधरांनी विचारांच्या भरात आकडा पंच केला 'एकवीस'. मशीनचा झूSS असा आवाज सुरू होताच ते भानावर आले, आणि त्यांना आपली चूक उमगली. हल्ली बरेचदा त्यांचं असंच व्हायचं, ते एकवीस डिसेंबरचं मनावर घेतल्यापासून. देवधरांना बहुतांशी शास्त्रज्ञ मॅड सायंटिस्ट म्हणायचे, म्हणजे देवधर खरंच वेडे वगैरे नव्हते पण पराकोटीचा आनंद आणि पराकोटीची निराशा यांच्यामधली भावना त्यांना कधी माहीतच नव्हती.

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 08/12/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या
काव्यरस

कोकणसफरीतील विसाव्याचं स्थान - 'उत्तम फार्म'

लेखक प्रास यांनी शनिवार, 08/12/2012 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
सिमेंट कॉंक्रिटच्‍या जंगलामध्‍ये राहणा-या प्रत्‍येकालाच नैसर्गिक जंगलांची एक ओढ असते. शहरापासून दूर निसर्गाच्‍या सानिध्‍यात काही काळ व्‍यतित करुन स्‍वतःसाठी नवी उर्जा मिळवून पुन्‍हा आपपल्‍या कामांना जुंपून घेणारी जनता आजकाल प्रत्‍येक शहरात आढळते. कदाचित यामुळेच काही तरुणांमध्‍ये डोगर-द-यामंधून, जंगलांमधून, नदीच्‍या खो-यांमधून फिरवणारी ट्रेकींगची आवड वाढीला लागल्‍याचे आढळून येते. असं असलं तरी अनेकांना अशा ट्रेकींग प्रकारात होणा-या श्रमाची जाणीवच हतोत्‍साही करते. अशा लोकांना निसर्गाच्‍या सानिध्‍याचं आकर्षण असतं पण त्‍यासाठी अतिरिक्‍त श्रम करणं नको असतं.

दादला न लगे मला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/12/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला दादला नलगे बाई ! (1) सत्वर पाव गे मला ! भवानिआई रोडगा वाहिन तुला ! सासरा माझा गांवीं गेला ! तिकडेच खपवी त्याला ! ! सासू माझी जाच करती! लवकर निर्दाळी तिला जाऊ माझी फडफड बोलती ! बोडकी कर ग तिला ! नणंदेचे पोर किरकिर करिते ! खरूज होऊं दे त्याला ! दादला मारून आहुती देइन ! मोकळी कर ग मला ! एका जनार्दनी सगळेचि जाऊं दे ! एकटीच राहूं दे मला (2) मोडकेसें घर तुटकेसें छप्पर देवाला देवघर नाही मला दादला नलगे बाई ! फाटकेच लुगडें तुटकीसी चोळी ! शिवाया दोरा नाही ! जोंधळ्याची भाकर आम्बाड्याची भाजी ! वर तेलाची धार नाही ! मोडका पलंग तुटकीसी नवार ! नरम बिछाना नाही ! सुरतीचे मोती गुळघाव सोने !

रात्र चांदणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 08/12/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र चांदणी ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले? मुक्या शब्दांचे गीत कधी झाले ऐकतांना कळले नाही आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली कुठे ते कळले नाही प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले कधी कळले नाही - पाषाणभेद
काव्यरस