Skip to main content

जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२

लेखक Vivek Phatak यांनी मंगळवार, 09/08/2022 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२ जंगली जयगड हा किल्ला अतिशय घनदाट वनश्रीने नटलेल्या Koyna Wild Life Sanctuary (Koyna WLS) मधे वसलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा हे किल्याचे पायथ्याचे गाव. १०-१५ घरांचे अतिशय सुंदर टुमदार गाव. प्रत्येक घरापुढे अंगण, अंगणात फणस, आंबे, पेरू आणि भरपूर फुलझाडे. नवजा हे तेच गाव जिथे गेल्या पावसाळ्यात एका दिवसात देशातील सर्वाधिक पाऊस पडला होता आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.

श्रावणही आला फिरूनी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 09/08/2022 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणही आला फिरूनी सख्या तू ही ये फिरूनी शालू हिरवा नेसूनी ओली मेंदी रेखूनी उभी ही सृष्टी अंगणी श्रावणही आला फिरूनी सख्या तू ही ये फिरूनी| पायवाट मृदगंधी भिजूनी इंद्रधनू कमान बांधूनी डोळी श्रावण सरी भरूनी श्रावणही आला फिरूनी सख्या तू ही ये फिरूनी| सरली शेतातली पेरणी फुलले ताटवे जल धारांनी पानांवर स्पर्शबिंदू गोठूनी श्रावणही आला फिरूनी सख्या तू ही ये फिरूनी| उमलेल्या बकुल फुलांनी कुठवर पहावे रुप दर्पणी गंधगीत गाऊ विरघळूनी श्रावणही आला फिरूनी सख्या तू ही ये फिरूनी|

आज मी पेढे केले

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/08/2022 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे, महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का? उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो.

आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२

लेखक Vivek Phatak यांनी सोमवार, 08/08/2022 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२ तीन वर्षापूर्वी ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात शिवथर भागातील गोप्याघाट केला होता. ह्याच भागातील घाटमाथ्या वरून कोकणात उतरणाऱ्या इतरही घाटवाटा जसे उपांड्या, मढे, आंबेनळी, शेवत्या खुणावत होत्या. त्यापैकी ह्या दोन घाटवाटा करायची संधी आमच्या ट्रेक ग्रूपमुळे मिळाली. २८ तारखेला रात्री ११.३० ला पुण्यातून निघून वेल्हा तालुक्यातील केळद गावी पोचलो तेव्हा रात्रीचे २/२.३० झाले होते. केळद हे ५००/५५० लोकवस्तीचे छोटेसे पण अतिशय टुमदार गाव.

अळूच्या वड्या आणि अळू देठांची कोशिंबीर

लेखक Bhakti यांनी रविवार, 07/08/2022 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अळुच्या वड्या बनवायलाच पाहिजेत. या वेळेस मी गुजराती पद्धतीचा अळूच्या पत्र्या असे त्याला म्हणतात अशा ही करायच्या ठरवल्या.

मामाचं पत्र

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 07/08/2022 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी) ---- विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द. ---- आरोग्य, सवयी: आरोग्य सर्वोपरी. या वयात हे ध्यानी-मनीही नसतं पण आरोग्याच्या चांगल्या सवयी आतापासूनच लावणं आवश्यक. नियमित सूर्यनमस्कार, ओंकार प्राणायाम अशा सोप्या, छोट्या गोष्टी खूप चांगला, सकारात्मक मानसिक परिणाम करतात, आत्मविश्वास द्विगुणित करतात. पण इथे महत्वाची असते ती नियमितता! चांगल्या सवयी आत्मसात करणं कठीण आणि त्या जपणं महाकठीण!

ओस का मोती

लेखक देवू यांनी रविवार, 07/08/2022 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली. हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे? रविवारचा दिवस, फोर्टमध्ये थोडीफार भटकंती करून स्टेशनवर आलो. रात्रीचे नऊ साडेनऊ झाले असतील, ठाणे लोकल बरीच रिकामी होती. मी ज्या डब्यात चढलो त्यात जेमतेम दहा बारा प्रवासी असतील. मी दारात उभा होतो.

अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापूर्वीची -१

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 06/08/2022 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
जुलै-ऑगस्ट महिना सुरू झाला की कश्मीर मधील अमरनाथ यात्रेच्या बातम्या सुरू होतात. बेचाळीस वर्षापुर्वी केलेल्या यात्रेची आठवण जरूर येते. यावर्षी जवळचे एक नातेवाईक अमरनाथ यात्रेला चालले होते. माझ्या अनुभवा बद्दल विचारत होते. अर्थात तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीची तुलनाच करू शकत नाही. आता भरपुर सुखसोई पण तरीदेखील यात्रा अजूनही कठीण आहे. यानिमित्त काही आठवणी व नातेवाईकांनी पाठवलेले आताचे त्यांच्या यात्रेचे फोटो आपल्या समोर मांडत आहे. सन ऐंशी मधे काश्मीर खोरे शांत होते, पर्यटक बिनधास्त नंदनवनात फिरू शकत होते.शहरी भागात बर्‍यापैकी सोई उपलब्ध होत्या.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 05/08/2022 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५ आधिचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ४ गोवा. सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगिज अंमलाखाली राहीलेले आणि १९६१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेले भारताच्या नकाशावरील एक छोटेसे राज्य.

पापा की परी

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 05/08/2022 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
पापा कि परी गोष्ट अगदी अलीकडली. अगदी ८१ सालातली असेल. कोकणातील गुहागर तालुक्यातील एक छोटंसं खेडं .गुहागर हुन ४/५ किमी आरे गावचा फाटा आणि त्याही पुढे दीड एक किलोमीटर खोतांच घर. अगदी आजही जिथे दिवसातून एखादीच एस टी जाते. एक घर या इथे तर दुसरं घर कमीत कमी अर्धा किमी मागे/पुढे. आसपास काय ती नारळी पोफळीची वाडी. आजही पाटाचं पाणी इथे वाहतं. वीज केव्हा असते केव्हा नाही. मोबाईल च्या रेंजची तीच कथा. रिंग गेली तरी कॉल पूर्ण होईल याची शाश्वती नाही. इथल्या खोतांच्या घरी जन्माला आल्या दोन पऱ्या. मोठी प्राजक्ता तर दुसरी मुग्धा. आई बाबांच्या लाडक्या. तेव्हा सुद्धा दोन्ही मुलीचं का ?