आता तरी मानवा सावध होशील का ?
आता तरी मानवा सावध होशील का?
मानवतेच्या धर्माला जागशील का?
चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले ।
त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले ।
ईश्वराने मग ध्यान लाविले ।
मानव रूप आकारासी आले ।
तुझ्या रूप-गुणांसी भुललास का?
आता तरी मानवा सावध होशील का?
विश्वामध्ये सर्व जीव अज्ञानी ।
म्हणुनी तुजला केले बुद्धीमानी ।
परी चाले तुझीच मनमानी ।
तुझ्या निर्मात्यास तूच न मानी ।
जन्मदात्यास तरी तू मानशील का?
आता तरी मानवा सावध होशील का?
मिसळपाव