१८८० साली पहिल्या मोशन कॅमेर्याचा शोध लागल्यापासून जगात कित्येक सिनेमे बनले असतील. विविध विषय, माणसं, प्रेम, भय, युद्ध, विनोद प्रत्येक क्षेत्रात सगळ्या भाषांमध्ये हजारो सिनेमे आले, त्यांनी आपापल्या काळात लोकांवर अधिराज्य सुद्धा केलं असेल. पण एक काल्पनिक कॅरॅक्टर, जे फक्त कादंबरी रुपाने अस्तित्वात होतं, त्याने मात्र सिनेमात आल्यापासून गेली ५० वर्षे लोकांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातलीये, तो म्हणजे जेम्स बाँड.
जेम्स बाँडचा जन्मदाता इयान फ्लेमींगला कधी स्व्प्नातसुद्धा वाटलं नसेल आपलं कारटं इतकं प्रसिद्ध होईल. आपली पहिली कथा लिहिताना त्याच्या मनात जेम्सबद्दल काही वेगळीच मतं होती.