Skip to main content

प्राकृत ते मराठी

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/02/2013 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी आपली खूप जूनी. आता दोन हजारवर्षापूर्वीची म्हणू.
मराठीला क्लासिकल भाषा म्हणून घोषित करणारा तो पठारे अहवाल हेच म्हणतोय, पण माझ्यासारखा नॉन-स्पेशलिस्ट देखील सांगू शकेल सहज की हे असे नाहीय. महाराष्ट्री प्राकृतला मराठी म्हणायचे असेल तर मग प्रश्नच मिटला. :( *एक दक्खनी कविता - कुतुबमिनार या धाग्यावरील विषयांतर झालेल्या आणि हलवलेल्या प्रतिसादांचा हा चर्चेसाठी नवा धागा : संपादक मंडळ *

उंटांची चालच तिरकी!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 10/02/2013 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनला लगाम घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ब्रेटलीचे अस्त्र काढले तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियातच धू धू धुवून सचिनने वाळत घातला होता! गेल्या तीन आठवड्यांखाली विक अ‍ॅन झी इथे झालेल्या टाटा स्टील बुद्धीबळस्पर्धेत आनंदने लेवॉन अरोनियनला ज्या जीवघेण्या पद्धतीने पिसला ते बघून मला सचिन-ब्रेटली सामन्याची आठवण न होती तरच नवल. ह्या विजयाने आनंदने भल्याभल्यांची तोंडे बंद केली. स्पर्धेत विजेता ठरलेल्या मॅग्नुस कार्लसनने देखील 'माईंड ब्लोइंग' असं या डावाचं वर्णन केलं. अरोनियन आणि आनंदमधली 'दुश्मनी' जुनी आहे. लेवॉनविरुद्ध आनंदचा स्कोअर तसा डावाच आहे.

चुकवू नयेत असे चित्रपट - डॉ. झिवागो

लेखक प्रसाद१९७१ यांनी रविवार, 10/02/2013 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बनवणे हि फार मोठी कला आहे. त्या मधे बाकी सर्व कलांचा अन्तर्भाव होतो. जसे की साहित्य, संगीत, अभिनय, production design साठी लागणारी सृजनता. ह्या सर्व बांधुन ठेवतो तो Director. Good Movies should be watched few times to understand the intricacies of film making. माझा असा अनुभव आहे की उत्तम चित्रपट पहिल्या वेळेस बघताना अचंबित करतो, नंतर काहि दिवस सतत डोक्यात रहातो. पुन्हा पुन्हा बघितला की त्यामधिल आधि miss झालेल्या गोष्टी ही जाणवतात.

शोध कवितेचा.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 10/02/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बर्‍याच दिवसांनंतर एक चांगला कार्यक्रम बघायला / ऐकायला मिळाला. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेला कार्यक्रम गर्दीने खचोखच भरला होता. आपल्या शाळैय कवितेचा आस्वाद, आंनद आणि आठवणी जागवतांना मन लहानपणात समरस होत होते.

काकड आरती

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 10/02/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
( हे अजुन एक खूप जुनं ललित (सप्टे २००८) ! आजकाल बॉल्गवरचा कचरा आवरायला लागले आहे तेव्हा असं काही जुनं पुराणं सापडतं ... ह्या वर्षी कधी नव्हे ते मुंबापुरीत थंडी पडली आहे.. थंडी म्हणजे चांगलीच थंडी ...बा.भ. बोरकरांची "माघामधली प्रभात सुंदर " ही कविता आठवावी इतकी थंडी .... त्या निमित्ताने हे आठवले ) ||काकड आरती || आज्जी पहाटे पहाटे उठायची. कार्तिक स्नान महापुण्यवान अस काही तरी म्हणायची . आम्ही साखरझोपेत असताना, ती थंडगार पाण्याने अंघोळ करायाची ..... अजुन ही आठवत आहेत ते अस्पष्ट से मन्त्र.

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 10/02/2013 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे. डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या.

विसरलेल्या सामानाला

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 10/02/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलेल्या सामानाला माझ्या ब्यागेत जागा नव्हती. उण्यापुर्‍या आठवणीनी ब्याग भरलेली होती. अथांग ओझी वाहून ती थकली होती. प्रत्येक प्रवासात नव्याने थकली होती जो भार होता मूक बिचारी सोसत होती. कोंबून; कधी मुस्काट दाबून भार मुक्याने पेलत होती. कुरकुरण्यार्‍या बिजागिर्‍या, तुटके ह्यांडल. घसटलेले कव्हर.... गर्दीतही ओळखता येत होते. सॅमसोनाईटच्या चमको गर्दीत ती एकटीच बापुडवाणी होती जुनी म्हणेल कोणी तरी ना फेकून देईल माळ्यावर आधार होईल. कोणीतरी एक दिवस अंतरंग पाहील जुन्या रद्दीला उजाळा देईल. कष्टाचे दिवस आठवून या सुखाच्या दिवसांचे समाधान अनुभवेल. तसे काही झाले नाही.

एका दिशेचा शोध....(पुस्तक परिचय)

लेखक चाणक्य यांनी रविवार, 10/02/2013 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप वासलेकर यांचे 'एका दिशेचा शोध' म्हणजे प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. भारत उद्याची महासत्ता आहे हा समज असणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव हे पुस्तक करुन देते. पण महत्त्वाची बाब म्हणजे लेखक नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर त्यांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एका सम्रुद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्यासाठी सामान्य नागरीकांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने काय करायला पाहिजे याचे व्यवस्थित विवेचन करतो. सर्वप्रथम संदीप वासलेकरांचा थोडक्यात परिचय करून देतो.

Valentine Day

लेखक NiluMP यांनी रविवार, 10/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते.