Skip to main content

विसरलेल्या सामानाला

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 10/02/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलेल्या सामानाला माझ्या ब्यागेत जागा नव्हती. उण्यापुर्‍या आठवणीनी ब्याग भरलेली होती. अथांग ओझी वाहून ती थकली होती. प्रत्येक प्रवासात नव्याने थकली होती जो भार होता मूक बिचारी सोसत होती. कोंबून; कधी मुस्काट दाबून भार मुक्याने पेलत होती. कुरकुरण्यार्‍या बिजागिर्‍या, तुटके ह्यांडल. घसटलेले कव्हर.... गर्दीतही ओळखता येत होते. सॅमसोनाईटच्या चमको गर्दीत ती एकटीच बापुडवाणी होती जुनी म्हणेल कोणी तरी ना फेकून देईल माळ्यावर आधार होईल. कोणीतरी एक दिवस अंतरंग पाहील जुन्या रद्दीला उजाळा देईल. कष्टाचे दिवस आठवून या सुखाच्या दिवसांचे समाधान अनुभवेल. तसे काही झाले नाही. माळ्यावरही जागा नव्हती भरल्या सामानासह ब्याग भंगारात गेली कागद रद्दीत गेले , कव्हरचे तुकडे झाले. ह्यांडल चिरडले ,सगळ्यांचे तुकडे झाले. एक इतिहास पुसला ;नॉस्टॅल्जिया संपला. काय फरक पडला जगाला?...... सामानाला नव्या जगाची रीत हीच. उपयोग थांबला तो संपला आई ती ब्याग होती अन रद्दी ठरले बालपण. .............. विजुभाऊ ( कुण्या अशाच रद्दीत गेलेल्या आई वडीलांसाठी ...........)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2705
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

+१ गहिवरुन आलं. माफ करा, पण कविता वाचायच्या आधी "सामानाचा" वेगळाच अर्थ काढला होता आम्ही.

नव्या जगाची रीत हीच. उपयोग थांबला तो संपला आई ती ब्याग होती अन रद्दी ठरले बालपण.
( कुण्या अशाच रद्दीत गेलेल्या आई वडीलांसाठी ...........)
:(