Skip to main content

म्येरा भारत म्हान !

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 28/02/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
जादूगार चिदंबरम यांचा दीड तासाचा खेळ संपला. दोन वरून पाच लाख पर्यंत आयकरात मुक्ती मिळेल अशी जादू दाखवायची राहूनच गेली. त्यामुळे घरी, दुकानात बजेट पहाणारे फार नाराज झाले. "एकतरी कट वाला शॉट पायजे व्हता राव ! " असे निराशेचे उदगार पिटातल्या प्रेक्षकाने काढावे तसे झाले. असो. मी माझ्या समान दोन ते पाच वाल्यांच्या दु:खात सहभागी आहे. आता खालील वार्तापत्र पहा. १. भारतात सॅलरीड लोकांपैकी ९४ टक्क्के लोक पगाराखेरीज उत्पन्न दाखवीतच नाहीत फक्त फॉर्म १६ ची कॉपी आयकर रिटर्न मधे मारतात .

राशीमेलन

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 28/02/2013 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर पूर्वी कोणी लिहिले आहे की याची मला कल्पना नाही. हा विषय थोड्या खेळकर अंगाने मांडण्याची इच्छा आहे. एकूण राशी १२ - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन एकूण ग्रह १२ - चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लूटो (राहू व केतू हे ग्रह नसून छेदबिंदू आहेत किंवा प्लूटोला ग्रह मानले जात नाही या वादात मला पडायचे नाही) स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते.

एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 28/02/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे गावभर भटकून मावळल्यावर मी घराकडे कूच केली. अरुंद जिन्यातून वर माझ्या रूमकडे जाताना आजूबाजुला दिसनार्‍या सरपटणार्‍या प्राण्यांवर एक बारीक नजर होतीच. इथे आल्यापासून जीने माझे जिने हराम केले होते ती जिन्याच्या डाव्या भिंतीवर फतकल मारून बसलेली (की झोपलेली) होतीच. तिला चुकवून उजव्या बाजूने सटकलो. कुलुप उघडून आत रूममध्ये शिरलो. रूम म्हणजे एक भलीमोठी खोली आणि तिला जोडूनच एक बाथरूम. माझ्या घरासमोरचे आंगण म्हणजेच घरमालकाचे टेरेस, या हिशोबाने हवे तर आपण त्याला टेरेस फ्लॅटही बोलू शकतो. रूमच्या पुर्वेला एक खिडकी होती जी रात्रीची मी कायम बंदच ठेवायचो.

पहिले चऱ्हाट

लेखक जयंत_अत्यंत पुणेरी यांनी गुरुवार, 28/02/2013 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कामाचा ताण असह्य झाला होता.अंतर्मनाच्या विलपॉवर नामक टॉनिकवर वावर चालू होता.(म्हणजे तो आताही तसाच आहे.against will...) बाहेरच्या जगात काय चालले आहे, हे आपल्याच जगात असणाऱ्या माणसांना कसं उमगणार?

होममेड चॉकलेट

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 28/02/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेकाची चॉकलेटच्या वड्यांची फर्माईश आली, आणि रुचिराची आठवण झाली. कमलाबाई ओगले यांच्या रुचिरातील ही चॉकलेटची क्रुती!! साहित्य: सहा चमचे कोको पावडर, अर्धी वाटी लोणी, एक सपाट वाटी दूध पावडर, दिड वाटी साखर. क्रुती: साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात दूध पावडर, कोको घावे. चांगले एकजीव करावे. त्यात लोणी घालून चांगले शिजवावे. शिजताना सारखे ढवळावे. गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटात थापून वड्या पाडाव्यात. आपल्या आवडीप्रमाणे पॅक कराव्या.

माय मराठीचे श्लोक...!! (ध्वनीफ़ित)

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 28/02/2013 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला

आठवण

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/02/2013 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
तू लाजतेस जेव्हां आठवण लाजाळूची अबोल होतेस जेव्हां आठवण अबोलीची आरक्त होतेस जेव्हां आठवण गुलाबाची मिठीत असतेस जेव्हां आठवण कमलदलाची तू नसतेस तेव्हां - साठवण निवडुंगाची ! .

दगड

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/02/2013 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
इकडून एक दगड फेकला तिकडून दगड वर्षाव आला दगडालाही भाव आहे दगडापासून भिती आहे दगडाने डोके फोडतात दगडातून देव घडवतात दगड हाताळावा तरी कसा ज्याचा त्याचा प्रश्न तसा वेळेवर फेकला- जीत आहे वेळ गेल्यावर- फजीत आहे दगडात शहाणपणा नसतो फेकणाऱ्यात नक्कीच असतो दगडांची इमारत का बांधायची दगडांची नुसती रास का रचायची दगडा दगडाची गोष्ट फळली दगड नसेल त्यालाच कळली ! .

शिकवण

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/02/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
किनारा स्तब्ध मीही स्तब्ध ! अजस्त्र लाटा लाटामागून लाटा मोठ्या लाटेत लाट लहान लहान लाटेत तिच्याहून लहान.... शेवट एकच , मोठी कोणती अन् लहान कोणती कोण करू शकणार गणती ? रुबाबदार लाट फेसाळणारी येतात परततात विचारलहरी - एकच शिकवण मिळते मनाला तू दिसणार नाहीस नंतर कुणाला ! क्षणभंगुर अस्तित्व होईल पारखे जगून घे छानसे मनासारखे ! .

मोजमापं आणि त्रुटी - १

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 28/02/2013 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
(आज भारतीय विज्ञान दिनानिमित्त मोजमापं आणि त्रुटी या विषयावर लिहितो आहे. प्रत्येकाला करून बघण्यासारखा मोजमाप करण्याचा प्रयोग आहे. त्यात सहभाग घ्यावा ही विनंती.) आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी मोजतो. मुलाला आलेला ताप थर्मोमीटरने मोजतो. डाएट करत असो वा नसो, अधूनमधून आपलं वजन मोजतो. स्वयंपाक करताना पोळ्यांसाठी कणीक मोजून घेतो. काही वेळा प्रत्यक्ष मोजत नाही, नुसताच अंदाज घेतो. म्हणजे आरशात बघून 'पोट सुटलंय आताशा' असं म्हणतात. किंवा बाहेर पडल्यापडल्या 'काय थंडी आहे' म्हणतो. हे अंदाज घेणं हेही एक प्रकारे मोजमापच असतं.