Skip to main content

पाकिस्तान एक प्रगतीशील राष्ट्र

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 22/05/2013 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाकीस्तान - पाक म्हणजे पवित्र. पाकीस्तान म्हणजे पवित्र भूमी किंवा पुण्यवंतांचा देश. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. येथील भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत होती. पण याच वेळी काही लोक हा विचार करीत होते की केवळ इंग्रजांपासून मुक्ती पुरेशी नाही तर आपल्याला भारतापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आपली प्रगती साधता येणार नाही आणि मग सुरू झाला प्रयत्न हरतर्‍हेने. विशेषतः आजच्या सीमाभागात तत्वासाठी लढणारे योद्धे लढू लागले. ध्येय ठरल्यावर मग त्या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. हेच ध्येयनिष्ठ माणसाचे प्रमुख लक्षण आहे.

ट्यूब लाईट खाणे, केसाने ट्रक ओढणे वगैरे

लेखक संचित यांनी बुधवार, 22/05/2013 20:44 या दिवशी प्रकाशित केले.

तस प्रकरण नवीन नाही. इतक्यात youtube वर विडीओ पहिला आणि विषय परत आठअला. आपण उस खात नाही तेव्हढ्या सहज पणे हा मनुष्य ट्यूब लाईट खातो हे बघा https://www.youtube.com/watch?v=vQXhpqkg8WY. आपण दाताने जिभेला चावले तर २-४ दिवस दुसर काही खाणे जमत नाही. आपल्याला फक्त नासलेले दुध पिले म्हणून फूड पोइझनिन्ग होते. पण हे असले अघोरी माणस कसे काय कोण जाणे काहीही करण्याची तयारी ठेवतात, या अवलीयांच्या पोटात काय लोखंड, अलुमिनियम वितळवणाऱ्या भटया असतात कि काय कोण जाणे? तस पाहिलं तर हे लोक काहीपण पचवण्याची ताकद ठेवतात.

बोट किंवा बस लागणे

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 22/05/2013 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील बर्याच लोकांना बोट किंवा बस लागते. म्हणजे काय होतं? बोट किंवा बस एका जागी उभी असते तेंव्हा काहीच होत नाही पण ती जेंव्हा हलू लागते तेंव्हा थोड्यावेळाने चक्कर येते. पोटात ढवळून येते आणि उलटीची भावना होते किंवा उलटी होते. हे असे का होते याचे मूळ आपल्या कानाच्या आत असते कानाच्या आत अर्ध वर्तुळाकृती नलिका, utricle आणि saccule (पिशवी) हे तीन अवयव असतात. या अर्ध वर्तुळाकृतीनलिका तीन मितीत (थ्री डाय मेन्शन) आपल्या मेंदूची परिस्थिती काय आहे याची मेंदूला सतत माहिती देत असतात.

जय परशुराम...जय वामन!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/05/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.
काव्यरस

भारतीय भोंगाशास्त्र !

लेखक ब़जरबट्टू यांनी बुधवार, 22/05/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मिपावर पहिल्यादाच लिहायचे धाडस करतोय. सर्व जेष्ठ, श्रेष्ठ जाणत्याचा कळावे लोभ असावा. विदेशवारीला भारतात आलेल्या एका जर्मन ला दिलेली ही दीक्षा आहे. म्हणजे द्यावीच लागली हो… तर मुळात हापिसच्या कामासाठी भारतात आलेला हा प्राणी. आत्ता फारिनर (त्याला काय काम सांगायचे का ?) व गोरा म्हनल्यावर काय मजा होती.राव . हिकडचे काहीही काम न करता हादडुन हाण्डी वर येणार म्हनुन सकाळी सकाळी धावायला सुरुवात करतो म्हणाला. कर बाबा म्हटले . आपल्याला तर हे काही पटत नाही. असे धावून धावून पोट कमी झाले असते तर तो रमेश पोवार असा सुजला असता का ? आणि पोहल्याने बारीक होत असते तर पाम्पलेट ला ईव्हडा भाव असता का ?

सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 22/05/2013 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला. त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे.

स्विट अँड स्पायसी चिकन विंग्स

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 22/05/2013 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चिकन विंग्स - १०-१२ आले-लसुण - बारीक चिरुन १-१ चमचा सोया सॉस - २ चमचे व्हिनेगर - १ चमचा रेड चिली सॉस - २ चमचे काळि मिरी पावडर - १ चमचा स्विट अँड स्पायसी रेड चिली सॉस - २ चमचे टोमॅटो सॉस - १ चमचा ब्राउन शुगर - १ चमचा तिळ - १ चमचा Red chilly flakes - १/२ चमचा तेल - १ चमचा कांद्याची पात सजावटीसाठी मिठ चवीनुसार कृती: १. चिकन विंग्सचे ३ तुकडेकरुन एका बाऊल मधे काढुन घ्यावेत. २. त्यात बारिक चिरलेले आले-लसुण, काळि मिरी पावडर, व्हिनेगर, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, १/२ चमचा तेल व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 21/05/2013 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
------------------------------------------------------- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड ------------------------------------------------------- आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती.

एक हरवलेली मैत्री..

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 20/05/2013 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग वैताग आहे हा पाऊस, नेमके घरातून बाहेर पडायच्या वेळी दारात हजर. जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा, पण ऐकतोय कसला. जरा कमी झाला तर निदान रिक्षास्टॅंड पर्यंत तरी जाता येईल. उगाच तेवढ्यासाठी म्हणून छत्री रेनकोट सांभाळायची झंजट नकोय. बाकी एकवेळ ते परवडेल, पण एकदा का हिची कधीपासून सांगतेय गाडी घ्या ची कॅसेट सुरू झाली की गाडी घसरलीच म्हणून समजा. उगाच मूडचा कचरा नकोय. किती दिवसांनी आज मस्त आऊटींग प्लॅन केलीय. मप्टीप्लेक्समध्ये सिनेमा, त्यानंतर मॉलमध्येच थोडीफार विंडो शॉपिंग, डोळे आणि मन भरून पावले की उदरभरणाची सोय जवळच्याच ओपन रेस्टॉरंटमध्ये.