Skip to main content

पहिला पाऊस

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 29/05/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नो चिकचिक नो झिगझिग अन दरवळणारा मातीचा वास आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला ! अंग भिजवायला पुरेसा नव्हता, मन मात्र पार न्हाऊन निघाले.. - तुमचा अभिषेक

हे खरे आहे का?

लेखक वेताळ यांनी बुधवार, 29/05/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
आजच फेबुवर ही माहिती मिळाली. साबुदाणा हा खरच उपवासाचा पदार्थ आहे का ह्यावर खुपदा चर्चा झाली आहे.त्याबद्दल आज मला फेबुवर खालील माहिती मिळाली. तर साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया खरेच जर अशी असेल तर साबुदाणा उपवासाला चालु शकतो का? साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती शेअर करावी अशी इच्छा होती म्हणून... 'साबुदाणा ' हे उपवास अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे लोकप्रिय खाद्य आहे परंतु 'साबुदाणा ' हे शाकाहारी कि मांसाहारी खाद्य...? दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सालेम परिससरात सालेम ते कोईम्बतूर मार्गावर साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत.

जैसलमेरी चने आणी खोबा रोटी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/05/2013 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
द गोल्डन सिटी जैसलमेरची ही पाककृती आपण अन्न हे पूर्णब्रह्मच्या राजस्थानी पाककृती विशेषमध्ये पाहणार आहोत :) चला तर मग राजस्थानच्या खाद्य भ्रमंतीला सुरुवात करुया. साहित्य जैसलमेरी चने: १ वाटी काळे चणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालणे.

समाधी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 29/05/2013 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळी धुंदी इथे अन् वेगळा हा बाज आहे. वेगळे हे विश्व आणी वेगळा हा साज आहे. शांत सारे हे स्वयंभू शांत इथला नाद आहे. शांतिचे संगीत म्हणूनी कोकिळाही शांत आहे. बंद होती येथ वाटा बंदिचे संगीत आहे. आज बंदी पाहिली मी मुक्त येथे गात आहे. बंदिचेही शब्द ऐसे मानसीचा साज आहे. सुप्तता अन् शांततेचा मूळचा आवाज आहे. बोलण्यासी आतुरे तो खोल आतलाच आहे. आज या ही..कारणाने मुक्त तो ही होत आहे. शांती आणी मोक्ष सारा येथ तो मिळणार आहे. सत्य शामल नम्रतेने मी इथे झुकणार आहे. आज काहि मागणे ना मुक्तिही मोक्षात आहे. मुक्तिच्या विहरात येथे समाधिही स्तब्ध आहे...
काव्यरस

किवी आणि कांगारूंच्या देशांत १४ : केर्न्सची बृहत् रोधक प्रवाळी (Great Barrier Reef) आणि जापुकाई (Tjapukai) मूलनिवासींबरोबर एक संध्याकाळ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 28/05/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

सावरकर आणि नेहरु.... दोन दिग्गजांना अभिवादन

लेखक मन१ यांनी मंगळवार, 28/05/2013 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकर आणि नेहरु. स्वतंत्र भारतातील दोन स्वतंत्र विचारसरणी. २७ मे ही नेहरुंची पुण्यतिथी. २८ मे हा सावरकरांचा जन्मदिन. दोन दिग्गजांस सादर प्रणाम. सावरकरांना नेहरुंच्या अहिंसक तत्वज्ञानामागील राजकारण समजलं असतं किंवा सावरकरांच्या तीव्र देशभक्तीची दखल नेहरुंनी घेतली असती तर........ असो. दोघे थोर. दोघांस पुनश्च अभिवादन. अंदमानला सावरकरांचा पुतळा काही वर्षांपूर्वी राम कापसे राज्यपाल असताना हटवण्यात आला होता, तो पुन्हा स्थापित व्हावा ही इच्छा. त्यांना टेररिस्ट म्हणणार्‍या काँग्रेसी माजी केंद्रिय मंत्री मणिशंकर अय्यर ह्यांना सद्बुद्धी होवो ही प्रार्थना. --मनोबा

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या १३० व्या जयंतीबद्दल त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लेखक sagarparadkar यांनी मंगळवार, 28/05/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या १३० व्या जयंतीबद्दल त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. खालील लेखाचा उल्लेख करावासा वाटला, छोट्याशा धाग्याबद्दल क्षमस्व. http://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-vinayak-damodar…

वसरीवरच कोंबड! (अर्थात आंबील)

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 28/05/2013 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
आता नाव वाचुन उगा तोंडात बोट घालु नगा सांगुन ठेवते आदीच. त्याच काय झाल? लय म्हणजे लय तापल्याती उन आजकाल. अगदी काह्यली काह्यली हुन राह्यली जीवाची. त्यातच ते कुवेतच दिपकराव त्यांची कुवत हाय म्हनुन उगा काय रंगीबेरंगी प्येल भरुन भरुन दाकवुन राह्यल? आता आमच्या सारक्या शेता भातावरच्या मानसास्नी असल उगा नखर्‍या उखर्‍याच खाउन चालतया व्हय? आंगात ताकत कशी याची म्हनते मी अस उगा येव्हढ येव्हढ लाडाकोडाच खाउन? ह्येच ह्येच चुकतयं बगा तुमा शेरातल्या मानसांच. काय खातुया ते बगन्या ऐवजी, त्ये दिस्तया कस ह्यावरन तुमी ठरवनार त्ये खायाच का न्हायी त्ये. आस कदी असतया का? आस हुइल का?