'सायलेंट स्प्रिंग'चा झंझावात
हल्ली शहरात, खेडयात कोठेही गेले तरी संध्याकाळ होताना घराची दारे खिडक्या बंद करण्याची सर्वांची लगबग दिसते. कारण? डास. आणि मग सुरू होते चर्चा डासांच्या वाढत्या प्रतिकारशक्तीची आणि त्यांना रोखण्यास कमकुवत ठरलेल्या ’डीडीटी’ ची! डीडीटीच्या फवारणीचे प्रमाण वाढवायला पाहिजे; ग्रामपंचायत अथवा महापालिकेने त्याची फवारणी जरा जास्त वेळा केली पाहिजे असे चर्चेच्या ओघात मत जोरदारपणे मांडले जाते. मग कोणीतरी जाणकार ’डीडीटी माणसांसाठी कसे घातक आह” हे सांगतात.
सागरेश्वरची शिल्पकला
नमस्कार ,
मध्यंतरी सागरेश्वर येथे गेलो होतो ..
अधिक माहिती
कराडच्या जवळ आहे.
माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र
माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र
काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने.
त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार.
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१)
२९ मे २०१३
आज ऑफिसमधून घरी आलो, बॅग फेकली, कपडे भिरकावले, बाथरूममध्ये जाऊन झटपट शॉवर घेतला, तोपर्यंत माझा चहा रेडी होता. बस तो हातात घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर म्हणजे हॉलमधील भल्यामोठ्या खिडकीसमोर आरामखुर्ची टाकून बसलो, पाय पुढे पसरवून त्या खिडकीच्या कठड्यावर टेकवले अन लांबवर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेल्या मुंबईकडे पहात, जिच्यासमोर एअर कंडीशन सुद्धा झक मारेल अश्या दहाव्या मजल्यावरील आमच्या खिडकीतून आत शिरणार्या वार्याच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत हातातल्या कॉफी मगातील गरमागरम चहाचे घोट मारत.... बस्स ती पंधरा-वीस मिनिटे..
पेठ ची भेट (कोथळीगड ट्रेक) | Fort Peth (Kothaligad) Trek
२०१३ च्या पावसाळ्याची चाहूल लागली आणि ट्रेक चे बेत ठरायला लागले. फोनाफोनी, मेलामेली नको त्यापेक्षा प्रत्यक्षच भेटू असं ठरलं. आमच्या ‘चढवय्ये’ नावाच्या ट्रेक ग्रूप मधले फाउंडर आणि नियमित सदस्य असे आम्ही भेटणार होतो.
त्याप्रमाणे मी, प्रसन्न आणि स्वानंद एक दिवस भेटलो, पुढच्या सहा महिन्यातले ट्रेक्स ठरवायला. सी सी डी मधे आमची ही भेट रंगली. एकदम कॉर्पोरेट स्टाईल मधे कॅलेंडरं, डाय-या आणि पेनं काढली. तिथल्या वायफाय ची आयमाय झाली होती त्यामुळे जीपीआरएसचाच आधार घेऊन रिसर्च सुरू केला.
कमिशनर- जेफ्री आर्चर (उत्तरार्ध)
पूर्वसूत्रः
कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)
(या कथेचा हा भाग आधीच टाकला होता परंतु मिपाच्या गेल्या काही दिवसांच्या पडझडीत गायबलेला दिसतोय कथा पूर्ण असावी केवळ याच हेतूने हा भाग पुन्हा टाकत आहे).
मलिकच्या पूर्व ईतिहासाची माहिती, त्याचा फोटो, कमिशनर साहेबांनी केलेली मदत या सर्वच गोष्टींची गौरवपूर्ण दाखल मुंबईच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतली.
चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य
“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.
“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्यावर आणत.
“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो!
मिसळपाव