Skip to main content

२१ जून, मॉस्को..

लेखक लाल टोपी यांनी शुक्रवार, 21/06/2013 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज आहे २१ जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. खरतरं दरवर्षीच ही तारीख येते आणि जाते. भारतातही काही प्रमाणात दिवस रात्रीच्या वेळेतील हा फरक जाणवतो मात्र भारत विषुवृत्ताच्याही एकदम जवळ नाही आणि भूमध्याच्याही फारसा जवळ नाही. दिवस रात्र किंवा ऋतूमानातील बदल याभागात म्हणजे विषुवृत्ताजवळ जेवढ्या प्रखरपणे जाणवतात किंवा भूमध्याजवळ फारसे जाणवतच नाहीत तसा प्रकार भारतात घडत नाही. मध्यरात्रीचा सूर्य: नॉर्वे शाळेच्या पुस्तकात हा धडा वाचल्यपासूनच 'कसा असेल मध्यरात्रीचा सूर्य?' हे कुतुहल शालेय दिवसांपासून मनात होते.

आला पावसाळा - तब्येत सांभाळा

लेखक सचिन कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/06/2013 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो सर्वाना माहित आहेच. तरी आपल्यावरील प्रेमापोटी एकदा रिपीट करतो. पावसाळ्यात viral जोरात आहे. तरी सर्वांनी पाणी उकळून प्यावे.(लहान मुलांना must. ते शक्य नसल्यास water purifier वापरावे. घरात Paracetomol चा stock नक्की ठेवा. लहान मुलांच्या वय/वजनाप्रमाणे syrup. Crocin या ब्र्यांडवर मुलांच्या वय/वजनाप्रमाणे घ्यायचे कोष्टक दिलेले असते. Power उपलब्ध भारतात १२० आणि २४० (टीप:ही जाहिरात नव्हे. ताप अंगावर काढू नका. इंजेक्षनला घाबरू नका. :) पालेभाज्या खूप धुवून, चांगल्या शिजवूनच खा. (कच्च्या सलाद्चे फ्याड पावसाळ्यात नको).

विनाशकाले विपरीत बुद्धी!

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 20/06/2013 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपाने एक आठवड्यापूर्वी २०१४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदींची निवड केल्यावर लगेचच प्रथम अडवाणी व नंतर नितीशकुमारांनी अपशकुन केला आहे. ८५ वर्षीय अडवाणींना मोदींची झालेली निवड आवडलेली नसावी कारण ते गोव्यातील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिले नव्हते व लगेचच दुसर्‍या पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन त्यांनी आपला निषेध प्रकट केला. अडवाणींबद्दल नितांत आदर असलेल्यांनासुद्धा त्यांची ही कृती अशोभनीय वाटली. या वयातसुद्धा त्यांचे रूसवेफुगवे कायम असावेत याचे सर्वांना आश्चर्य वाटले. या वयात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजाविणे आवश्यक आहे.

मनरक्षिता ( १)

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 20/06/2013 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे पिंगट तपकिरी डोळे भयाने विस्फारले होते. घामेजलेल्या कपाळावर तांबूस भुऱ्या केसांच्या बटा चिपकून बसल्या होत्या. घशातून बाहेर पडू पाहणारा हुंदका ओठावर दाबून धरलेल्या तिच्याच हाताच्या पंजाने शर्थीने रोखून धरला होता. समोरच्या दृश्याचा अर्थ लावण्यात तिच्या आठ वर्षाच्या चिमुकल्या मेदुला अपयश येत होते. पण चालले आहे ते काहीतरी भयंकर आहे अन आपण आवाज न करता गप्प बसण्यातच शहाणपणा आहे, इतके तिला नक्कीच उमजत होते. दानम्माच्या देवळाच्या अंधाऱ्या ओवरीत ती एका कोपऱ्यात दबकून बसली होती. अन ते चार धटिंगण देवळामागच्या त्या निर्मनुष्य मंडपात, संध्याकाळच्या संधिप्रकाशात तिच्या आईच्या अंगाशी झोंबत होते.

दावणगिरी लोणी स्पंज डोसा

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 20/06/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पुण्यात बर्‍याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला.

पवारसाहेब, कलमाडी, गाडगीळ.

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 20/06/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणूकीचे वेध आता सगळ्यांनाच लागले आहेत. तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी निरनिराळया आघाड्यांवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. पूर्वीच्या काळी देशात घडणार्‍या अनेक गोष्टींचे पुणे हे केंद्र असे. मागील काही काळात कलमाडी, प्रदीप रावत, विट्ठल तुपे, अण्णा जोशी असे खासदार पुण्याला मिळाले पण देशपातळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याला मिळालेला नाही. भाईंचे नाव झाले तेही चांगल्या गोष्टींसाठी नाही. पण पुण्याची निवडणूक अनेक गोष्टींसाठी गाजते. अण्णा जोशी विरुद्ध विट्ठलराव गाडगीळ अशी पहिली निवडणूक झाली.

मोहब्बतें - गुरू नॉट कूल

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 20/06/2013 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याचे खरे नाव 'गुरू नॉट कूल' असायला हवे, अशा गुरूकूल नावाच्या कडक स्कूल बद्दल हा चित्रपट आहे. कडक म्हणजे अभ्यास किती कडक करावा लागतो ते माहीत नाही. आख्ख्या चित्रपटभर एकही वर्ग दाखवलेला नाही, कोणी अभ्यास करतानाही दाखवलेले नाही. पण येथील संचालक अधूनमधून सगळ्यांना हॉल मधे राउंड अप करून रागीट चेहर्‍याने ‘परंपरा और अनुशासन’ शिकवतो. भाषा अशी की तुलनेत उत्तर प्रदेश भाजप चे अध्यक्ष हाय फाय इंग्रजी बोलत असतील असे वाटावे. कडकपणा एवढाच. येथे अॅडमिशन घेतल्यावर तुम्हाला बाहेरची दुनिया बंद होते. पण पोरे कधीही गावातील रेस्टॉरंट्स मधे जाणे, गावातील चौकात नाचणे ई. गोष्टी सहज करतात.

भित्या पाठी....डॉक्टर !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 20/06/2013 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
सेलेब्रेटींनी काहीही केलं तर त्याचा जरा जास्तच उहापोह अन चर्चा होते. पण अँजेलिना जोलीने जे काही केलं त्याचा मात्र उदो उदो, अन जे काही कौतुक झाल ते मात्र मला खरच कळल नाही. मी पुन्हा पुन्हा न्युज वाचली, एकच उत्तर ब्रेस्ट कॅन्सरची ८५ टक्के अन ओवरिज च्या कॅन्सरची ५० टक्के शक्यता असल्याने, अ‍ॅजलिना जोलीने, मॅसेक्टॉमी करुन घेतली. आता या सर्जरी दरम्यान तिची मावशी ब्रेस्ट कॅन्सरने वारली अन अ‍ॅजेलिना त्या फ्युनरलला जाउ नाही शकली वगैरे वगैरे. अ‍ॅजेलिना मला पडलेला प्

भांडार हुंदक्यांचे....!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 20/06/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
भांडार हुंदक्यांचे....!

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी

लाचार शेत झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 20/06/2013 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
लाचार शेत झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?