Skip to main content

ऑफीस ऑफीस...

लेखक मोदक यांनी बुधवार, 26/06/2013 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
हाफिसात मागच्या आठवड्यात घडलेला एक किस्सा.. एखादा प्रश्न विचारला गेल्याने "न हसता आणि न वैतागता" कसे उत्तर द्यावे हे न कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग.. मंथली प्रेझेंटेशन सुरू होते.. माझ्या एका रिपोर्टमधील आकडेवारी आणि आमच्या लंडन ऑफीसमधील एकाने तयार केलेली आकडेवारी काही केल्या जुळत नव्हती... शेवटी असा निष्कर्ष निघाला की "दोन्ही रिपोर्टस चुकीचे आहेत व एक तिसराच रिपोर्ट तयार केला जावा.." अचानक आमचा एका मोठ्ठा सायेब वदला... आय अंडरस्टँड रिपोर्ट A इज इनकरेक्ट, रिपोर्ट B इज इनकरेक्ट अ‍ॅजवेल! बट व्हाय दोज इनकरेक्ट फिगर्स आर नॉट कन्सिस्टंट..?

....तसं नाहीये

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 26/06/2013 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राच्या अंगी आवेग भिनायला भरतीची जोड लागते . संध्येला कातर व्हायला सूर्यास्ताची वेळ लागते . चातकाच्या आतुरतेला वसंताची ओढ लागते . पाण्याला नितळ व्हायला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो . मातीला गंधाळायला पहिल्या पावसाची सर लागते . प्राजक्त ओघळायला पहाटेची साथ लागते . मोगर्‍याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागते . मऊ साय धरायला दुधाला धग लागते . साध्या पाण्याचे थंडगार तुषार व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते . हवेला कुंद व्हायला धुक्याची हाक लागते . इतकचं काय, चंद्र उठून दिसायलासुद्धा रात्रीचे आंगण अन् चांदण्यांचे कोंदण लागते . पण तुझं तसं नाहीये गं तुझं...
काव्यरस

सिलोन म्हणजे काय ?

लेखक देशपांडे विनायक यांनी मंगळवार, 25/06/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पिढ्या किती दूर असतात ? प्रसंग पडल्याखेरीज ते जाणवत नाही . आता हेच पहाना . मी किशोरकुमारचे " वापस नाही जाना आज पहिली तारीख है ,खुश है जमाना आज पहिली तारीख है '' गुणगुणत होतो . आजूबाजूचे प्रश्नात्मक चेहरे पाहून मी म्हणालो " सिलोनवर दर एक तारखेला सकाळी हे गाणे लागायचे " "सिलोन म्हणजे काय ?" एक निरागस प्रश्न विचारण्यात आला . उत्तर देण्यासाठी तुमची मदत मागत आहे . कारण माझे एकट्याचे अनुभव सांगून दिलेल्या उत्तराने सिलोनला न्याय मिळणार नाही असे मला वाटते .

पर बंदे अच्छे है .......... १

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 25/06/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मानसिक वय १८ आणि वरील करितांच, सत्यकथेवर आधारित. Every boy tends to become a man , few would be heros & at least one would be superhero - श्रावण मोडक ************************************************************************* समोरच्या दरवाज्याच्या उघड्या फ्रेम मधुन एक-एक करून मुली येत होत्या, सभ्य भाषेत एस्कॉर्ट, असभ्य भाषेत वेश्या, वेश्याच त्या ! मसाज पार्लची मसुर असली म्हणुन काय झाले !! कोणी स्कर्ट घालुन तर कोणी कमालीचा ओपन-नेक टी-शर्ट घालुन आप-आपल्या फिगरचे प्रदर्शन करत होत्या. मधुनच एक सावळी त्याला 'हाय' करून गेली.

उत्तराखंड आपत्ती आणि तुम्ही - आम्ही

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 25/06/2013 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तराखंड राज्यातील सद्य भयावह परिस्थितीवर नक्की काय लिहायचे कसे लिहायचे हा मोठा प्रश्न आहे. या वर लिहायला घेतले खरे पण या लेखनाचा नक्की साचा कसा असावा हे ठरवू न शकल्याने मुक्त स्वगत लिहीत आहे. यात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे मात्र त्यात सुसूत्रता असेलच असे नाही. ========= रविवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री. विजय बहुगुणा यांची श्री.करण थापर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली/पाहिली. या पदावरील व्यक्तीने जितका प्रामाणिकपणा दाखवणे अपेक्षित आहे तितका या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दाखवला असे माझे मत झाले.

मनरक्षिता (२)

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 25/06/2013 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनरक्षिता (१) चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला. तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला.

विम्बल्डन २०१३

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 24/06/2013 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुतारी वाजली आहे, रणशिंग फुंकले गेले आहे, आजपासून विम्बल्डन २०१३ सुरु झाले आहे. मला ह्या, साहेबाच्या देशातल्या हिरव्यागार हिरवळीच्या मैदानावर होणार्‍या टेनिसचे अपार कौतुक आहे. टेनीसमधल्या अमेरिकन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन ओपन ह्या इतर स्पर्धाचे आकर्षण जरी असले तरीही ह्या विम्बल्डनची मजा काही औरच असते.

बदला !

लेखक चाफा यांनी सोमवार, 24/06/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
पलंगावर पडल्या पडल्या मी भिंतीवरच्या पालीच्या हालचाली न्याहाळत होतो. हळूहळू ती पाल समोरच्या नाकतोड्याकडे सरकत होती आणि तिच्या अस्तित्वाची जाणीवही नसलेला नाकतोडा एकदम शांत होता. अचानक पालीने त्याच्यावर झडप घातली आणि आपल्यावर येणार्‍या संकटाची त्याला कल्पना येण्यापूर्वीच तो तिच्या जबड्यात तडफडत होता. मी ही किरणवर असाच अनपेक्षितपणे घाला घालणार होतो. मार्ग सुचत नव्हता पण किरणला संपवण्याचा निश्चय मी पक्का केला होता. किरण आणि मी तसे जुने मित्र म्हणजे जिवलग म्हणता येणार नाही पण दोन मिनिट थांबून बोलण्याइतपत नक्कीच. आमची मैत्री जास्त वाढायला कारण ठरली ती मधुरा, माझी आणि किरणची कॉमन मैत्रीण.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 24/06/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
१० जुन २०१३ ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती. ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..!

यांना कसलेही कौतुक

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 24/06/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
या पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते कशाचेही कौतुक करतील. भले ती गोष्ट ताजमहालाएवढी मोठी नसेना का. या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे. एखादा पुणेकर तुम्हाला विचारेल ' का हो कधी टिळक स्मारकला गेलायत का' यावर समोरचा विचार करू लागतो 'हो गेलोय अमुक तमुक नाटके पाहिली आहेत'.