Skip to main content

१ प्रश्न

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 19/07/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?. उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास . मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे? पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे. १ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत? वेड्या....

आर्ट ऑफ लिविंग चा अनुभव अथवा माहिती पाहिजे .

लेखक rain6100 यांनी गुरुवार, 18/07/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा. पैकी कुणी हा कोर्स केलेला असल्यास मला माहिती हवी होती . मला साधारण दहा दिवस कोणत्याही ठिकाणी असलेल्या योग शिबीर अथवा ध्यान धारणा शिकवली जाते असे ठिकाण सुचवा. बंगलोर आश्रमात असलेल्या कोर्स बद्दल माहिती पाहिजे किवां महाराष्ट्रा मध्ये चांगले ठिकाण सुचवा कि तेथे राहूनच हा कोर्स करता येईल. नाशिक जवळ असण्याऱ्या आश्रमा बद्दल मागे वाचले होते पण आता आठवत नाही त्यामुळे त्याबद्दल पण माहिती हवी होती . आर्ट ऑफ लिविंग चा फायदा आपल्या व्यक्तिगत जीवना मध्ये कसा होतो कुणाला अनुभव असल्यास जरूर सांगा

लोकमान्य टिळक आणि दासबोध

लेखक दासबोध.कॊम यांनी गुरुवार, 18/07/2013 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्यांचे नाम आणि काम माहिती नाही असा मनुष्य भारतात तरी सापडणार नाही. लोकमान्यांनी आपल्या असामान्य बुद्धीमत्तेच्या जोरावर अफ़गाणिस्तान ते ब्रह्मदेश असा विस्तारलेला उभा भारतवर्ष नुसता ढवळून काढला होता! “स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली! अशा या लोकमान्यांच्या अंतरंगात डोकावून पाहता आले तर काय भाग्य ठरेल ते!

मराठी समाज्याचा लोचा

लेखक NiluMP यांनी गुरुवार, 18/07/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपट उदयोग ः हिस्टी चॅनलवर ठवससलूववक@100 हा कार्यक्रम चालू होता. कदाचित मी सुरूवातीच्या भागापासून हा कार्यक्रम पाहिला नाही पण एक गोष्ट मला खटकली ती म्हणजे ज्या मराठी माणसाने दादासाहेब फाळके यांनी चित्रपट उदयोग सुरू केला त्यांचा साध्या उल्लेखही कोठे आढळला नाही. दुसरी गोष्ट खटकते ती ही की मराठी चित्रपटांसाठी महाराष्टात कदाचित मिळत असतील, पण मुंबईत चित्रपटगृह उपलब्ध होत नाही आणि तिसरी खटकणारी गोष्ट म्हणजे मराठी माणसांचे दुप्पटी मराठी प्रेम एकीकडे मराठी मराठी म्हणून गळा काढायाचे आणि दुसरीकडे मराठी चित्रपटांना नाक मुरडतात.

चिकन रीझाला / रेझाला

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 18/07/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
हि एक पारंपारिक व्हाईट ग्रेव्ही बेस्ड मुघलाई डिश आहे. माझी ग्रेव्हि अंमळ लाल झाली कारण मी लाल मिरच्या वाटणात घातल्या होत्या :D Chicken साहित्य: १. चिकन - १/२ किलो २. साजुक तुप - २ पळ्या ३. कच्च्या कांद्याची पेस्ट - १ वाटि ४. ५ काजू, ५ सोललेले बदाम, मगज बी आणि पाईन नट्स - प्रत्येकी १ चमचा ५. फेटलेलं दही - १ कप ६. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा ७. केवडा किंवा गुलाबजलाचे थोडे थेंब ८. तेल - १ पळी ९.

मोदी आणि मोदी

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 18/07/2013 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयटर्सचा वार्ताहर मोदींची मुलाखत घेत आहे. मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. वार्ताहरः मोदीजी, तुमचे आवडते फळ कोणते? मोदी: आंबा क्षणार्धात सर्व वाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज येते. "मोदींना पेरू आवडत नाही" . . . पुढच्या क्षणी प्रतिक्रिया येऊ लागतात. जितेंद्र आव्हाडः महात्मा गांधींना केळ्यासारखे साधे आणि स्वस्त फळ आवडत असे. मोदी हे मुळातच महात्मा गांधींच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या आवडत्या फळात केळ्याचा उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटत नाही.

चूल माझी सखी

लेखक जागु यांनी गुरुवार, 18/07/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे. लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती.

उंदरांची शर्यत

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 18/07/2013 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव.

~देवा आता हार मान तू~

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 18/07/2013 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे

झालंया सगळ येगळ आता ..

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 18/07/2013 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर भाकरीनभी ओ ळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर शब्दाच भी वय वाढलया ..