Skip to main content

पाणी लाऊन हजामत

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 02/08/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी लाऊन हजामत

गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!

सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!

पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं
Taxonomy upgrade extras

जनहित याचीकेबद्दल मदत हवी आहे .

लेखक नन्नु यांनी सोमवार, 29/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस वकिलाची मदत न घेता कोर्टात जनहित याचिका कशी दाखल करतो , गुगल वर सर्च केले असता साधे पोस्ट कार्ड सुद्धा पेटीशिअन म्हणून ग्राह्य धरले जाते , पुण्यात कुणी माहितीगार मिळू शकेल काय ,एक सरकारी भष्ट्याचार प्रकरण उघड करायावाचे आहे . बहुतेक जणाकडे मदत मागीतली पण सर्वांनी असमर्थता दाखवली .

प्रथम तुज पाहता.......!!!-२

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 29/07/2013 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम तुज पाहता........!!! {"अग! मी तसं नव्हते म्हणतं. " खरतर कॅरोलिन हादरलीच होती. "हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण आपली, म्हणजे मला नकोच आहे ती, तुझ्यासाठीच आहे ती, इस्टेट जर बळकावायला जर कोणी तुला नादाला लावेल तर? मग तुझ्याकडे काय रहाणार? असा विचार करुन मी म्हणत होते." "आता ती इस्टेट तुझ्याकडे आहे तेंव्हा माझा रस्ता सोड!" सुझीने कार सुरु केली. " हे बघ!

जे के रोलिंग - गुपचूप गुपचूप

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 29/07/2013 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१३ मध्ये स्फीअर बुक्स या ब्रिटिश प्रकाशन संस्थेने एक पुस्तक प्रकाशित केलं. प्रकार नेहेमीचाच. लिहून लिहून बुळबुळीत झालेला. रहस्यकथा. लेखक नवखा - रॉबर्ट गाल्ब्रेथ नावाचा. विशेष कोणाचं या पुस्तकाकडे लक्ष जाण्याचं कारण नव्हतं. गेलंही नाही - पुढच्या तीन महिन्यांत त्या पुस्तकाच्या जेमतेम दीड हजार प्रती विकल्या गेल्या. समीक्षकांनी मात्र कादंबरीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. एकाने त्याला "दैदिप्यमान पदार्पण" असं म्हटलं, तर दुसर्‍याला त्यातलं ठसठशीत पात्रवर्णन आवडलं. इंग्रजी ग्रंथप्रकाशनाचं जग मोठं क्रूर आहे. दर आठवड्याला शेकडो पुस्तकं प्रकाशित होता असतात.

मला एका कवितेच्या ओळी कुणी सांगू शकेल का?

लेखक वाचक्नवी यांनी रविवार, 28/07/2013 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक मला लहानपणच्या पाठ्य पुस्तकात असलेली जुनी कविता आठवली. अधल्या मधल्या ओळी आठवल्या, पण पूर्ण आणि सलग ओळी नाही. ती कविता कुणाच्या स्मरणात असेल तर, किंवा कुणी शोधून सांगेल? एक वडारीण किंवा तत्सम जातीची बाई आपला संसार घेऊन एका गावाहून दुसर्‍या गावाला जात आहे तिचे वर्णन या कवितेत आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा. मूल पाठिवर विणीत चटई पेंगत पेंगत बाई जाई घोड्यावरती फुटकी भाणडी त्यावर फडफड करी कोंबडी, वगैरे. ....वाचक्नवी

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/07/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १) अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा: ------------------------------------------------------------------------ १. अभिरमन्यु उवाच: सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली. … माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी.

डॉक्टर तुम्हीच सांगा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 28/07/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो. मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले?

रंजनभ्रमरी

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 27/07/2013 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्त मनाने झुरलो मी झरल्यात कळा अनुबंध तळी मदनाची बाधा भवभोळी गंधात न्हाइली मूक कळी चाहूलक्षणांची पागोळी दंवस्पर्शकोवळ्या अंघोळी अंगणी श्वेत केशर ओळी मातीवर ओल्या; रांगोळी अलवार स्पर्श हळुवार उरी दरवळ परिमळ मन गाभारी गोकुळी रास रंजनभ्रमरी वेदना जरा विरल्या दारी ……………. अज्ञात
काव्यरस

वाटते मजला भिती - (गझल)

लेखक विदेश यांनी शनिवार, 27/07/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती सागरावर का उसळती जीवघेणी वादळे हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा देवळातिल शांततेची वाटते मजला भिती वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती ओळखेना आरसाही वाटते मजला भिती जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती .
काव्यरस