Skip to main content

म्हैसूर पाक

लेखक रोहिणी पानमंद यांनी शनिवार, 17/08/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १)एक वाटी डाळीचे पीठ २)दोन वाटया साखर ३)तीन वाटी वनस्पती तूप गरम करून ४)चिमुटभर सोडा कृती :- १)साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे. २)नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे.असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे. ३)तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे.नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे. ४)त्यानंतर हे मिश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा व म्हैसूर पाकची वडी पाडावी .

मदत हवी आहे.

लेखक बन्याबापू यांनी शनिवार, 17/08/2013 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो, मला ऑनलाईन मराठी कादंबरी पीडीएफ,ई-बुक स्वरुपात डाऊनलोड करायची आहे.मराठीतील वाचनीय कादंबरी डाऊनलोड करायचे संकेतस्थळ किंवा काही लिंक्स असतील तर सुचवा.धन्यवाद ! (संपादक मंडळीना विनंती आहे कि त्यांनी हा धागा लगेच तोडू नये.काही दिवसानंतर तोडला तरी चालेल.)

आहे!?

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/08/2013 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
आहे!? आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे? आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे! आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे? आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे! आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे? आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे! आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे? आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे! (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?) (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!) किती मोजू सांगा?

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 16/08/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

आजहि

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/08/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजहि बुलबुल तेच बोलते दुष्कर भाषा परी ही ती दूर क्षितीजावरती दिसते क्षीण तेवणारी पणती आशा नाजुक हिरवळते दरवळते प्रतिमा ओझरती अमिट स्वरांचे हे नाते गुंजारवते अवती भवती श्रावण धारा लोभस वारा भाव भावना ओघवती पागोळी हळुवार उतरते आतुरल्या काठावरती वलये वलये उठती विरती हुर हुर मनभर कातरती सांज सकाळी आठवती नयनांत रेखलेल्या भेटी …………… अज्ञात
काव्यरस

स्वकीय ?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 16/08/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली
काव्यरस

मी मोठा शहाणा...

लेखक धन्या यांनी गुरुवार, 15/08/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
असतात अशी काही माणसं. स्वतःला अगदी देव नाही परंतू देवाखालोखाल समजणारी. इतरांना कस्पटासमान लेखणारी. स्वतःच्या ज्ञानाबद्दल, क्षमतेबद्दल, त्यांच्याशी निगडीत सार्‍याच बाबींबद्दल अवास्तव कल्पना असणारी. इतर व्यक्तींच्या मताला काडी ईतकीसुद्धा किंमत न देणारी. प्रत्येक संवाद हा आपल्याच वाक्याने संपायला हवा असा अट्टाहास असणारी. समोरच्याच्या बोलण्यात कितीही तथ्य असलं तरीही मी म्हणतो तेच बरोबर असा हेका धरणारी. ही यादी न संपणारी आहे. आणि एव्हाना तुमच्याही लक्षात आलं असेल की, अशी माणसं तुमच्या आजुबाजूलाही आहेत. काहींच्या घरात आहेत. काहींच्या दारात. तर काहींच्या कार्यालयात.

मुंबईचे आगळे रूप पाहताना - ३

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 15/08/2013 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे आगळे रूप पाहताना - १ मुंबईचे आगळे रूप पाहताना - २ tower2 आता माझगाव डॉक्स वरून आणखी पलिकडे भायखळा परिसरात व लालबाग परळ कडे बघितले तर सर्वत्र टॉवरच दिसत होते.पैकी डोक्यावर घुमट असलेला टॉवर म्हणजे भायखळयाचा फॉर्च्युन टॉवर आणि मधोमध उभी असलेली उंच इमारत जे जे उड्डाणपूलाच्या अलिकडे मुंबई सेंट्रल कड

कोकणी मांसाहारी थाळी

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 15/08/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'अन्न हे पूर्णब्रह्म'च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सर्व मिपाकरांचे व रेवतीचे खास अभिनंदन. ह्या सदरामुळे आम्हाला वेग-वेगळे पदार्थ बनवता व शिकता आले, त्यात मिपाकरांचे प्रतिसाद नवीन, वेगळे काही बनवण्यास प्रोत्साहित करत होते. कोकणातले निवडक पदार्थ घेऊन चवीने खाणार्‍यांसाठी मी कोकणी मांसाहारी थाळी सादर करत आहे , आशा आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल.

गोवन थाळी

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 15/08/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या सदरास सुरुवात करून आज १ वर्ष झाले. ह्या वर्षभरात अनेक पाककृती सादरकरण्याची मला मिपाने संधी दिली, मिपा सदस्यांनी कौतुक केले. भरून पावलो. आजच्या ह्या वर्धापनदिनानिमित्त ही 'गोवन थाळी' सादर करताना आनंद होतो आहे. स्विकार व्हावा.

Thali