Skip to main content

अशीच आजची रात्र

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 20/09/2013 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा २-३ रात्रीची अखंड भेट आपली, आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो.. अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री.. मी टक्क जागा कोण कुठली तू कानी किणकिणतेय तुझी गझल... 'कसली आहेस ग तू' नुसती गझल.. आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही गेलीस??? नाहीच तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला... आरपार ...

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३)

लेखक शिवोऽहम् यांनी गुरुवार, 19/09/2013 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2) Alice! a childish story take, And with a gentle hand Lay it where Childhood's dreams are twined In Memory's mystic band, Like pilgrim's withered wreath of flowers Plucked in a far-off land.. ~Alice's Adventures in Wonderland त्या घडामोडींकडे वळण्याआधी एक दुसरा आठवणींचा, विचारांचा पसारा निवारायला हवा. लिहायला घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती हे असे गाय रिचीच्या फिल्मसारखे नॉन्-लिनिअर होईल. हा सगळा 'वर्म्स् आय व्ह्यु' बघताना थोडे मागे-पुढे व्हायचंच असं म्हणुया.

'लोकायत' विचारचर्चा

लेखक प्रास यांनी गुरुवार, 19/09/2013 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

थोरियम कांड(६ ४ लाख करोड ) : दळभद्री व सुस्त युपीए सरकारच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा !!

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी बुधवार, 18/09/2013 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला बहुतेकांना माहित असेलच थोरियम (९ २ -Th -२ ३ २ ) हा भारताच्या अणू उर्जे साठी अत्यंत असा महत्वाचा मूलद्रव्य आहे. आपला (भारताचा ) तिन टप्प्यांचा नागरी अणु कार्यक्रम हा थोरियमचे भारतातील केरळ व तामिळनाडू मधील विपुल साठे ह्य वर आधारीत आहे. सरकारी आकड्यान प्रमाणे थोरियमचे चे साठे हे अंदाजे ३ ० ते ३ ५ % भारतात आहेत. सध्या थोरियम आधारीत अणु -भट्टी वरचे संशोधन हे अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येउन ठेपले असताना खालील ही बातमी येणे म्हणजे आपल्या देशाच्या सरकारचा गलथान कारभाराचा एक उत्कृष्ट नमुनाच ठरेल .

ओढ दर्शनाची

लेखक विदेश यांनी बुधवार, 18/09/2013 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ मन होते कासावीस लागुनिया वेड काम करता लक्ष नाही कामामधे चूक नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक घर नाही दार नाही विसरतो संसार जीवनात सार सारे वाटू लागते असार नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . . .
काव्यरस

लालबागच्या राजाचे सेवक मुजोर झाले आहेत का ?

लेखक निश यांनी बुधवार, 18/09/2013 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टिव्ही वर लालबागच्या राजाच्या सेवकांच्या मुजोरपणाचे चे चित्र दाखवताहेत ते खरच माणुसकीला काळिमा फासणारे आहे. ज्या पध्दतीने महिलांशी ते वागत आहेत ते अतिशय चीड आण्णारे आहे. इतका मुजोरपणा त्यांच्यात आला आहे की पोलिसानांही ते वाईट रीतीने वागवत आहेत. ह्या बाबत सरकार फारच बोटचेपे धोरण अवलंबित आहे. हे अजुनच चीड आणणारे आहे. १७ १८ तास देवासाठी रांगे उभे राहुन जर भक्तांच्या वाटेला अवहेलना येणार असेल तर खरच जगात पाप वाढत आहे हेच खर. महिलांना ज्या प्रकारे वाईट वागणुक देण्यात आली ते अतिशय खेदजनक व मनाला क्लेश देणार आहे.

जिम कॉर्बेट उद्यानात आमचा फेरफटका

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 18/09/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालपासून वर्गावर नवीन सर आले. मराठी विषयाला. आता सातवीचं मराठी म्हणजे काय जादा अवघड नाय. पण त्यांनी एकदम डायरेक्ट निबंधच लिहायला सांगितल्यावर माझी नाही म्हटलं तरी जरा फाटलीच. निबंध म्हणजे माझा वीक प्वाइंट ! सरांनी विषय दिला, ‘शालीमार बागेतील फेरफटका ‘. शालीमार बाग ? गावातल्या सगळ्या बागा आमच्या पायांना सू-परिचित. त्यातल्या एकाच बागेला नाव आहे. दे.भ. सोमूअण्णा नगरकर बाग.

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2)

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 18/09/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. सिंहलांनी तमिळांचा चालवलेला वंशविच्छेद, त्याविरुद्ध एकाकी झुंज देणारा हिकमती प्रभाकरन, त्याचे जिवावर उदार सैन्य आणि त्यांचा निर्धार.

चूझिंग द इझी ऑप्शन

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/09/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हे बघ, तू रोज व्यायाम कर, व्यवस्थित, चांगलं खा; तुला फिट होण्यापासून काहीही अडवू शकत नाही." मी मित्राला म्हटलं. "रोज?????" प्रचंड संकट समोर आल्यागत भाव चेह-यावर आणून त्याने विचारलं. "बरं एक दिवसा आड कर रे, पण कन्सिस्टंटली कर." मी काठिण्य पातळी कमी केली, आणि लगेच त्याच्या चेह-यावर हसू फुललं. इतक्यात बाजूला उभा असलेला एक मित्र वडापाव चा घास घेत म्हणाला, "त्यापेक्षा डाएट कर ना! त्या सचिन ने केलं ना आमच्या सोसायटीतल्या... नो व्यायाम नो नत्थिंग. फक्त गोड बिड नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं असं थोडंसं पाळायचं आणि ते देतात ती आयुर्वेदिक औषधं घ्यायची.