देरसूचा निरोप..........भाग २ - डुकराची शिकार !
भाग-१ - निशाचर
२
रानडुक्कराची शिकार
चहाचे दोन तीन कप प्यायल्यानंतर सैनिकांनी घोड्यांवर सामान लादायला सुरवात केली. देरसूनेही त्याचे सामान आवरायला घेतले. माझे त्याच्याकडे बारीक लक्ष होते. त्याने पहिल्यांदा त्याचा पिट्टू एका झटक्यात पाठीवर चढवला व झाडाच्या बुंध्याला टेकवून ठेवलेली त्याची रायफल उचलली. थोड्याच वेळात आमची पलटण मार्गस्थ झाली.
ज्या घळीतून आम्ही मार्ग काढत होतो ती एखाद्या सापासारखी पसरली होती. तिला मधेच अनेक छोट्या घळी येऊन मिळत होत्या. त्या सगळ्या मार्गावर झरे व धबधबे त्या दरीत पाणी ओतत होते.
मिसळपाव
“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.
“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.
“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.
“कसली दुरुस्ती?