Skip to main content

संवादिका : १ - मंगल कार्यालय

लेखक प्रास यांनी रविवार, 20/10/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, तो विजुताईंचा मुलगा ना?" "कोण हो?" "अहो तो काय, त्या छोटीला कडेवर घेऊन उभा आहे, तो." "तो होय, हो हो, तो विजुताईंचा मुलगाच नि ती छोटी त्यांची नात." "हं, म्हणजे केलं वाटतं याने लग्न." "छे हो, ती छोटी विजुताईंची नातच पण म्हणजे त्यांच्या मुलीची, ज्योतीची मुलगी." "म्हणजे अजून नाहीच केलंय का याने लग्न?" "हो ना!" "इतका चांगला मुलगा आहे, स्वभाव, शिक्षण, नोकरी. मग करत का नाहीये लग्न?" "कुणास ठाऊक?" "तसं कधी, कुठे प्रकरण वगैरे काही?" "ऐकलं नाही कधी तसं. पण आजकालच्या मुलांचं काय, कसं, ते काही कळतंच नाही.

मॉल संस्कृति आणि फ़ेरीवाले

लेखक नेत्रेश यांनी रविवार, 20/10/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
काही दीवसांपुर्वी आलेल्या मॉल संस्कृति धाग्यावर बर्याचजणांनी मॉलमधून भाजी न घेता रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून आपण का खरेदी करतो / करावी याची कारणे दीली आहेत. माझ्या माहीतीतले बरेच लोकही त्याच मताचे आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की हेच लोक आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतो हे कंटाळा येईपर्यंत सांगत असतात. पण फेरीवाल्यांमुळे कायदेशीरपणे दुकान चालवणार्या दुकानदारावर होणारया अन्यायाचे भागीदार असतात.

पुन्हा नव्याने..

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 20/10/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने पुन्हा नव्या उलगडती वाटा पुन्हा नवी अधरांवर लिहिली नाविन्याची लोभस गाथा अस्तित्वाचा नवा अर्थ अन् जगणे सारे नवेच झाले बुरसटलेले पाश तोडुनी नवे पाखरू नभी उडाले... नव्या नव्याची नवलाई ही व्यापुन घेते सारे जीवन नव्या नभीची नवीन बिजली छेदून जाते जुने कृष्ण घन नव्या सुरांची नवी भुपाळी नवी सुगंधी पहाट गाते अधीर राधा पुन्हा नव्याने श्यामनिळ्याची होऊन जाते!! © अदिती जोशी 11.6.13

आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?

लेखक गुल-फिशानी यांनी रविवार, 20/10/2013 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो! एक विनंती आपण अशा कोणत्या संघटने चे सभासद बनला आहात का की जी प्रत्यक्षात एक cult आहे? आपण ज्या ही संघटनेत (धार्मीक वा तत्सम) असाल त्या संघटने च्या कार्यप्रणाली चे संचालकांचे एकदा तरी कठोर परीक्षण करुन बघा जर त्यात खालील प्रकारच्या गोष्टी आढळत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपला अमुल्य वेळ,पैसा आणि क्षमता वाया जाण्या पासुन स्वतःला वाचवा ही कळकळीची नम्र विनंती ! CULT म्हणजे नेमके काय ?

सामूहिक मतप्राधान्याचे (एक्सेल) विश्लेषण

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 19/10/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूका जवळ आल्या आहेत ( तशा नाहीत, पण प्रचार चालू आहे तेव्हा...). तर सर्वात चांगला उमेदवार कोणता? ज्याला ५०% पेक्षा मते पडतात तो? पण असे झाले नाही तर? ज्याला सर्वात जास्त मते पडतात तो? पण हे कसे कळणार कि तो किती जणांना किती आवडतो. सोम्या, गोम्या आणो सोग्या तीन उमेदवार आहेत. १०० मतदार आहेत. ३४, ३३, ३३ अशी अनुक्रमे त्यांना मते पडली. गोम्या आणि सोग्या ला मत देणारांना वाटते (६६% जणांना) कि 'बाकी काहीही होवो, सोम्या रपाटून पडावा'. पण बहुसंख्यांची इच्छा असूनही सोम्या चक्क जिंकतोय. मग प्राधान्याची सोय करण्यात आली. पण मध्यंतरी बरेच राजकारण झाले.

(खंड्याचे मनोगत)

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/10/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थानः खंड्या जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात!

अर्थ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 19/10/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच असा प्रश्न पडतो मला की मी का नक्की का जगतोय? असं कोणतं काम करायचंय ज्याची आतुरतेने वाट बघतोय? हजारो अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना मी जागलो का? ज्यांना जसे हवे होते तसाच त्यांच्याशी वागलो का? आजपर्यंतच्या आयुष्यात किती जला णांच्या उपयोगी पडलो? माझी मदत हवी होती अश्या किती घरांच्या पायऱ्या चढलो? कितीतरी मनं मी दुखावली असतील… कितीतरीजण मला दुरावले असतील…. माझ्या अश्या वागण्याला तेच लोक काळाच्या ओघात सरावले असतील आपल्याच धुंदीत जगलो … हवा तसाच वागलो.... कोणी कधी काही समजावले तर त्यालाच टाळू लागलो .....
काव्यरस

बाहुला बाहुली

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 19/10/2013 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी अचानक आम्हाला माहीत झाले की आमची बाहुली मोठी झाली आहे आणि आम्हाला तिचं लग़्न केले पाहिजे.आम्हाला माहित ही झाले नसते दीदीने आम्हाला साग़ितले नसते तर. बाहुली दीदीनेच आम्हाला बनवून दिली होती.लाल ओठ, लांब केसाची तिला कोणताही ड्रेस सुंदर दिसत आसे.कधी आम्ही तिच्या लांब केसाची वेणी बनवत,तिच्याशी खुप ग़ोष्टी बोलत पण आतापर्यंत तिच्या लग़्नाचा विचार आमच्या डोक्यात आला नव्हता.आम्हीतर नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आल्यावर आमच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ एका लहान कप्प्यात तिचं घर केले होते.त्या कप्प्यात आणखिन जाग़ा नव्हतिच. दीदी आमच्याहून मोठी होती.तिला खुप आभ्यास करावयाचा आसे,तिच्यासाठी एक टेबल खुर्ची सुद्ध

जराजर्जर म्हातारपण ....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 19/10/2013 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एक ओळखीची व्यक्ती देवाघरी गेली.थोडे वाईट वाटले पण का कुणास ठावूक आनंद जास्त झाला.खरे तर गेलेल्या व्यक्ती विषयी असे बोलू नये, पण खरेच वाटले की सुटली बिचारी..काहीतरी ९०/९२ वय असेल..कुणी मोजलंय… ८५ ओलांडली आणि त्यांना लकवा झाला, पुढची ५/७ वर्षे अंथरुणालाच खिळून होती.रोज देवाची पार्थना करायची की मला घेवून चल.पण देव काही प्रसन्न होत न्हवता..परवा झाला..... मागच्या भेटीत इच्छा नसतांना पण त्यांच्या भेटीला जावे लागले.माझा स्वभाव माणूस घाणा नाही आहे पण महिनोन महिने आजारी असलेल्या माणसांना भेटायला जायला नको वाटते.त्यांच्या पण काही अडचणी असतात. पण अशीच एक जनरीत म्हणून जावे ला

ओदिशा - ८: चिल्का सरोवर

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 18/10/2013 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ ओदिशा - ४ ओदिशा - ५ ओदिशा - ६ ओदिशा - ७ चिल्काच्या पश्चिम किनार्‍यावरील भुवनेश्वरपासून १२० किमीवरील रंभा, भुवनेश्वरहून ९७ किमी व