Skip to main content

वीर-रसा ने माखलेल्या तीन लालबुंद कविता !!!

लेखक गुल-फिशानी यांनी सोमवार, 28/10/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो ! या माझ्या अत्यंत आवडत्या कविता आहेत. या मनाला छान उभारी देतात. वाचुन बघा कदाचित तुम्हाला ही या आवडतील !

देवासाठी काय करावे बरे

लेखक देशपांडे विनायक यांनी सोमवार, 28/10/2013 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ? हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !! हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!! संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !

भाग १ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

लेखक मन यांनी रविवार, 27/10/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पब्लिकचं लक्ष वेधून घेणं सोपं नाही. सातव्या आठव्या शतकात तत्कालीन ज्ञात जगातील फार मोठ्या भागावर इस्लामी राज्य पसरत होते. त्यांना कुणी यशस्वी आव्हान देणे हे ही दिव्यच मानले जाई. खरेतर असे कुनी आव्हान दिले होते, हे सुद्धा अल्पपरिचित असल्याचे दिसते. तर अशा एका योद्ध्याचा हा संक्षिप्त परिचय. पारशी लोकांचं गेलेलं राज्य त्यानं काही काळापुरतं पुन्हा उभं केलं.

बीट सूप : घरातील खाद्यक्रांतीचा साक्षीदार

लेखक अमेय६३७७ यांनी रविवार, 27/10/2013 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रांतीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे.

मी, सियाचेन आणि कारगिल युद्ध…!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 27/10/2013 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुधीर मुतालीक जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडाजवळील केरन भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसण्याचा आगाऊपणा केला. आपल्या सेनेला त्या भागात दहा दिवस झुंजून घाण साफ करावी लागली. अर्थात तो प्रभाग स्वच्छ झाला आणि होणारच होता. १९७१ साली भारताकडून अत्यंत अपमानास्पद मार खाल्ल्याचा व्रण आपल्या ध्वजावर ठेवून पाकिस्तान गेली ४२ वर्षे वावरतो आहे. त्या मार खाण्याने अक्कल येउन भारताशी मैत्रिपूर्ण सबंध ठेवण्यात खरे तर पाकिस्तानचे हित आहे. पण त्यांच्या ठायी शहाणपण असते, तो तर पाकिस्तान कसचा? त्यानंतर त्यांचा रडीचा डाव चालू राहिला.

जि एस पी पी व्ही

लेखक कापूसकोन्ड्या यांनी रविवार, 27/10/2013 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
नामांतर पुणे विद्यापिठाचे. ही लिन्क here या बातमीत सुद्धा "ज्ञानज्योती" आणि " 'क्रांतिज्योती " असा घोळ शिर्षक आणि मुख्य बातमी यात आहेच. असो नांमांतर करताना नवीन झालेले नाव संक्षिप्त केले जाते, आणि त्याचा उद्देश सफल होत नाही.

इंद्रवज्र !

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 26/10/2013 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस, डोळे आणि म

रॉयल एन्फिल्ड - चौकशी

लेखक माकड यांनी शनिवार, 26/10/2013 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार!!! रॉयल एन्फिल्ड या विषयावर कोणाला माहिती असल्यास सांगणे. मी सुद्धा रॉयल एन्फिल्ड विकत घेण्याचं ठरवला आहे. तरी क्लासिक ३५०, standard ३५० किंवा thunderbird ३५० यामध्ये चांगला पर्याय सुचवावा. दैनंदिन वापरासाठी आणि tours साठी कोणते मॉडेल्स योग्य आहेत? एकंदरीच रॉयल एन्फिल्डला लागणारा maintenance, handling या बद्दल काही अनुभव असल्यास सांगावेत हि विनंती. धन्यवाद!

आनंदाने स्वीकारेन मी

लेखक फुंटी यांनी शनिवार, 26/10/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण आहे तू ऑनलाईन असूनही तुझ्याशी न बोलण कसं सांगू तुला मी की मी नाही दुर्लक्ष करू शकत तुझ्याकडे.. बोलण सोप्पंय ...सहज बोलू शकतो मी तुला की नाहीये माझा उद्देश तसा काही... तरीही कळत पण नाही वळत... मन वेड होऊन धावत तुझ्याकडे... माझ्या दूर होण्याने सुखी होणार असशील तू .. तरीही आनंदाने स्वीकारेन मी ते...

फटाकेमुक्त दिवाळी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 26/10/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी. फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात.