Skip to main content

गडांचा राजा, राजियांचा गड..!!

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 11/11/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
इतो राजगडं गत्वा गृहीतं राजदर्शनम्|| वर्षत्रयमितो गत्वा भवद्भिर्यगनुष्ठितम्|| K शिवरायांच्या पदपस्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड आणि राजगड या दोन्ही गडकोटांना नक्की जायचं हि फारा दिवसांपासूनची इच्छा मनात होती. पैकी गेल्यावर्षी इथल्याच मित्रमंडळींसोबत रायगडला जायचा योग अनपेक्षितरित्या जुळून आला होता. अनं त्यानंतरही सहा महिन्याच्या अंतराने पुन्हा जाणे झाले होते.

अद्भुत आविष्कार

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 11/11/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार निसर्ग हा खरेच अद्भुत किमयागार आहे. अश्या अनेक गोष्टींची निर्मिती त्याने अशी चुटकीसरशी केली की त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे निर्माण यांचे रहस्य उलगडा करण्यात हजारो वर्षे कमी पडतील. त्या कश्या निर्माण झाल्या? कोणी केल्या? आणि का आहेत याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. मग अश्या अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलत नसले की कालानुरूप त्या रहस्यावर धार्मिक रूढी वा अंधश्रद्धेचे टॉपिंग चढते. निसर्गात कुठे कधी आणि काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. सर्व काही नशिबाचाच खेळ. ते क्षण डोळ्यात आणि मनात साठवून घेणे एवढेच आपल्या हातात उरते.

॥ मुलखेडचा खंडोबा ॥

लेखक अनिल तापकीर यांनी सोमवार, 11/11/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
॥ ॐ मार्तंड भैरवाय नम:॥ मुलखेड, मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर खेडे. सगळीकडे हिरवीगार शेती, पाठीमागे आणि डाव्या बाजूला डोंगररांग डोंगरातील घनदाट झाडी, आणि उजव्या बाजूने गावाला वळसा घालून बारामहीने वाहणारी मुळा नदी नदीकाठी शंकराची दोन सुंदर प्राचीन मंदिरे , गावाच्या मध्यभागी विठ्ठल मंदिर आणि थोडे खालच्या बाजूला ग्रामदैवत भैरवनाथ तेही मंदिर पुरातन, आणि गावाचा पाठीराखा खंडोबा वरती डोंगरावर बसून गावाचे रक्षण करतोय. साधारणता बाराशे ते पंधराशे फुट उंचीचा खंडोबाचा डोंगर आहे.

शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित…

लेखक अव्यक्त यांनी सोमवार, 11/11/2013 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित… मी साधारण सन २००७ मध्ये शेअर मार्केट मध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे सदरहू गुंतवणूक केली आहे ती अश्शी… SCRIP NAME BUY PRICE GUJ ALKALIES AND CHEMICALS 134 HOTEL LEELA VENTURES LTD 35 INFOTECH ENTERPISES LTD 150 IGATE GLOBAL SOLUTIONS LTD 472 RANBAXY LABORATORIES LTD 420 RELIANCE CAPITAL LTD 412 RELIANCE INDUSTRIES LTD 873.25 RELIANCE POWER LTD 130 reliance power च्या ipo नंतर शेअरमार्केटकडे share मार्केट मधील मंदी मुळे दुर्लक्षच झाले ते आजतागायत… २००७ मध्ये जे शेअर खरेदी केले तेच शेअर आजपर्यंत घेवून बसलो

भाकरीचा चंद्र ....

लेखक psajid यांनी सोमवार, 11/11/2013 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
गरवेलाच छप्पर चिखलाच खापर, शमवावी तहान त्यांनी पिऊन मळकं पाणी ...... व्यापारी दुनिया व्यावहारिक माया, न्याहळतोय जरी तो उघडेना आपली वाणी ...... जगण्याला काय मोल हिथं नाय, सावकाराचा भार डोई व्याजाची गोणी ...... जन्माचा वैताग भाकरीचा चंद्र माग, देतील प्रसाद कधीतरी अन हिरावतील कंठमणी ...... लढेन म्हणतोय विरुध्द पण साथ नाही शुद्ध, रस्ता दाखवतील सगळेच पण संगे चालेना कोणी ...... श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग.

लेखक ज्ञानव यांनी सोमवार, 11/11/2013 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
विषय : समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग. डिस्क्लेमर : खाली दिलेली पद्धत हा एक दिशा दर्शक आहे. त्यातील जोखीम ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार, अनुभवानुसार जोखावी. तसेच ह्या पद्धतीत काही बदल करून मग ट्रेड करणे आवश्यक आहे असे जाणवल्यास योग्य तो बदल नक्की करावा. प्रथम एक भाग शेअर्स हि गुंतवणूक आणि ट्रेडिंग ह्यांचे एक combinition आहे. मग गुंतवणूक आणि ट्रेडिंगचा रेशिओ किंवा प्रमाण कसे ठरवावे कसे? आपले जेवढे वय तेवढी गुंतवणूक आणि बाकी उरली ती ट्रेडिंगमध्ये टाकावी. उदा. वय ३० असेल तर ३०% गुंतवणूक आणि ७०% ट्रेडिंग. असो तर बरेच जण मला ट्रेडिंगबद्दल विचारतात.

मी त्याला देव मानत नाही…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/11/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो... तो_१ छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची.

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/11/2013 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र) सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत. गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा. पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो. अवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे.

वचन

लेखक स्पा यांनी रविवार, 10/11/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसे हे लहानसेच खेडे,जेमतेम वस्ती असलेलं,आंबा-फणस,चिंच,नारळ-पोफळी यांच्या गर्दीत लपलेलं,वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेलं,आधुनिकीकरणाचा स्पर्शही न झालेलं,गावात ठराविक पाच पन्नास घरं,सताठ दुकाने असलेला जुनाट बाजार,एक छोटी शाळा, एक ग्रामपंचायतीचे घर,त्याला लागून पोस्ट. गावाला दुभागून जाणारा लाल मातीच्या लोटाने भरलेला रस्ता.हि सडक सरळ पार तालुक्यापर्यंत जाते.याच रस्त्याने पुढे गेलं कि हळूहळू गाव मागे पडतं, आपण सड्यावर येतो,भणाणत्या वाऱ्याने बरं वाटतं.एखाद दोन किलोमीटर अजून पुढे गेलो कि दोन फाटे फुटतात. एक सरळ तालुक्याला, आणि एक छोटी सडक खाली.

अव्यक्तांच्या समिधा

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 10/11/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज ना उद्या वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल.. तग धरून उभारलेली अंग चोरून वाळलेली आज ना उद्या घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या तुटता तुटणार नाहीत.. नाग-नागिणीसारख्या मिठ्या सुटता सुटणार नाहीत खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या कितीही खणलं तरी पुरून उरतील.. तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !! जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही.. शेजारी उगवूनही जपलेल्या विरहाची माती व्हायची नाही जोडी अचेतन झाल्यावर कुणी पाहीलंच जर..