Skip to main content

अल्का झाडकावकर यांच्या शोधाचे पुढे काय झाले?

लेखक संचित यांनी शुक्रवार, 15/11/2013 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
फार थोडेच शोध असतात ज्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन बदलण्याची क्षमता असते. अल्का झाडगावकर १०-१२ वर्षाआधी यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती करण्याचा शोध लावला. हा शोध असाच एक वाटतो. या संशोधनात बरेच काही बदलण्याची क्षमता आहे असे वाटत असतानाच काही म्हणावे तसे ऐकण्यात आले नाही. http://www.goodnewsindia.com/index.php/magazine/story/alkaz/ त्यामुळे त्यांच्या बद्दल बरेच प्रश्न पडतात. यावर कोणी मिपाकर प्रकाश टाकू शकेल का? काही प्रश्नः * झाडगावकर यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले.

हे....त्तिच्या बहीन

लेखक अमोल मेंढे यांनी शुक्रवार, 15/11/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक डाव माह्या सपनात श्रीदेवी आली. म्हने काळजी नोको करु तुले भेटनार हाये पैसेवाली. आंग पाय धुऊन दुसर्‍याच दिवशी मोहीम चालु केली. पन घराच्या बाहेर निंघाल्या बरोबर, घरचीच मांजर आडवी गेली. बस स्टँड वर ऊभा होतो तं, आल्या जींसवाल्या. म्या केसातुन हात फीरवला तं फिदीफिदी हासुन गेल्या. मनात म्हनलं आपन साली कारवालीच पाहाव. लगन करुन तिच्यासंग मंग भल्ली ऐश कराव. कार थांबवाले एकीची, हात पुढं केला. तं समोरुन येनार्‍या मानसानं, हातात रुपया टाकला. म्हने धडधाकट असुन भीक मांगाची लाज नाही वाटत काय तुले? म्हटलं, तु काय भिकारी समजला काय बे मले? मांगं पलटुन पाह्यलं तं एक कार येऊन थांबली. अनं तिच्यातली पोरगी मलेच

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.

लाकुंडी .........कर्नाटक.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/11/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मधे जी कर्नाटकची सहल केली त्यात गदग येथील लाकुंडची देवळे पहायची हे निश्चित केले होते. निराशा झाली नाही.

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

लेखक मन यांनी गुरुवार, 14/11/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद" हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार. (ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत) . . १.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!! २.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस? ३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस? ४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो. ५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार. ६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! ७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे!

'निरोप'

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 14/11/2013 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
जाहली वेळ समयाने केली खूण मौनातच वाजे वेदनेतली धून कालची पोर झाली केव्हा गे मोठी हक्काचे घरटे सोडुनि जाते पाठी हातांशी धरली इवली जेव्हा बोटे 'आधार तुझा ही', काळ बोलला खोटे कंठाने भरल्या कशी म्हणावी गाणी हसतानाही डोळ्यांतुन झरते पाणी सोहळ्यातुन हा क्षण नाहीसा व्हावा 'आहे अवधी' हा भासचि फक्त उरावा आता जाशील तू लांब निमिषार्धात मी तुटले सांधत असेन हलवित हात -- अमेय

"नो स्मोकिंग" समजलेला प्रेक्षक ?

लेखक मराठी कथालेखक यांनी गुरुवार, 14/11/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील काही धागे म्हणजे त्यातले प्रतिसाद बघताना असा दाट संशय मनात आला की "नो स्मोकिंग" सिनेमा समजलेला प्रेक्षक अस्तित्वात असावा, आणि त्यातही तो मिपावर आहे अशी शंका मनात आली. एखाद्या धाग्यावर विषयांतर करणे वा झालेल्या विषयांतराला खतपाणी घालणे (वा काडी लावणे ?) हे तत्वात वगैरे फारसे बसत नसल्याने "नो स्मोकिंग" या अचाट सिनेमाबद्दल नवीन धागा काढावा असा विचार मनी आला. हा चित्रपट मी डीवीडीवर ( अर्थात पायरेटेड : तत्वात बसवून घेतो हो.. पैशांचा प्रश्न आहे ना)अख्खा पाहिला म्हणजे झेलला (आयेशा टकिया करिता ते दिव्य केलं). त्या घटनेला आता काही वर्ष झालीत.

चाहूल एका सृजनाची

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी गुरुवार, 14/11/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल एका सृजनाची पाऊस एक आशा - भविष्याची पाऊस एक दिशा -ध्येयाची पाऊस म्हणजे हिरवळ -आनंदाची पाऊस म्हणजे दर्वळ -सुगंधाची पाऊस एक आधार -जीवनाचा पाऊस एक निर्धार -स्वप्नांचा पाऊस म्हणजे रिमझिम-संगीताची पाऊस म्हणजे किलबिल -बालपणाची पाऊस एक देवता -गाभाऱ्याला पाऊस एक पाहुणा -घराला पाऊस म्हणजे नवता -वसुंधरेला पाऊस म्हणजे उधान -सागराला चाहूल एका सृजनाची कथा साऱ्या जीवनाची केवढी रूपे त्या पा

उद्घाटन

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 14/11/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला. प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले. “कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं. “अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं. मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळं मी नेहमीच करते.

फुंकर

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 14/11/2013 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
वय जवळ करी मज दूर पळे तरुणाई मन आठवते लागते आळवू अंगाई क्रमल्या वाटा पाडियले पथ पण तरी वाटते अस्थाई स्थानक का कोठे अवघडले हरवली दशा नि दिशा दाही किंचित थोडे संचित काही फ़ुंकर घाली शमवी लाही शैशव दूजे नकळत देई स्पर्शाविण ऊर्जा या देही शोधीत सुखे परतून पुन्हा नव जुने बालपण येई विसरून जीर्णपण जन्माचे मउ कुशीत घेई आई ………………… अज्ञात
काव्यरस