Skip to main content

फुकेत-- थायलंड

लेखक सोनाली मुखर्जी यांनी शुक्रवार, 22/11/2013 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगायचं तर ट्रीपला जायला, फिरायला जायला मला विशेष आवडत नाही. सहलीला जाणे म्हणजे 'सुखातला जीव दुखःत घालणे', असं मला वाटतं. प्रवास, बाहेरचं जेवण, हॉटेलात राहणे हे मला तितकंसं मानवत नाही. पण आमच्या घरातल्या बाकी मंडळीना मात्र सहलीला जाणे, वेगवेगळी ठिकाणं पाहणे, adventure tour करणे हे सर्व अतिशय आवडतं. मग सगळ्यांनी नेट लावला, कि मीही तयार होते, आणि आम्ही जातो फिरायला कधी कधी. भारतात जेव्हा जेव्हा आम्ही सहली करता बाहेर गेलो, तेव्हा तेव्हा आनंदापेक्षा वैताग जास्त झाला, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे.

संस्कार

लेखक सोनाली मुखर्जी यांनी शुक्रवार, 22/11/2013 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आई नेहमी म्हणत असते, "काय हल्लीची मुलं हुशार झाली आहेत, आम्ही ऐकल्या नाहीत आणी पहिल्या नाहीत अश्या गोष्टी काय सहजपणाने वापरतात, आदित्य जो खेळ खेळतो फोनवर तो खेळायचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीं.” असं काही ऐकलं कि मला मात्र खूप गोंधळून जायला होतं, कि हल्लीच्या मुलांचं कौतुक करावं कि ते जगत असलेल्या परिस्थितीची कीव करावी? मला तर कधी कधी वाटतं कि आईवडील मुलांना वेळ देण्याच्या कटकटीतुन सुटका करून घेण्यासाठी त्यांना हि सगळी खेळणी देत असावेत किंवा मुलाच्या मित्रा कडे आहे, म्हणजे त्याच्या कडे असलेच पाहिजे, ह्या भावनेतून देत असावेत, ह्याला पियर प्रेशर असं म्हणतात.

मंगलयान - पूर्वार्ध

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 21/11/2013 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
उड्डाण पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती.काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल सध्या तरी फक्त उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.

दान

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 21/11/2013 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
दानं संविभाग:असा शंकराचार्यांचा दाखला देवून विनोबा भावे भूदानाचे समर्थन करीत (पक्षी: दान म्हणजे समान वाटप आणि म्हणून दान देणारा श्रेष्ठ नही आणि घेणारा कनिष्ठ नाही).. (संदर्भ : गुण गाईन आवडी) दान देण्याचे अनेक फायदे तसेच ते देण्यास उद्युक्त करणारे अनेक दाखले आपल्याला सापडतात, दान देणारा 'दानशूर' म्हणविला जातो. परंतु दान स्वीकारणारा कनिष्ठ का समजला जातो?

आनंद - कार्लसन डाव ९

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 21/11/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी. काय खेळणार आनंद? पहिली मूव कोणती? ई४ का?

भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग - १

लेखक गजानन५९ यांनी गुरुवार, 21/11/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग - १ खरे तर हा विषय थोडा ट्रिकी आहे कारण या विषयाव तीन गट पडतात एक जो अशा गोष्टींवर विश्वास आहे असा दुसरा ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते आणि तिसरा गट तळ्यात मळ्यात असतो या लोकांना कळतच नसते कि नक्की आपण कुठे उभे आहोत असे. हा विषय इथे मांडायचे कारण हेच आहे कि गेले काही दिवस माझा या गोष्टींवरचा विश्वास दृढ होईल अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत.

PLAN F शो मध्ये सहभाग

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 21/11/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या शनिवारी (२३ NOV) सायंकाळी सात वाजता(19.00) माझ्या मुलाखतीचा गुंतवणूक आणी अर्थ विषयक कार्यक्रम DSP BLACKROCK प्रायोजित Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - ५ हा CNBC TV -18 प्रसारित होणार आहे. हाच कार्यक्रम रविवारी(२४ NOV) सायंकाळी आठ(20. 00) वाजता पुनः प्रसारित होईल. याची झलक तू नळी वर उपलब्ध आहे. पण त्याच्या दुव्यावर टिचकी मारली तर तो भलतीकडेच जातो. पण वरील इंग्रजी शब्दच दुवा म्हणून तेथे टाकल्यास आपल्याला तो पाहता येईल. हा कार्यक्रम फारसा उपयोगी नाही असे माझे स्वतःचे मत आहे परंतु त्या कार्यक्रमानंतर देण्यात येणाऱ्या टिप्स चांगल्या असतात.

ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी -१

लेखक तिमा यांनी गुरुवार, 21/11/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
अरुणाचल प्रदेश हा खूपच मोठा आहे. अजून त्यातील सर्वच भागांत टुरिझम साठी व्यवस्था नाही, सध्या तेथील तेजपूर्,भालुकपाँग, बोमदिला,दिरांग, तवांग या भागात हॉटेल्स वगैरे दिसतात. आमचा ड्रायव्हर सांगत होता की संपूर्ण अरुणाचल प्रदेश बघण्यासाठी तो एका जर्मन ग्रुपला घेऊन दोन महिने फिरत होता.तेंव्हा, सध्यातरी एक सेव्हन सिस्टर्स ही १८ दिवसांची वा आम्ही केलेली थ्री सिस्टर्सची सहल हे पर्याय उपलब्ध आहेत. त्याहून जास्त माहिती त्यांच्या टुरिझम कडून मिळू शकेल. अरुणाचल मधले रस्ते अजून खराब आहेत. आपले बीआरओ तिथे सतत रस्ते करत असते.(मिलिटरीची एक डिव्हिजन).

आमचे नामकरण.. (DISCLAIMER)

लेखक नानबा यांनी गुरुवार, 21/11/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकर मंडळींना नमस्कार. प्रथम फडणीस या माझ्या आयडीचे नामांतर होऊन आता ते नानबा करण्यात आलेले आहे. बाकी आयडी मागील व्यक्ती, विचार तेच आहेत. इकडे मिपावर आणि व्हॉट्स अ‍ॅप, चेपु इ इ. ठिकाणी मिपाकर मंडळींनी ठेवलेलं हे नाव. म्हटलं आता मिपावरसुद्धा याच नावाने वावरावं. :) म्हणून हा DISCLAIMER प्रपंच. -नानबा. (पूर्वाश्रमीचा प्रथम फडणीस)