Skip to main content

अधुरी इक कहानी....

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी बुधवार, 04/12/2013 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आधुरी एक कहाणी अचानक येनारी वळवाची सर जशी आसमंतात एक अनमिक थांडवा देऊन जाते काहीशी तशीच अनुभूती, तिचे पहिले वाहीले दर्शन त्याला देऊन गेली!भाणावर आला त्यावेळी कळले की तो शाळेच्या मैदानावर आहे आणि त्याचे वर्गमित्र त्याला बोलावत होते.कुठल्याही १६-१७ वर्षाच्या किशोर्वयीन मुलाचे व्हावे तसेच झाले त्याचे पण !मन कुठेच रमेना...कुणाला विचारू ते कळेना.......पण विचारू काय तेही सुचेना !तसाच घरी आला,पण रात्रभरसारखे तीचेच रूप डोळ्यासमोर!डोळे उद्या पुन्हा तिला बघायला आसुसलेले! ती दुपारी दिसली होती म्हणजे हे नक्की होते की तिची आणि त्याची भेटी नक्कीच दुपारी होईल!पण राहून राहून त्याला इक प्रश्न सारखा सतावत होता

और नही बस और नही…

लेखक Atul Thakur यांनी बुधवार, 04/12/2013 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
Mahendra Kapoor काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही.

युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 04/12/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१ युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire .......ज्या इस्पितळात कर्स्टन त्याचे प्रशिक्षण घेत होता तेथे हेलसिंकीचा प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. कोलँडर नियमीत येत असे.

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 03/12/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.

एक आठवण / ती

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 03/12/2013 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडला. तिने पाठ फिरवली आणि पुढच्याच अर्थात पटेल चौक स्टेशन वर ती उतरली. मी पाहताच राहलो. त्या वेळी सुद्धा ती अशीच आयुष्यातून निघून गेली होती, काही न बोलता. पहिल्यांदा तिची भेट मंडी हाऊसच्या सरकारी वाचनालयात झाली. मला आठवते, वसंत कानिटकरांचे ‘प्रेम तुझा रंग कसा’ ह्या नाटकाचे पुस्तक चाळत होतो.

जे न देखे आम्ही...

लेखक हैयो हैयैयो यांनी मंगळवार, 03/12/2013 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
div { text-align:justify; text-justify:inter-word; }
काही वर्षांपूर्वी आम्ही एका कॉर्पोरेट कार्यालयात काही कार्यकाजाच्या निमित्ताने गेलो होतो. "कार्यकाजाच्या निमित्ताने" हे शब्दोपयोजन येथे दोन अर्थांनी आहे. एक तर आम्ही त्यांच्यासाठी काही कार्य करणार होतो आणि दुसरे म्हणजे त्या बदल्यात ती लोकं आमची काही कार्ये करणार होती. त्या संबंधात आमचे त्यांच्याकरिता करावयाचे कार्य तसे "दुय्यम" होते. म्हणजे, त्या लोकांचे कार्यकाज आम्हांस पटले, भावले, आणि मुख्यत: त्यांची कार्यपद्धती आम्हांस तृप्तीकर झाली, तर शेवटी त्यांस आम्ही आमच्या एक प्रकल्पावर घेणार होतो.

सिंटॅक्स- मिपावरील शब्द

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 03/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट) चानचान (छानछान) जौदे बै (जाउ दे बाई) चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब) जिलब्या (लेख) पिंक (प्रतिक्रिया) हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट) ह्घ्या (हलके घ्या) या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.

नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्र (विडंबन)

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी मंगळवार, 03/12/2013 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, ('असुद्लेखन'च्या चुका चालु ठेवत) प्रत्येक हौशी मराठी माणसाप्रमाणे मी ही मिपावर लेखन करण्यास बरेच दिवसांपासुन खुप उत्सुक होते. बरिच स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की 'मिपा' म्ह्णजे फक्त मराठी साहित्य न्ह्वे.

कथा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 03/12/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो.

एकला चालो

लेखक ज्ञानव यांनी मंगळवार, 03/12/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८८,डिसेंबर तिला प्रथम भेटलो मी. सकाळी सात वाजता सगळे मित्र मैत्रिणी रायगड पिकनिक साठी पु.लं.च्या भ्रमण मंडलागत उभे होतो. ढापण्या विनायक टीम लीडर सर्वांना काहीबाही सूचना देत होता मैत्रिणी ते ऐकत उभ्या होत्या आणि मित्र "पकवतोय रे!! मंजुला इम्प्रेस करतोय" सारखे वाग्बाण त्याच्या दिशेने भिरकावत त्याला टेन्शन देत होते. मी बस स्टोपच्या रेलींगला पार्श्वभाग adjust करत हे सगळे पाहत होतो. कोवळी उन्हे सगळ्यांच्या अंगावरून झिरपत होती, किंचित थंड वातावरण त्यामुळे काही जणांचे चेहरे दिसत नव्हते पण एक गुलाबी कि चंदेरीशी छटा सर्वांची एक औट लाईन दाखवत होती.