Skip to main content

काळ्या गाजराची कांजी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 19/01/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते.

स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास भाग २: आणि शरद पवारांची बस कायमची चुकली

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 19/01/2014 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला परिस्थिती अनुकूल असताना एखादा महत्वाचा निर्णय धडाडीने वेळेत घेतला नाही तर तशी अनुकूल संधी परत येतेच असे नाही आणि मग बस चुकते ती कायमचीच.अशा परिस्थितीत हळहळ व्यक्त करण्यापेक्षा फारसे काही करता नाही.आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात अशी वेळ नक्कीच येतात.मग राजकीय नेतेही त्याला अपवाद कसे असतील?माझ्या मते अशी वेळ एकदा नक्कीच आली होती.आयत्या वेळी महत्वाचा निर्णय घेताना लागणारी धडाडी न दाखविल्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे नेते व्हायची संधी त्यांनी घालवली. ३० मार्च १९९७ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतला.त्यामागे तात्कालिक असे कोणतेच कारण नव

विवाह कायदा आणि विधी

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 19/01/2014 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या... स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते.

मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे ! - भाग दुसरा

लेखक आनंदराव यांनी रविवार, 19/01/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/26634#comment-547109 मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे ! वरील लेख लिहिल्यावर त्याचा पुढचा भाग आज लिहितोय. कार्यबाहुल्यामुळे सवड झाली नाही. जे लोक पुढील भागाच्या प्रतिक्षेत होते आणि जे नव्हते त्यांची पण जाहिर माफी मागुन सुरुवात करतो. दुसर्‍या दिवशी जरा उशिराच उठलो. कालचा driving चा शीण होता आणि कालचे सराफा बाजारात खाल्लेले असे काही अंगावर आले होते कि सकाळी डोळे लवकर उघडलेच नाही.

क्ष-गफ ला पत्र

लेखक वडापाव यांनी रविवार, 19/01/2014 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण छोट्याशा गैरसमजावरून मोठ्ठंसं भांडण झालं. नेहमीप्रमाणेच माझे जुने माफ केलेले (माफ करण्यापूर्वी घातलेल्या थैमानाचा आता, 'तरी मी शांतपणे सहन केलं होतं ते सगळं' असा न विसरता उल्लेख) अक्षम्य गुन्हे पुन्हा वर उपसण्यात आले!! मी सगळ्या शंकां-कुशंकांचं निरसन केलं, पण रूळावर पडलेल्या तीन मेजर धोंड्यांपायी गाडी जागची हलेना. नुसतीच भोंगा वाजवत बसली. वाजून वाजून शेवटी भोंगा थकला आणि गाडीने ट्रॅकच सोडून दिला.

जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 18/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
भायखळ्याचं जिजामाता उद्यान. जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल. हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच.

आप की बदमाशियोंके....

लेखक विकास यांनी शनिवार, 18/01/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्‍याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात... वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत.

प्रचाराची रणधुमाळी

लेखक सचीन यांनी शनिवार, 18/01/2014 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का?

काsssssssssssssयपो छे......... ( ईन्टरनॅशनल)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 18/01/2014 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा..... काSSSSSSयपो छे.... http://misalpav.com/node/16556 संक्राम्तीच्या निमित्ताने पुन्हा अहमदाबादच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथला पतंगमहोत्सव हा अवर्णनीय असतो. गरब्याप्रमाणेच पतंग हाही गुजरातच्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संक्रान्तीला सगळेजण पतंग उडवत असतात. मुले मुली आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्र सगळे जणू मिळून अक्षरशहा दिवसभर आकाशात असतात. सगळा गुजरात पतंगमय झालेला असतो.

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

लेखक माहितगार यांनी शनिवार, 18/01/2014 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स.