खरं तर जिजामाता उद्यानात जाण्याची आणि मिपा कट्ट्याला येण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे अनायासे एकाच तिकीटात दोन पक्षी मारायला मिळण्याची आयती संधी चालून आल्यावर ती मी सोडेन कशी?? ठरल्याप्रमाणे मिपा कट्टा सुरळीत पार पडला. त्याच्या वृत्तांताचा एक भाग मी, आणि दुसरा (माहितीपूर्ण) भाग सुंधाशूनूलकर यांनी फोटोंसकट मिपावर टाकायचा, असं ठरलंय!! कट्ट्यातले मी पाहिलेले आणि माझ्या लक्षात असलेले प्रसंग इथे सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. चू.भू.द्या.घ्या.
राणीच्या बागेत घरची माणसं फार फार वर्षांपूर्वी गेली होती. त्यांनी मला 'कॅमेरा घेऊन जा' असा सल्ला दिला.