Skip to main content

शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...

लेखक विनोद१८ यांनी गुरुवार, 06/02/2014 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो....!! मी आत्ता नुकतीच एक बातमी दै. लोकसत्ता'मध्ये वाचली, कदाचित आपणही ती वाचली असेल. 'आप' ने शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दिवसात त्याचे दिल्लीच्या एकन्दरीत राजकारणावर काय परिणाम होतील ?? यावर विचारमन्थन व्हावे असे वाटते, सदर बातमीचा दुवा खाली देत आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-government-moves-against… विनोद१८

एक गीत

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 06/02/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर, आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे. ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे, परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे ! एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की, अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे? हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले? तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे? बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा, ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे! पुढील कडवे मात्र नवीन आहे बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी, ये फिरुन परतुनी, डोळ

मुखपृष्ठ

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/02/2014 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आपण सर्वांनी मिपाकर जयंत कुलकर्णी म्हणजेच आपले लाडके जकुकाका यांच्या रसाळ अन अभ्यासपूर्ण अशा युध्दकथामालांचा आनंद घेतला असणार. मीहि त्यांच्या लेखनाचा मोठा फॅन आहे. या युध्दकथा त्यांच्या आगामी "युध्दाचे वादळ" या मोठ्या ग्रंथउपक्रमाचा भाग आहे हे त्यांनी नमूद केलेलेच आहे. तसेच या ग्रंथासाठी मुखपृष्ठ कसे असावे किंवा चोखंदळ मिपाकरांकडून काही कल्पना आहेत का यासाठी त्यांनी धागा पण काढलेला होता. त्यालाच प्रतिसाद म्हणून याचे डिझाइन्स मी स्वतः करावे असे वाटले.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २

लेखक मराठी कथालेखक यांनी गुरुवार, 06/02/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://misalpav.com/node/26930 २) रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली.

स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास-भाग ३: राष्ट्रपतींचे अभिभाषण

लेखक क्लिंटन यांनी गुरुवार, 06/02/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास-भाग ३: राष्ट्रपतींचे अभिभाषण राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे लोकसभा निवडणुक झाल्यानंतर झालेले लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आणि प्रत्येक कॅलेंडर वर्षातील पहिल्या अधिवेशनाच्या सुरवातीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढे अभिभाषण करतात.या अभिभाषणाचा मसुदा केंद्रीय मंत्रीमंडळाने बनविलेला असतो आणि राष्ट्रपती ते भाषण केवळ वाचून दाखवितात.अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानणारा 'धन्यवाद प्रस्ताव' संसदेकडून पास केला जातो.मुळात अभिभाषणाचा मसुदा केंड्रीय मंत्रीमंडळाने बनविलेला असल्यामुळे त्यात सरकारच्या धोरणांचा अंत

जीवती

लेखक रामदास यांनी गुरुवार, 06/02/2014 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे.

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग २

लेखक Atul Thakur यांनी बुधवार, 05/02/2014 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी येथे राजयोगासाठी पातंजल योगसूत्र आणि हठयोगासाठी हठप्रदीपिका व घेरंडसंहीता असे एकूण तीन ग्रंथ विचारार्थ घेतले आहेत. शिवसंहीता, गोरक्षसंहीता व इतर अनेक उपनिषदे जरी योगविषयाला वाहिलेली असली तरी वरील तीन ग्रंथ हे राजयोग, हठयोगासाठी सर्वसमावेशक आहेत. जो काही फरक यांत व इतर ग्रंथांत असेल तो काही तांत्रिक तपशिलांवर असेल. सूत्रबद्ध मांडणी हे प्राचीन संस्कृत ग्रंथांचं वैशिष्ट्य. ही सूत्र लहानशीच असतात मात्र यांत प्रचंड अर्थ लपलेला असतो. अधिकारी माणसं त्यावर भाष्य करुन सर्वसामान्यांसाठी तो अर्थ विशद करतात. याच परंपरागत पद्धतीत पातंजल योगसूत्राचा समावेश होतो.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/02/2014 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- ७) http://misalpav.com/node/26846...पुढे चालू "यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ! ========================================== याद्यांचं उत्तर रामायण संपलं. पण याद्या द्यायच्या म्हणजे गुरुजि लोकांनाच बहुशः त्यातल्या आज्ञार्थी अर्थानुसार वागावं लागतं. यजमान (हल्लीच्या भाषेत क्लायंटं.. ) याद्या न्यायला येण्याऐवजी फास्ट लाइफ स्टाइलच्या तडाख्यामुळे आंम्हासच विनवितात.. "गुरुजि यादी तुंम्हीच आणून देता का? प्ली...ज! " प्लीज या शब्दाचा आतला अर्थ नो एस्क्यूज,असा असल्यामुळे आंम्हीही त्या नेऊन देतोच!

मुळ्याचे पराठे

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 05/02/2014 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आमच्याकडे इतकी बेक्कार करडी,ढगाळ,कंटाळवाणी हवा आहे,फारसं करता येण्यासारखं काही नाही म्हणून एखादा जुना हिंदी सिनेमा टाइमपास म्हणून लावावा असं मनात आलं आणि मग तेच केलं.. आणि कोणत्याही पॅकेज डिल मध्ये येतात तसे 'बी ए पास' आणि बेटे के लिए खाँस 'मुली के पराठे','गाजर का हलवा','खीर' इ. इ...

मिपाचे नविन सदस्य

लेखक बरखा यांनी बुधवार, 05/02/2014 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मिपाचे नविन सदस्या॑साठी मिपावरी नविन सदस्यत्व मिळाले अतिविचाराने मग लेख मि ट्॑कले प्रतिसादा॑चा हा पाउस पडला लेखाची मग खिल्ली उड्वुनी गेला| एक-दोन प्रतिसादा॑नी दिलासा तो मिळाला पुन्हा आमचा तो ट्॑कनाचा प्रयत्न सुरु झाला विचार करोनी मग लेख मी ट्॑कला प्रतिसाद न आले तया लेखनाला||:( ट्॑कनाचा मग नाद मी सोडिला केवळ वाचनात मी जीव गु॑तवला आवड्ले लेख तर प्रतिसाद मी दिला लेखाला न मिळाले एवढे प्रतिसाद त्याला||| :) धन्य हो मिपा आणि मिपाकरहो कधी घेति उचलुनी डोक्यावर हो तर कधी पाडती धाड्कन तो॑डावर हो|||| :( तरीही मिपा वाटे आपलेसे सख्या नात्याहुन ही घट्ट ईथली नाति करी चेष्टा मस्करी तरि न होई दुखी कोणी