Skip to main content

माझ्या बहिणीच्या आवडीची डाएट पाकृ

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 10/02/2014 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल गेले होते हॉटेल पर्णकुटीला. सोबत बहिणी अन भाचरांची ग्यांग. एकजात सगळे अट्टल मटनखाऊ. पण बहिण म्हणाली 'मी डाएटवर. !' ‘मग बटाट्याची भाजी सांगू ?’ मला जोडी मिळाली म्हणून मी खुश. ‘हुं ?’ बहिणाबाईने हे कुठलं वडगाव बुद्रुक पेश्शल अशा काहीशा नजरेनं माझ्याकडे कटाक्ष टाकला. ‘मी बाई फीssश खाणार ! त्यात कोलेस्टेरोल नसते ना ?’ बहिण. मी गार. ‘अगं कोलेस्टेरॉल मासा किंवा बकऱ्यात थोडीच असते ? ते आपल्या रक्तात असते.’ ‘होय, होय माहितेय बरं, विदुषीबै !

Autism.. स्वमग्नता..

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी सोमवार, 10/02/2014 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात  व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून  हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या  मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..

आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग १ ... खजूराच्या वड्या....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 10/02/2014 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच सांगून ठेवत आहे. १. हा पदार्थ आपापल्या कुवतीनुसार खावा. २. तसा हा साखरयुक्त पदार्थ असल्याने, ज्यांना मधूमेह आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा. ३. माझी फोटोग्राफी कशी आहे, हे आता वेगळे सांगायला नकोच. ४. मी अद्याप इथे फोटो चढवण्यात कुशल झालेलो नाही.जसे जमले तसे चढवले.कुणाला टोचल्यास मंडळ जबाबदार नाही. कुणालाच न टोचल्यास आम्ही आभारी आहोत. ५. भरपूर व्यायाम केल्याशिवाय ह्या पदार्थाच्या वाट्याला जावू नये.पण खूप थकवा जाणवत असेल तर नक्की खा. ६. संपादकांना नम्र विनंती, की माझ्या कडून काही लेखनाच्या चुका झाल्या असल्यास सुधारून देणे.तसदीबद्दल क्षमस्व.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ३

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 10/02/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 ३) मै जानता हू के तू गैर है मगर यूही आठव्या इयत्तेत तुकड्यांची सरमिसळ होवून नवीन तुकड्या बनल्यावर अपर्णा आणि अजित एका वर्गात आलेत. वर्गातील अनेक मुली अजितसाठी नवीन होत्या. मुलींबद्दल खूप आकर्षण वाटावं असंच ते वय होतं. अजितला सुध्दा काही सुंदर मुली आवडू लागल्या. पण हळूहळू इतर मुलींचा विसर पडून फक्त अपर्णाच आवडू लागली. ती सर्वात सुंदर नक्कीच नव्हती. पण आकर्षक होती.

निळा पक्षी (बुकोवस्कीची क्षमा मागून)

लेखक मनिष यांनी सोमवार, 10/02/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
लिहितांना बुकोवस्कीच्या ब्ल्यूबर्ड चा अनुवाद करायचा नाही किंवा संपुर्ण त्या कवितेवर आधारीत कविता लिहायची नाही हे नक्की होतं. नंतर लिहिलेल्या काही कडव्यांवर अर्थातच बुकोवस्कीचा प्रभाव जाणवेल, पण तरीही ती बर्‍यापैकी स्वतंत्र झाली आहे असं मला वाटतं. बुकोवस्की माहित नसतांना जी कविता मनात जाणवली होती पण शब्दात उतरली नव्हती, ती शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय...

पाटीलेखन : एक उपेक्षित साहित्यप्रकार

लेखक सू डोकू यांनी सोमवार, 10/02/2014 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाट्याबाबतचा अभिनेते संजय मोने यांनी लिहलेला एक लेख एका वर्तमानपत्रात नुकताच वाचण्यात आला. त्यात त्यांनी दिलेली काही उदाहरणे अशी ‘फोटो वाईट आल्यास फोटोग्राफरला दोष देऊ नका. तुमच्या पालकांचाही त्यात हिस्सा असू शकतो.’ ‘चौकश्या थांबवा! आमच्या दिलीपचे लग्न जमले.’ ‘विमा एजंटांनी आत येऊन त्रास देऊ नये आम्ही अमर आहोत.’ ‘इथले वाढपी आमचे नोकर आहेत तुमचे नाही. सबब नीट वर्तणूक ठेवा.’ ‘इथले पदार्थ खाऊन माजा.

डे चे फंडे

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 10/02/2014 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील जनतेने पाश्चात्य संस्कृतीतल्या नेमक्या चुकीच्या गोष्टीच उचलल्यात, आत्मसात केल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.

सकाळचा "च्या" ( वपु/शंकर पाटील .... स्टाईल )

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/02/2014 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/4715 "सकाळचा "च्या" "चहा" हा विषय घेवून व पु / शंकर पाटील कसे लिहीतील याची एक झलक. वपु:- बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यतुन निपजली त्या टाळक्याला सलाम. हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो.

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग ३

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 09/02/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
हठप्रदीपिकेत पाच उपदेश आहेत. ज्यात योगातील चार अंगांचा विचार केला आहे. आसन, प्राणायाम, मुद्रा व समाधी याबद्दल तपशीलवार माहिती पहिल्या चार उपदेशात मिळते. पाचव्या औषधीकथन उपदेशात योगाभ्यास करताना काही शारीरिक उपद्रव झाल्यास काय उपाय करावे याचा उहापोह आहे. योगाभ्यासाच्या फलप्राप्तीचे जागोजाग उल्लेख आहेत. यातील तांत्रिक भाग जरी क्षणभर बाजुला ठेवला तरी हठप्रदीपिकेचे ग्रंथकर्ते स्वात्माराम यांनी राजयोग, हठयोगाबद्दल केलेल्या काही मार्मिक विधानांचा विचार येथे करणे भाग आहे.