पाट्याबाबतचा अभिनेते संजय मोने यांनी लिहलेला एक लेख एका वर्तमानपत्रात नुकताच वाचण्यात आला. त्यात त्यांनी दिलेली काही उदाहरणे अशी
‘फोटो वाईट आल्यास फोटोग्राफरला दोष देऊ नका. तुमच्या पालकांचाही त्यात हिस्सा असू शकतो.’
‘चौकश्या थांबवा! आमच्या दिलीपचे लग्न जमले.’
‘विमा एजंटांनी आत येऊन त्रास देऊ नये आम्ही अमर आहोत.’
‘इथले वाढपी आमचे नोकर आहेत तुमचे नाही. सबब नीट वर्तणूक ठेवा.’
‘इथले पदार्थ खाऊन माजा. टाकून माजू नका.’
एका पुस्तकाच्या दुकानातील पुस्तकांच्या वर्गीकरणानुसार लावलेल्या तीन पाट्या ‘1) उत्तम साहित्य 2) लोकप्रिय साहित्य 3) सुशिक्षीत म्हणून मिरवण्याचे साहित्य’
हा लेख वाचून पाटी संस्कृती व तिचे रक्षक ही संस्कृती जोपासत आहेत याचे समाधान वाटले. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय लोकांपर्यंत पोहचविणारे पाटी एक जबरदस्त ताकदीचे माध्यम आहे यात वादच नाही. पाटीलेखन (म्हणजे पाटी लिहणारा पेंटर नाही) ही एक कला आहे. मंदीर, बसस्थानक, हॉस्पीटल अशा सार्वजनिक ठिकाणी लिहलेल्या पाट्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने सूचना, मार्गदर्शन, विनंती सरळपणे केलेली दिसते.
पण खाजगी घरमालक, दुकानदार व व्यावसायिकांनी लावलेल्या ‘अनुभवसिध्द’ पाट्यामधून सूचना, मार्गदर्शन, विनंत्या मात्र सरळपणे न करता त्यातून तिरकसपणे, कल्पकतेने त्रागा, संताप, खोचकपणा, तिरकसपणा, छद्मीपणा, उपहास, टोमणे, विनोद, कुचकेपणा अशा अनेक छटा त्यातून व्यक्त केलेल्या दिसतात. त्यामुळेच या पाट्यांची मजा काही वेगळीच असते. त्यातील शब्दांवरुन पाटीलेखकाच्या स्वभावाची कल्पना वाचणाऱ्यांना येण्यास (त्यांना प्रत्यक्ष न भेटतासुध्दा) मदत होते.
चार ओळींच्या चारोळ्यांना साहित्यात स्थान आहे, तर एक ओळीपासून सुरू होणाऱ्या काही ओळींच्या या पाटीलेखनाला का नसावे? पण दुर्देवाने महाराष्ट्रभर विखुरलेले पाटीलेखक असंघटीत असल्यामुळे कदाचित या मागणीला पाहिजे तसे बळ मिळाले नसावे.
किमान शब्दात कमाल आशय आणि त्यातून लेखकांची कल्पकता व त्यांच्या स्वभावांचे विविध पैलू व्यक्त करणाऱ्या या कला प्रकाराचे प्रदर्शन (प्रत्यक्ष पाट्या नाही तरी किमान त्यांच्या छायाचित्रांचे तरी) दरवर्षी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भरवून या दुर्लक्षित, उपेक्षित कलेचा गौरव केला जावा ही अपेक्षा.
वाचने
2759
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
दरवर्षी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भरवून या
पुण्यातला 'पु'
In reply to दरवर्षी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भरवून या by मुक्त विहारि
त्यांच्या अस्मितांसारखाच 'र्
In reply to पुण्यातला 'पु' by सूड
स्पेलिंगमध्ये र्हस्व असला
In reply to पुण्यातला 'पु' by सूड
मिपा वरच किती साहित्यिक आहेत
जी! जी!
In reply to मिपा वरच किती साहित्यिक आहेत by सुबोध खरे
आमचा पण थोडा हातभार
In reply to मिपा वरच किती साहित्यिक आहेत by सुबोध खरे
"पूणे शहर पाट्यांसाठी
जबरी
In reply to "पूणे शहर पाट्यांसाठी by आदूबाळ
त्या "नो पार्किंग आहे" च्या
In reply to जबरी by बॅटमॅन
ठ्ठो =))
In reply to त्या "नो पार्किंग आहे" च्या by आदूबाळ