Skip to main content

मन रे

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 11/02/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मन रे धाव रोखुनी घे सरती मागे सोस वयाचे निजलेले ना अजुनी जागे रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे मन रे धाव रोखुनी घे……. असलेले ओंजळीतले जग श्वास तयास लगडलेले बघ घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे मन रे धाव रोखुनी घे……. मरण अखेरी शून्य सोबती झुळुक वादळे येती जाती वातीविण तेवे ना पणती धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे मन रे धाव रोखुनी घे……. ……………. अज्ञात
काव्यरस

गणेशा मोड

लेखक राजो यांनी मंगळवार, 11/02/2014 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव चा सभासद झाल्यापासून (वाचनमात्र असताना सुध्दा) अनेक लेखांच्या प्रतिसादांमधे "माझा गणेशा झालाय" आणि अशाच प्रकारचे कोड्यात पाडणार्‍या कमेंट्स असायच्या.. नंतर लक्षात आले कि गणेशा या आयडी ला लेखांमधील चित्रे दिसत नसत, त्यामुळे हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे.

"यू अ‍ॅटीट्यूड" संकल्पनेकरीता मराठी शब्द हवा

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/02/2014 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे. सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.

"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......

लेखक psajid यांनी मंगळवार, 11/02/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी.पा. च्या दिवाळी अंकामध्ये शिवोssहम यांनी "तालीम" ही खूप चांगली कथा लिहली. एकेकाळी राजाश्रय मिळालेल्या या उपेक्षित कुस्ती प्रकाराबद्दल त्यांनी खूप चांगले लिहून पुन्हा ते सोनेरी क्षण डोळ्यापुढे उभे केले. आजही "महाराष्ट्र केसरी" "हिंद केसरी" या सारख्या स्पर्धा इथे भरतात. यातील "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न ! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन हि संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ''महाराष्ट्र केसरी '' या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.१९५३ साली हे अधिवेशन सुरु झाले.

एम अँड दी बिग हूम

लेखक धन्या यांनी मंगळवार, 11/02/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
em ही आहे एक इंग्रजी कादंबरी. लेखनाचा ढाचा कादंबरीचा आहे म्हणून कादंबरी म्हणायची.

बरंच बरंच काही...

लेखक जुईचे फूल यांनी मंगळवार, 11/02/2014 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
आकांक्षेच्या भरारीने उजळून निघतं सारं आणि "जगण्या"च्या काळोखात भरडून निघतं सारं मनाला उभारी मिळता मिळता ध्यास कोलमडत जातो हाकेच्या अंतरावरला हेतूही दिसेनासा होतो तरीही... धावत आलो, धावत असतो, धावत राहणार मी भविष्याच्या पडद्याआड साचलेलं पहाणार मी शोधत राहणार सुख-बिख फिरत दिशा दाही तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही जाणीव नेणीवेच्या मधेच मी झुलत राहतो असाच आत बरंच वाटत राहतं, बाहेर काही तिसराच बदलण्याचा आव...

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 11/02/2014 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ.

गॉन विथ द विंड - एक अद्भुत अनुभव

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 11/02/2014 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
'गॉन विथ द विंड' या नावाने नेहमीच एक रहस्यमय मोहिनी घातली होती. ठिकठिकाणी हे नाव वाचले, ऐकले होते. कधी खोलात जाऊन या नावाभोवतीचं वलय काय आहे हे बघावं असं मनापासून वाटलं नाही. उत्सुकता होती पण आळस म्हणा किंवा बाकीचं नीरस जगणं जास्त आवडलं होतं म्हणा, बरीच वर्षे टंगळमंगळ करण्यात गेली. दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक परममित्र किरण गायकवाड याने विश्वास पाटलांचं ' नॉट गॉन विथ द विंड' हे पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या मात्र मी अक्षरशः प्रेमात पडलो. सलग दोन वेळा वाचून काढलं.

ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मंगळवार, 11/02/2014 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला लेख: Autism.. स्वमग्नता.. http://www.misalpav.com/node/26984 ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

काळा घोडा फेस्टिवल कट्टा - वृत्तांत (१)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्‍या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो. शनिवार ८ तारखेला सी एस टी च्या आसपास भेटायचे ठरले होते. मी थोडा आळस केला आणि आम्हाला म्हणजे माझ्यामुळे रामदासनाही जरा उशीर झाला. आम्ही घाटकोपर गाठतोय तो मुविंचा फोन!