Skip to main content

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा आणि मराठी विकिपीडिया संपादनेथॉन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 07/03/2014 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे.

पंजाबी भरवाँ करेला (भरली कारली)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 07/03/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः ३-४ लहान कारली (व्यवस्थीत सोलाण्याने साल खरवडून घेणे) २-३ चमचे खरवडलेले कारल्याचे साल / खडबडीत भाग (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ कांदा उभा चिरलेला २-३ लसूण पाकळ्या + पेरभर आले चिरुन २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) थोडीशी कोथींबीर १/२ टीस्पून हळद १ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर किंवा चिंचेचे बुटुक ही वापरु शकत

.....हु S श जळली मेली पुरुषजात ती

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 06/03/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
टीप :- हा धागा वाचण्या पुर्वी आयला या बायका म्हणजे......हुS श हा धागा वाचावा.
"चल गं मी गेलो " असे म्हणाले आणि हे दार लावुन ऑफिसला निघुन गेले. जरा वेळाने स्वंयपाक घरातुन बाहेर आले. म्ह्टंल सकाळपासुन नुसतं काम काम.

शेअर बाजार उच्चांकावर---- आपण काय करावे ??

लेखक प्रसाद भागवत यांनी गुरुवार, 06/03/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई, फेब्रुवारी १९९२,--- तो स्व. हर्षद भाईंचा जमाना होता, संध्याकाळी उशीरा ICWAI च्या अभ्यासिकेतुन बाहेर पडताना शेअर बाजाराच्या ईमारती जवळ फटाक्यांचे बरेच आवाज ऐकले. पुढे ट्रेन मध्ये कळले की सादर झालेल्या अनुकुल अर्थसंकल्पामुळे 'सेन्सेक्सने' म्हणे पहिल्यांदाच 3,000 अंकाची पातळी गाठली होती. जिकडे तिकडे बाजारातील तेजीचच चर्चा होती. "काय जोशी साहेब, आता पुढे काय वाटते?? अहो, रिटायरमेंटसाठी म्हणुन घेतले होते ACC चे शेअर्स, पण वर्षभरातच दामदुप्पट झाले की ---" एक यशस्वी गुंतवणुकदार त्यांच्या दुसर्‍या, तितक्याच यशस्वी, मित्रास विचारत होते.

शिक्षा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 06/03/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
म्या लिवत व्हते. आईशप्पत. तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ” म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.” आदी हाताचेच अंगठे पकाडले. समदी हसाया लागली. गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे. गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले. पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली. केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं. पाय दुखायले. येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा. डोळे पुसले. मान वाकडी करून बायेर पायलं. रस्त्यावर मोत्या बसला व्हता.

जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/03/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात.

मंगलाष्टक वन्स मोअर - पाणचट टू द कोअर!

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 06/03/2014 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता.

गुजरात विकासाचे मृगजळ..

लेखक बंडा मामा यांनी गुरुवार, 06/03/2014 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे. संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे. प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे.