Skip to main content

ओवाळणी

लेखक मीराताई यांनी बुधवार, 09/04/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्यासारखंच मुलांना बालमंदिरात सोपवून आम्ही मैत्रिणी घरी निघालो. सकाळच्या धावपळीनंतर हे मैत्रिणींसोबत गप्पा करत, हसत-खिदळत घरची वाट चालणं म्हणजे सगळा शीण घालवून उत्साहाची ओंजळ भरून घेणं असायचं. त्या दिवशीच्या गप्पांत विषय दिवाळीचा होता. सण तोंडावर आलेला. सुटीचे बेत, सणाची खरेदी. एकेकीचा उत्साहा उतू चालला होता. त्यातच एकजण हसत सांगू लागली, काल मी यांना विचारलं, 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' तिच्या हसण्याला इतरांनीही साथ दिली. मला मात्र त्या क्रूर विनोदाचं हसू आलं नाही. तिच्यावर झालेल्या त्या वाराने माझंच मन विध्द झालं, पार विस्कटलं.

मँगो पार्फे

लेखक मनिष यांनी बुधवार, 09/04/2014 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
करायला सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आंब्याची डेलीकसी - मँगो पार्फे (Parfait). एकदा साहित्य जमवले, आणि फळे कापून तयार असली की काही मिनिटातच तयार होते, आणि तितकीच लवकर फस्त होते! :-) खास करून लहान मुलांची अतिशय आवडती डीश. आंब्याच्या मौसमाचे आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी अतिशय चविष्ट, थंडगार पाककृती. ह्या प्रमाणात ३ ग्लास मँगो पार्फे तयार होईल. साहित्य:
  • ३ मध्यम आकारचे हापूस आंबे, बारिक चिरलेले.
  • ३ ते ४ इतर फळे, बारीक चिरलेली.

युरोपांश - पॅरीस.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 09/04/2014 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
विमानाचे पाय जमिनीला आणि माझे हात आकाशाला एकाच वेळी टेकले. पॅरीस..पॅरीस जन्मभर ज्या बद्दल वाचलं होतं त्या शहराच्या भूमीवर उतरणे रोमांचकारी होते. ह्या वर्षी ३ मार्चला पॅरीस शहरी दिलेली भेट निवांत शिवाय सपत्निक होती त्यामुळे आनंद द्विगुणित करणारी आणि विशेष रोमांचकारी होती. मिपा सदस्य इस्पिकचा॑ एक्का ह्यांचा 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' हा लेख वाचल्यापासून ते डोहाळे लागले होतेच त्यातच इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या लंडन शहरातील एका पुस्तक प्रकाशनाच्या जाहिरातीने लक्ष वेधून घेतले आणि विचार ठाम झाला ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचीच.

केरळ ट्रिप

लेखक वैभव.पुणे यांनी बुधवार, 09/04/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात कुटुंबीया समवेत केरळ राज्यी जाऊन आलो . पुणे - मुंबई - एर्नाकुलम- मुन्नार- थेक्कडी - त्रिवेंद्रम - पुणे असा ६-७ दिवसाचा भेट ठरवला होता . 1 मुंबई - एर्नाकुलम दुरान्तो एक्स्प्रेस ने रात्री मुंबई सोडले.

आठवणीतील मराठी (इमेल) ग्रूप्स आणि संस्थळे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 09/04/2014 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली. या काळात बरीच मराठी इमेल ग्रूप्सही तयार झाली त्यात माझ्या आठवणीतला म्हणजे मराठी पीपल २ हा याहू ग्रूप.

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 09/04/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 09/04/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
के-२ : द सॅव्हेज माऊंटन ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मिस़ळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे. एव्हरेस्टच्या तुलनेत के २ हे चढाईसाठी कठीण आणि के २ वरील संदर्भग्रंथही तुलनेने ब-याच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. या लेखमालेच्या निमीत्ताने माझ्या संग्रहातील पुस्तके आणि इंटरनेटवरील लेख पुन्हा वाचण्याचा योग आला. ही लेखमाला आपल्याला कशी वाटली हे जरुर कळवा ********************************************************************************************* के २ च्या इतिहासात १९८६ आणि २००८ ही दोन वर्षे सर्वात घातकी म्हणून नोंदली गेली आहेत.

माझं मत कुणाला.....

लेखक निलरंजन यांनी मंगळवार, 08/04/2014 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला माझं मत त्याला रे माझं मत त्याला.... विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)

पुष्पांजली

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 08/04/2014 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्‍याचे बटण दाबण्याचा धनी !