Skip to main content

मँगो पार्फे

लेखक मनिष यांनी बुधवार, 09/04/2014 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
करायला सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आंब्याची डेलीकसी - मँगो पार्फे (Parfait). एकदा साहित्य जमवले, आणि फळे कापून तयार असली की काही मिनिटातच तयार होते, आणि तितकीच लवकर फस्त होते! :-) खास करून लहान मुलांची अतिशय आवडती डीश. आंब्याच्या मौसमाचे आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी अतिशय चविष्ट, थंडगार पाककृती. ह्या प्रमाणात ३ ग्लास मँगो पार्फे तयार होईल. साहित्य:
  • ३ मध्यम आकारचे हापूस आंबे, बारिक चिरलेले.
  • ३ ते ४ इतर फळे, बारीक चिरलेली. मी १ सफरचंद, २ किवी आणि वाटीभर द्राक्षे घेतली होती.
  • स्ट्रॉबेरी किंवा इतर आवडत्या स्वादाचे योगर्ट.
  • स्ट्रॉबेरी क्रश ६ मोठे चमचे. इतर कुठलाही आवडता क्रश घेऊ शकता.
  • ३ मोठे चमचे बारीक तुकडे केलेला सुका मेवा - मी आक्रोड, काजू आणि पिस्ते घेतले होते.
  • थोडेसे मध किंवा बटरस्कॉच सिरप, सजावटीसाठी.
mango fruits yogurt
कृती:
  1. ग्लासात सगळ्यात खाली आंब्याच्या बारीक फोडि टाकून घ्याव्यात. साधारण १ आंबा एका ग्लासासाठी ह्या प्रमाणात.
  2. आंब्याच्या फोडींवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी योगर्ट टाकावे.
  3. ह्या योगर्टवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घ्यावे.
  4. आता ह्यावर बारीक कापलेल्या फळांच्या फोडी टाकाव्यात.
  5. आता वरून १ चमचा बारीक तुकडे केलेला सुका मेवा आणि ३-४ थेंब मधाचे किंवा बटरस्कॉच सिरपचे टाकावे.
  6. हे भरलेले ग्लास आता फ्रीजरमधे १५-२० मिनिटे ठेवावेत, ही डीश थंडगार किंवा थोडी बर्फाळच छान लागते - त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे फ्रीजरमधे जास्त वेळ ठेवता येईल.
  7. parfait
  8. बस्स!! फ्रीज मधून बाहेर काढा आणि उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी ह्या थंडगार, स्वादिष्ट 'मँगो पार्फे' वर ताव मारा. लहान मुले असतील तर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर लगेचच फस्त होईल ह्याची गॅरंटी!
Mango Parfait - Ready To Eat
लुत्फ घ्या थंडगार मँगो पार्फेचा! :D

वाचने 15208
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

कसलं कलरफुल आणि टेंप्टिंग दिसतय. असं वाटतय शेवटचा ग्लास लगेच उचलुन घ्यावा. असं केलं तर...स्ट्रॉबेरी क्रश, मध किंवा बटरस्कॉच सिरप नुसतच न टाकता ग्लास गोलाकार फिरवत घातलं तर नक्किच एक आकर्षक डिझाईन तयार होईल (ते नाहि का चॉकलेट सीरपचं असतं तस)

In reply to by सूड

मी तिथे नाही खाल्ले कधी. मला वाटते एक मॉलमधे माझ्या मुलानी खाल्ले आणि मग आम्ही घरीच करतो....अगदी हापुस घेतला तरी मॉलपेक्षा स्वस्त पडते! :P

मस्त दिसतंय! आणि हेल्दी पण. मात्र तीन हापूस आंबे? कसे परवडणार?

In reply to by पैसा

कमी आंबे टाका आणि प्रभो म्हणतो तसे जस्त योगर्ट टाकायचे. हाकानाका! :-) मला फळे जास्त आवडतात म्हणून फळे जास्त टाकली. ह्यात जेली टाकुनही मस्त लागते.

In reply to by मनिष

जास्त योघर्ट वापरण्यापेक्षा आंब्याची मात्रा कमी करून सोबत स्वस्तातली मस्त पिकलेली पपई वापरून पाहा. मुलांना-नवर्‍याला कळणारही नाही. शिवाय फ्रुट परी फ्रुट झालेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

नाही हो! माझ्या ४ वर्षाच्या मुलाला हापूस आणि इतर आंब्यांचा फरकही पहिल्या घासाला समजतो! :-)

In reply to by मनिष

अगदी माझ्या मुलाला हि हा फरक लगेच कळतो .तो सध्या पाउणेचार वर्षाचा आहे ..तरिहि ...+)

बरेच पार्फे खाल्लेत पण इतका सुंदर कधी पाहीला नाही. मात्र सुकामेवा/ओट्स वगैरे आवडत नाही. कडक असतात अन हिरड्यांना टोचतात. जास्त योगर्ट अन मऊ मऊ फळे घातलेले पार्फे आवडतात.

In reply to by शुचि

ओट्स नाही चांगले लागणार, पण मधात बुजलेले काजू, आक्रोड नक्कीच छान क्रंची लागतात. बदाम कदाचित जास्त कडक लागतील.

In reply to by मनिष

अरेच्या ओटस नाही सॉरी ग्रॅनोला म्हणायचे होते :) ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला इथे खातात. ग्रॅनोलातही - ब्लूबेरी/स्ट्रॉबेरी/व्हॅनिला वगैरे प्रकार आहेत. अर्थात ते त्या त्या एस्सेन्स मध्ये मुरवलेले/सुक्या बेरीज घातलेले वगैरे असतात. पण जाम टोचतात.

In reply to by आजानुकर्ण

कावर्‍यांची मँगो मस्तानी अन पिस्ता मस्तानी ..... खाऊन १० वर्षं झाली. असो. अप्रतिम असते एवढेच नोंदवते.

In reply to by आजानुकर्ण

स्वतः आपण? मस्तानी जाऊ दे अप्/डाऊन, पण तुझ्या सहीत ही कॉग्रेसची जाहिरात? हेच पहायचे राहिले होते?

In reply to by आजानुकर्ण

विनोद सांगा तरी, नै समजले तर सोनियाजी राहुलबाबाला भरवतात तसं भरवा आम्हाला. हाय्काय नि नाय्काय! ;)

In reply to by आजानुकर्ण

असावी. बाजीराव गेल्या पासून तिला तसं कुणी वाली नाहीच म्हणा ;) पार्फे बर्फघून गार्फार वार्फाटले आर्फाहे. ;)

छान दिसते आहे. आता इथे हापूस शोधणे आले. सध्या तरी केंट म्यांगोज मिळालेत आणि त्यातला एकच पिकलाय.

सुंदर पाककृतीची लाजवाब सजावट. वेळ मिळताच करून पाहण्यात येईल. असेच फळांचे तुकडे वापरून, जेली घालून फ्रिजमध्ये थंड आणि घट्ट करून त्याचे काप काढतात. तेही छान दिसते आणि लागते.

काय रंगसंगती आहे मस्तचं पार्फेची कृती आवडली आंबे मिळताच करुन बघीतली जाईल :)

मुवि, अद्वेय, निवेदिता-ताई, सोत्रि, aparna, सानिकास्वप्निल आणि सर्वच प्रतिसाद देणार्‍यांचे आभार! (खुद के साथ बातां: असाच जरा तिथेही प्रतिसाद मिळाला तर? आम्हालही जरा हुरूप येईल ना! ;-))

क्लास ! मला फळे मोजकीच आवडत असली तरी बघायचा आनंद मिळाला.

मनीष अतिशय सुंदर सादरीकरण. आठवड्यातून एक दोनदा ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला असतेच त्या मुळे हा पदार्थ जास्त जवळचा. फळे आणि योगर्ट मुळे मस्त रंगसंगती साधली आहे. फोटो आवडले........