Skip to main content

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/04/2014 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही. स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले.

तिला समुद्र आवडतो...

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 19/04/2014 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिला समुद्र आवडतो... तिला पाऊसही आवडतो... आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे तिचा रूसवा कळतो त्याला तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं... पाठीवर स्पर्श जाणवला की सुसाट सुटतो तो काही बोलत नाही, विचारतही नाही ती तिच्याच रूसव्यात दंग एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली... समुद्राच्या दिशेने धावलेली... वळून त्याच्याकडे बघताना भरून आलेलं आभाळ अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...

.......चीनमधे व्हायरस

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 19/04/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
चीनचा एक प्रांत आहे सिकीयांग, तिथले आतंकवादी चीनमधे आतंक माजवतात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आश्रय मिळवतात. मागे चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी झरदारी अंकल पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा झरदारींना याबाबत सूचना दिली होती. की चीनमधल्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पनाह(आश्रय) मिळता कामा नये. याकडे आम्ही भारतीय कसे पाहतो... चीन पाक सहकार्य गेली अनेक वर्षे अधिकच दॄढ होताना दिसते आहे. पण पाकिस्तानबरोबर हस्तांदोलन करताना चीनच्या शरीरात काही व्हायरस शिरत आहेत.

येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - २ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 19/04/2014 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला बिबट्या, मग तर काय विचारायलाच नको ! १९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता.

अजित पवार, धरण आणि धमकी

लेखक काळा पहाड यांनी शनिवार, 19/04/2014 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे. 'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.

मतदान---शंभर टक्के

लेखक निलरंजन यांनी शुक्रवार, 18/04/2014 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही नक्की होतेय काय ? कशी होईन समर्थ लोकशाही? मतदान सक्तीचे करावे का? लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का? मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची? निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल? तुमचे प्रत्येक प्रामाणीक प्रतिसाद मिळवून देईल देशाला महान मग तुमचा प्रतिसा

(( वाढीव ))सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी शुक्रवार, 18/04/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.

गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 18/04/2014 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता.

व्यवहारज्ञान

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 18/04/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा चांगलाच उत्साह दिसत होता. तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल... मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय . म्हणजे त्यात तिने कॉलेज मध्ये जाऊन कुठली पदवी संपादन केली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच ती सारं काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी.

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 18/04/2014 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.