(( वाढीव ))सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल
फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.
कसे जाल: कुंदगोळ हे हुबळी पासून केवळ १६ कि.मी. वर आहे. पुणे-बंगलोर(रा. म. क्र. ४) वर धारवाड-हुबळी बायपास संपला कि गब्बुर हे ठिकाण येते. तिथून २ कि.मी. अंतर मधेच डावीकडे कुंदगोळ ला रस्ता जातो. पूर्वी तिथे फलक होता. आता दिसला नाही. रस्ता चुकून सरळ ४० कि.मी. गेल्यावर चूक लक्षात आली. परत फिरून मधेच एका गावात राईट मारून गुन्दगोळ ला पोहोचलो.
गाव यथा तथाच आहे.तिथे एक स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि.ठिक आहे. वाडा कुठे आहे हे तरीनित सांगीतले. तिथे गेल्यावर पण आनंदच होता. वाडा सुंदर असून पण "आत पूजा चालू आहे" सोडणार नाहि. हे उत्तर मिळाले. गंधर्वांचे वडील येथील नाड्गिर वाड्या मध्ये क्लार्क होते आणि त्यांनी गन्धर्वाना आश्रय देवून फार मोठे उपकार केले आहेत असे दाखवण्याचा तेथील सध्याच्या पिढीचा प्रयत्न होता. अनेक वेळा विनंती केल्यावर सकाळी ८ च्या आधी आणि दुपारी ३ नंतरच प्रवेश मिळेल असे काही तरी सांगितले. रामाभौंची केवळ एक मूर्ती पाहायला मिळाली. तरीही तो सुंदर वाडा, त्याच्या बाजूचा गोठा वगेरे पाहून परत निघालो. भीमसेन जोशी जिथून पाणी भरून घागरी घेऊन जायचे तो तलाव कम विहीर वाटेत लागते. ती पाहून बिलकुल निराश न होता हुबळी चा रस्ता धरला. पर्यटनाला गेल्यावर निराशा होते कधी कधी…ठीक आहे. पण वाडा पहिल्यचे समाधान होते. आपण याचे देणे लागतो, हि जागा निट केली पाहिजे असा काहीसा भाव मनात आला. याचे कारण देखील समजले…राम भाऊ अथवा भीमसेन यांना कर्नाटक जवळचा वाटत नव्हता. तेथील लोकांना विशेष किंमत नव्हती यांच्या गुणांची।म्हणुन इतर ठिकाणी पर्यटन वाढवणाऱ्या या राज्याने रामभाऊ अथवा भीमसेन यांच्या घरी काही विशेष संघ्रहालय मात्र केलेले नाही.
गंगुबाई हंगालांची गोष्ट तशी नाही. या उलट गंगुबाई हंगालांच्या घरी उत्तम सहकार्य मिळाले. घर जरी २-५ बंद असले तरी मी कराडहून आलो आहे हे सांगितले मग त्यांनी प्रवेश दिला. सर्व ४ खोल्यांमध्ये दिवे लावले मग सुरु झाला फोटोंचा धडाका. एवढा कि त्या माणसाने मला विचारले…."पाहायला आलाय का फोटो काढायला?" मी लगेच फेकले "ऑफ्कोर्स…बघायला…पण डोळ्यात मावत नाहीये म्हणून फोटो काढून घरी जाउन नीट पाहीन"…त्याला गोळी पचली. गंगुबाई हंगालांच्या घरी मात्र मस्त स्मारक आहे. हुबळी च्या देशपांडे नगर मध्ये हे घर आहे. इथे त्यांचे अनेक गायक, राजकारणी यांच्या बरोबर चे फोटो आहे. अनेक वाद्य ठेवली आहेत. तिथे गाण्याचे वर्ग देखील चालतात…त्याला अजून "कोचिंग" चे रूप आलेला नाहि. त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार येथे नीट जवळून पाहता येतात. याचे काही फोटो देत आहे. एका मागून एक सुंदर फोटो, साहित्य होते…सतारी, तंबोरे, तबले, पेट्या …किति मोजु…!! पुरस्कार आणि भेट वस्तू यांचा खच पडला होता. पहिल्यांदा मी माझ्या डोळ्याने पद्म भूषण आणि पद्म विभूषण हे स्वताच्या डोळ्यांनी पाहत होतो…आता जास्त वर्णन न करता सरळ फोटो पहा.
(( वाढीव ))
आज सकाळी हुबळी इथे गंगुबाई हनगल यांच्या नावाने संगीत गुरुकुल चालवले जाते याची माहिती मिळली. लगेच तिकडे दौरा काढला. कर्नाटक सरकार ने संगीताच्या पंढरीत हा उपक्रम केला आहे. अतिशय छान जागी, डोंगराच्या पायथ्याशी ६ एकर जागेवर हे गुरुकुल बांधले आहे. ३० विद्यार्थी व सुमारे ६-८ गुरुजन हे कायम स्वरूपी इथे वास्तव्याला आहेत. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ करीयर संगीतात करता यावे म्हणून हि सोय आहे. विद्यार्थ्यांना मानधन देखील दिले जाते. आधुनिक आणि पारंपारिक चा सुंदर मिलाफ येथे आहे. रीयाझा साठी उत्तम बैठक व साथीला छान वाद्य-वृंदा आहे. कायम गाण्याचे सूर इथे दरवळत असतात. तसेच सोलर हीटर, पाणी शुद्धीकरण अशा आधुनिक सोयी, स्वतंत्र लायब्ररी अशा अनेक सोयी आहेत. योग्य ठिकाणी सरकार ने पैसे खर्च केल्याचे समाधान वाटले पण आमच्या दळभद्री महाराष्ट्र सरकार ची पण आठवण आली कम स्वताची लाज वगेरे नेहमी प्रमाणे वाटली…सांगली-मिरज सारख्या संगीत पंढरी मध्ये असे काही का होऊ शकत नाही? नारायणराव बालगंधर्व यांच्या सारखा गायक जिथे झाला आणि ३-३ मोठे मंत्री ज्या जिल्ह्यातून आहेत अथवा आमच्या कराड गावात मुख्यमंत्री आहेत अथवा यशवंतराव चव्हाणन सारखे रसिक व दूरदर्शी नेतृत्व होते तिथे हे कधी होणार? आमची अस्वस्थता संपत नाही …!!!
पुढील भागात:बाइक वरून बंगलोर- म्हैसूर-बंदीपूर-मुदुमलाई- उटी- कुनूर

वाचने
7615
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
श्री गणेशा.
In reply to श्री गणेशा. by आनंद
फोटो दिसत आहेत का?
लेख आवडला.
वा!!
भरपूर छायाचित्रे आहेत. अशा
In reply to भरपूर छायाचित्रे आहेत. अशा by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
+१
एक चांगले काम केलेत .संगीत
लेख आवडला, धन्यवाद!
स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि. ठिक आहेहे काही झेपलं नाही; स्मारक असेल आणि ते सरकारी असेल तर त्याला 'मालक' कसे?]In reply to लेख आवडला, धन्यवाद! by बहुगुणी
बरोबर आहे तुमच…!!!
खुपच छान!
खुप भाग्यवान आहात मालक,
In reply to खुप भाग्यवान आहात मालक, by किसन शिंदे
आभारी आहे
In reply to आभारी आहे by पुतळाचैतन्याचा
ठुमर्या म्हणायचे असेल
In reply to ठुमर्या म्हणायचे असेल by शुचि
गलतीसे मिस्टेक हो गया. ठान्कू
In reply to गलतीसे मिस्टेक हो गया. ठान्कू by किसन शिंदे
sorry ठुमरी चे अनेकवचन
वाहवा!
In reply to वाहवा! by पैसा
+++१११
In reply to वाहवा! by पैसा
स्मारक
खास कर्नाटकी शैलीतला वाडा
आभार ..
धन्यवाद..
वेगळाच.
मस्त लेख आणि छायाचित्रे.
संगीत समारोह
इतकी सुरेख माहिती आणि फोटो