Skip to main content

वंशवेल

लेखक सुब्बु यांनी गुरुवार, 24/04/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही .

रेडीओ

लेखक मालविका यांनी गुरुवार, 24/04/2014 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराल

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 24/04/2014 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई, भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही ----पगला गजोधर

'सकाळ' मधे येणारे फोटो

लेखक यदुनाथ यांनी गुरुवार, 24/04/2014 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात. जसे १. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो - राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा - सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो - ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो - परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना - सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो २. नेहमी येणारे फोटो - ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो - पुलावरील नक्शीचे ग्रिल - पवार कुटुबिय असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...

परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 24/04/2014 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.

नॉस्टॅल्जिआ

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 24/04/2014 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले. म्हटले चला जरा पूर्वीसारखा ग्यालरीत पाय पसरून, कोरा करकरीत, घडी न मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन, वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत, कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत, आतून येणार्‍या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर -नी त्याच्याच मागील खिडकीवरही- एक डोळा ठेवून, चेहर्‍यावर येणारी चहाची वाफ हुंगत, ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा, पहिला घोट घेऊन पाहू. पण छे!

(केजरीवाल जगातील प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्याने...)

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/04/2014 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत.

आयाळ असलेला वाघ - १

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 24/04/2014 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
शिकार कथा सांगणं ही एक कला आहे. ऐकणा-याची किंवा वाचणा-याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे शिका-याचं प्रमुख उद्दीष्ट असतं. शिकारीच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची आणि आलेल्या अपयशाची तो उजळणी करत राहीला तर ते कंटाळवाणं च-हाट होण्याची शक्यता असते. आलेल्या अपयशाचा भाग वगळला तर प्रत्येक शिकार - वाघाची असो वा चित्त्याची - हा काही दिवसांचा आटपणारा आणि हमखास यशस्वी होणारा साधा सऱळ मामला असतो अशी समजून होण्याची दाट शक्यता असते. प्रत्यक्षात मात्र परिस्थीती बरोबर उलट असते. अनेकवेळा शिका-याला पराभवाचं तोंड पाहवं लागतं. काही ना काही कारणाने अपयशाचा सामना करावा लागतो.

'तेंडल्या'

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 24/04/2014 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
1 उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचण्याला ४-५ वर्षे होऊन गेली असावीत. होय! हे यासाठीच असं लिहीलंय कारण, माझ्या लहानपणी म्हणजेच ९० दशकाच्या सुरूवातीला मुलाला शाळेत घालायचं असेल तर आत्ताच्या सारखं त्याचं वय न पाहता उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचला की मुलगा शाळेत जाण्यायोग्य झाला असेच समजायचे. शाळेच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी नावाचं भीती घालणारं पुस्तक अजून अभ्यासाला आलं नव्हतं. ९२ चा विश्वचषक पाकड्यांनी जिंकून वर्षे-दोन वर्षे उलटली होती.