Skip to main content

गुढी उभारनी

लेखक माहितगार यांनी सोमवार, 05/05/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी ) गुढीपाडव्याचा सन आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी गेलसालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा .........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view ......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा.

अशीच एक फँटसी..(३)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 05/05/2014 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) गुरूदेवांची भेट घेण्यासाठी उर्मीला विषय माहिती असणे गरजेचे होते. शनिवारी संध्याकाळी अर्णवने उर्मीला आपल्या स्मरणशक्ती(?)चे दोन्ही किस्से कथन केले. ...अन त्याच्या कल्पनेप्रमाणेच झाले. उर्मी जे हसत सुटली ते काही केल्या थांबेचना. शेवटी त्याने दोन्ही हातांची घडी घातली अन पायावर पाय टाकून गंभीर चेहेऱ्याने सोफ्यावर बैठक मारली. पाच सात मिनिटे हसून लोळून झाल्यावर अखेर त्याचा चेहेरा बघून उर्मी त्याच्याजवळ जाऊन बसली.

काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!

लेखक निनाद यांनी सोमवार, 05/05/2014 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी? काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी! माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार? पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच! माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या. अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा. तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात. मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात.

लव्ह - ट्रँगल (Love-Triangle)

लेखक बोबो यांनी सोमवार, 05/05/2014 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------------------- रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे. आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, जतीन आहे.

मुंबई गर्ल !

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 05/05/2014 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचीच गोष्ट. तब्येत बरी नसल्याने ऑफिसला अर्ध्या दिवसाने जात होतो. दुपारची वेळ, प्लॅटफॉर्म क्रमांक ‘१’ वर बेलापूर ट्रेनची वाट बघत उभा होतो. इतक्यात पलीकडल्या रुळावर बोरीबंदरला (आताच्या सीएसटीला) जाणारी ट्रेन लागली. आपल्याला जायचे नाही त्या दिशेची ट्रेन आधी येणे हे नेहमीचेच. मलाही तशी काही घाई नव्हती पण उकाड्याने जीव हैराण झाल्याने फलाटावर फार वेळ ताटकळत उभे राहण्यात रस नव्हता. पण या तप्त वातावरणातही समोरच्या ट्रेनला काही वीर दाराला लटकलेले दिसत होते. रोजचेच असल्याप्रमाणे त्यांच्या आपापसात कुचाळक्या चालू होत्या. आत बसायला जागा असूनही उन्हे झेलत बाहेर दाराला लटकण्याचे ते एक कारण असावे.

९० डिग्री साऊथ - ४

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 04/05/2014 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ३. अ‍ॅमंडसेनने फ्रिट्झॉफ नॅन्सनलाही तपशीलवार पत्रं लिहून आपल्या योजनेची कल्पना दिली. पेरी आणि कूकने उत्तर धृव पादाक्रांत केल्याच्या आलेल्या बातम्यांमुळे उत्तर धृव गाठण्याच्या मूळ बेताला हादरा बसल्याचं त्याने नमूद केलं. इतक्या तयारीनंतर आता उत्तर धृवाऐवजी दक्षिण धृवाकडे जाण्याविषयी गत्यंतर नसल्याचं त्याने नॅन्सनला कळवलं. मूळ योजनेतील बदलाविषयी दिलगीरी व्यक्त करण्यासही तो विसरला नाही ! अ‍ॅमंडसेनच्या या बदललेल्या बेताची माहीती नॉर्वेला पोहोचताच एकच गोंधळ उडाला.

पाणी

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 04/05/2014 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
जलरुपी आसु गालावर ओघळले नवजन्माचे सोहळे साजरे जाहले कधी त्रुप्तीचे माध्यम बनले अत्रुप्तीचे प्रतिक आसवातुन बनले कधी उद्काच्या रुपाने हाती घेतले नवसोबतीस नवआयुष्याचे साक्षीदार बनले अखेर मडक्यातील पाणि बाहेर झेपावले माझ्यासोबत तेही पंचतत्वात विलीन जाहले ----------------------------------------------------------------------------------- टिप== प्रतिक्रिया देताना हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घ्या अन्यथा एक भावी कवी इथेच मारला जाईल त्याचबरोबर माझ्या वयाचा विचार करुन सांभाळून घ्यावे

हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 03/05/2014 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच शिरशिरी मग .. प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते ! प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू माणूस जात साली जातीवरुन जाते सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते ! येशील का कधी तू, ते सांग आज राणी सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते आताच त्या सुखाने माझा लिलाव केला सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते मी कामगार आहे, मजला सुटी कशाला माझी सुटी तशीही घामावरुन जाते भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही खुर्चीवरुन येते

भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ?

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 03/05/2014 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी बरोबर धनुर्धारी, पदाती बरोबर पदाती युद्ध करेल. सूर्यास्त झाल्यावर युद्ध बंद होईल. स्त्रिया, किन्नर, सेवक हे युद्धात भाग घेणार नाही आणि यांच्यावर कुणी हात ही उचलणार नाही.

साजण / काही चोरोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 03/05/2014 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या) (१) लपत छपत तो बिछान्यात येतो गोड गोड गाणी कानात म्हणतो कधी चुंबितो कधी चावतो सारी रात्र मला तो छळतो का सखी साजण? ना सखी डास. (२) कधी काळी येतो गोड गोड बोलतो खोटी वचने देऊनी सर्वस्व लुबाडीतो का सखी साजण? ना सखी नेता. (३) कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज