Thrills on Wheels
Thrills on Wheels
(Thane - Statue of Unity - Thane)
पूर्वतयारी
डॉ अश्विनीला हॉस्पिटल मध्ये ८ दिवसांची सुट्टी मिळणार होती. वेगळं काहीतरी करायला हवं अस दोघींच्याही डोक्यात होत पण काय ते ठरत नव्हतं. सुट्टी तर नक्की झाली. श्रीनिवास ने नेहमीप्रमाणे दोघींनी बाईक टूर करा म्हणून आयडिया दिली आणि तेजानंदसह आम्हीही ती उचलून धरली. आता कुठे जायचं यावर एकमत होईना. चौघांचा व्हॉटस् अप ग्रुप करून चर्चा सुरू झाल्या. दोन दिवस सायकल चालवत जायचं, दोन दिवस विश्रांती घ्यायची आणि दोन दिवस सायकल चालवत परत यायचं असा ढोबळ आराखडा ठरला. टुरिंग असल्यामूळे BRM सारखं फास्ट जाणं, स्पीड मेन्टेन ठेवणं वगैरे नव्हतं.
मिसळपाव
त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.