Skip to main content

पिझ्झा ऑन (थीन क्रस्ट) ब्रेड!!!

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 04/08/2014 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
Final 1 साहित्यः पिझ्झा सॉस साठि:(करायचा कंटाळा असेल तर रेडिमेड बाजारात मिळतो) १. लालबुंद टोमॅटो - ३ २. ४ ते ५ पाकळ्या लसुण ३. १ छोटा बाउल ऑलिव्ह ऑईल ४. १/२ छोटा बाउल टोमॅटो केचप ५. पिझ्झा सीझनींग (हे रेडिमेड मिळतं) - २ चमचे ६.

मन रे .....

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 04/08/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
भकास सारीपटावर कुरतडलेल्या स्वप्नांसकट सीतेच्या नकारालाही रावणल्यालं मन ! मांगल्याचा ओढीमध्ये निर्जीव कातळासवे पदस्पर्शाच्या आभासात राऊळल्याल मन ! चंचल पाऊसवेळी कोपर्‍यावरच्या झाडाखाली नाजुक बोटाच्यां गुफणीत, क्षणभर स्थिरावल्याल मन ! शमेना देह तपन जन्मदुखः अशोकवृक्षाचे सुखाच्या मृत्युभयाला वांझोटल्याल मन ! विचारकल्लोळीचा वाकस एकांती समुद्रस्पर्धेत विश्वकर्माच्या रंगसंगतीत माणुसघाण्यावल्याल मन ! सडा रक्तचिखलाचा तुडविला अनवाणी सफेद संगमवरावर डागाळल्याल मन !

एका संध्याकाळेचा निरोप….!

लेखक वटवट यांनी सोमवार, 04/08/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ: एक संध्याकाळ .... तसं पहायला गेलं तर त्याच्या तिच्या आयुष्यात संध्याकाळचं महत्व अनन्यसाधारण… त्याच्या तिच्या असंख्य क्षणाची मूक साक्षीदारंच ती… त्यांच्या "क्षणांना" झालेली सुरुवात… त्यांनी गाठलेली सर्वोच्च पातळी… त्यांचे रुसवे-फुगवे….

नाते गंधाशी.

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 04/08/2014 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
गंध ........... आपल्या जीवनात गंध हा अविभाज्य घटक आहे.(फक्त ज्यांना वासच येत नाही त्यांचे माहित नाही.)पण सर्वसाधारणपणे गंधाशी आपले जीवन निगडीत असते. सुगंधाशी जवळीक आणि दुर्गंधापासून पलायन ही सर्वसामान्यपणे गंधाविषयीची प्रतिक्षिप्त क्रिया. लहानपणापासून ते आत्तापर्यंत निरनिराळ्या गंधांशी काही आठवणी जोडलेल्या आहेत.काही सुखदायक काही वेदनादायक. लहानपणी सुट्टीमध्ये गावी जायचो (संसरी, नाशिक) त्याकाळी घरात चुली असायच्या.त्यात जळण म्हणून गोवऱ्या जाळल्या जायच्या.तो धूर घरातील सर्व वस्तूंना प्रेमाने आपल्या कवेत घ्यायचा.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 03/08/2014 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/28048 >>> आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही ............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!! असा टाइम'बॉम्ब उडवतो... मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो! ============== होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो.

(कॉफी कशी करावी?)

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी रविवार, 03/08/2014 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप कॉफीला अर्धा कप पाणी ...दोन चमचे साखर घाला...एक चमचा कॉफी घाला... उकळा ...बाजूला दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवा. कॉफी चांगली २ मिनिटे मुरु द्या आणि मग अर्धा कप दुध घाला. हि सर्वसामान्य पद्धत. पण कॉफी 'नक्की' कशी करावी ???

चहा नक्की कसा करावा ??

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 03/08/2014 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ???

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 03/08/2014 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे .

हवा हवाई

लेखक आयुर्हित यांनी शनिवार, 02/08/2014 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर अशा अर्थाच्या हिन्दी वाक्याने, कवयित्री बहिणाबाईंना स्मरून हा हिन्दी भाषेतील चित्रपट सुरु होतो. खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. पुजा झाल्यावर अचानक देवासमोरचा दिवा विझतो.

गोळ्यांची आमटी

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 02/08/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोळ्यांसाठी साहित्यः डाळीचे पीठ १ वाटी ज्वारी पीठ २ चमचे तांदूळ पीठ २ चमचे तिखट २ चमचे लसूण १ चमचा ठेचलेला आले १/४ चमचा जिरे १ लहान चमचा हिंग चिमुटभर हळद चिमुटभर खा.सोडा चिमुटभर मीठ चवीनूसार तेल २ चमचे (मोहनासाठी)