मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कॉफी कशी करावी?)

पुण्याचे वटवाघूळ · · पाककृती
एक कप कॉफीला अर्धा कप पाणी ...दोन चमचे साखर घाला...एक चमचा कॉफी घाला... उकळा ...बाजूला दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवा. कॉफी चांगली २ मिनिटे मुरु द्या आणि मग अर्धा कप दुध घाला. हि सर्वसामान्य पद्धत. पण कॉफी 'नक्की' कशी करावी ??? कुणी काही प्रयोग करते का ?? मी जनरली अर्धा लिटर दुधाची पिशवी फोडून त्यात अर्धा कप पाणी घालून तापवायला ठेवतो त्यात 'मद्रास कॉफी' ३-४ चमचे तयार ठेवतो ...आणि दुध तापायला लागले कि थोडी थोडी कॉफी घालून हलकेच ढवळतो मधून मधून ...(साय पण विरघळली पाहिजे) ...GAS मंद करून हळूहळू एक हलका चॉकलेटी रंग येईस्तो प्रक्रिया चालू ठेवतो आणि मग गाळून (वरील चोथा थोडासाच दाबून...फार नाही) मग ती वाफाळती कॉफी २ पातेल्यात चढवतो (वरून ओततो ...) जरा छान फेस झालं कि २ मोठ्या मग्स मध्ये भरून कलत्रासहा पितो ... कधी फारच म्हणजे अर्ल ग्रे च्या २ कॉफी bags फक्त २-३ वेळा बुडवून काढतो (एकूण डुबकी चा वेळ ५-६ सेकंद इतकाच)... फारच मस्त लागते ... आता तुम्ही सांगा ...

वाचन 13022 प्रतिक्रिया 0