Skip to main content

सेकंड होम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 14/08/2014 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
तुला शहरात घर आहे मोक्याच्या ठिकाणी बेसिन बाथरुम मधे नळ सोडला कि धो धो पाणी २४ तास.. तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे.

मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 14/08/2014 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सद्या मिपावर या धाग्यावर जाडे-बारीक मिठ, त्याची चव आणि त्यातले आयोडीन यावर चविष्ट चर्चा चालू आहे. त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले आणि प्रतिसाद लिहू लागलो. मात्र प्रतिसादाच्या अखेरीस येईपर्यंत माझ्या प्रतिसादाने पाककलेच्या अंगाने जाणार्‍या सुंदर धाग्याला शास्त्रिय अवांतर होईल असे वाटले. शिवाय प्रतिसादही जरा मोठा होतो आहे असे वाटले. म्हणून मूळ धाग्याची चव बदलून त्याला हायजॅक करण्यापेक्षा नविन धागा बनवून सादर करणे जास्त योग्य वाटले.

पेरू : भाग २ : पराकास समुद्री अभयारण्य

लेखक समर्पक यांनी गुरुवार, 14/08/2014 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात सुरुवातीला एकल प्रवासाविषयी थोडे... सर्वात मोठा आणि महत्वाचा फ़ायदा म्हणजे कोणावरही अवलंबित्व नाही, स्वतः सगळा आराखडा बनवा आणि तंतोतंत पालन करा. शिवाय स्वतःला ज्याची आवड आहे त्यासाठी जास्त वेळ देता येतो. एक तोटा (किंवा फ़ायदा) म्हणजे तुमच्या 'पराक्रमांचे' फ़क्त तुम्हीच साक्षीदार असता. ब-याच वेळा पुरातत्वीय महत्व असलेल्या ठिकाणी येण्यात फ़ार लोकांना रस नसतो, मग काय्, उचला बोचकं आणि चालू लागा. अजून कोणी एकल प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक टिप, शक्य असल्यास एखाद्या मध्यमवर्गीय स्थानिकाच्या घरी निवास करावा.

एक जुनी आठवण.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 14/08/2014 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुनी आठवण. ब्रिटिश माणसाच्या रक्तात वक्तशीर पणा भिनलेला आहे ७१-७२ साल असेल..नोकरीला लागून १.१/२ वर्ष झाले असेल.. कंपनी नवा प्रॉडक्ट तयार करणार होती..त्या साठी इंग्लंडला जाण्या साठी माझी निवड झाली त्या काळात परदेशगमन म्हणजे अप्रूप असायचे.. माझी पाहिलीच खेप(वेळ)..शिक्षण झाले अन लगेचच नोकरीला लागल्याने प्रवासाचा अनुभव नव्हता,, इंग्लंड तिथल्या लोकल्स ट्रेन बद्दल माहिती घेत होतो..त्या वेगवान असतात इत्यादी एक तर प्रॉडक्ट शिकून तो इथे तयार करून दाखवणे याचा ताण होता. बाथ नावच्या गावात कारखाना होता,तिथे एका त्याच कंपनीतल्या एकाच्या परिवारात राहण्याची सोय झाली होती.. ट्रेनिंग सुरू झाले..व त्याचाच एक

जाडे मीठ.

लेखक अनिता ठाकूर यांनी गुरुवार, 14/08/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्‍याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही.

जडण-घडण 9

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 14/08/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ठरल्या वेळेआधी पंधरा मिनिटं मी त्या कार्यालयात जाऊन पोहोचले. छोटंसं ऑफीस. जुजबी माहिती विचारून, एका अर्जात माझे तपशील नोंदवल्यानंतर एकाने मला, आता कॉपी टेस्टला चला, असं सांगितलं. मी काहीशा उत्सुकतेने त्याच्या मागोमाग गेले. त्याने माझ्या हातात काही इंग्रजी शुभेच्छापत्रं ठेवली. कोरे कागद दिले. ही ग्रीटींग कार्ड मराठीत करा, असं सांगून मी आणखी काही विचारायच्या आत निघूनच गेला.

भारतीय स्वतंत्रता वाटचाल... एक शोध

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 14/08/2014 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा. मिळवले : १. तंत्रज्ञान प्रगती यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

चाटवाला आणि कावळा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/08/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तम नगर येथील भोलू चाटवाल्याची आलूची टिक्की फार प्रसिद्ध होती. बाजारात मिळणाऱ्या आलू टिक्कीपेक्षा दुप्पट आकाराची, आत मध्ये भरपूर पनीर, काजू, किसमिस, वाटणे आणि चण्याच्या मोकळी डाळ भरलेली. शिवाय सजावटी साठी वर चिंच खजूरची चटणी, हिरवी चटणी, गोड दही, अदरकचे लांब काप, डाळींबाचे दाणे व चाट मसाला. स्वाद ही अप्रतिम. आलू टिक्कीचा रेट ८०रु प्लेट असला तरी ही रोज सायंकाळी टिक्की खाण्यासाठी ग्राहकांची लाईन लागायची. काही दिवसांपासून एका कावळ्याने भोलू चाटवाल्याला हैराण-परेशान करून सोडले होते. हा कावळा दुकानात शिरून थेट ग्राहकांच्या प्लेट मधून टिक्की पळवायचा.

औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !

लेखक माहितगार यांनी बुधवार, 13/08/2014 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते.