Skip to main content

तिखट-मिठाच्या पुर्‍या ----

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 19/08/2014 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
तिखट-मिठाच्या पुर्‍या ---- साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार, हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी. कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या. गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 19/08/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.

एक फ़्रेंच कथेचा भावानुवाद :- बुल दे सुफ़.........

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी मंगळवार, 19/08/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कथेचे नाव आहे "बुल दे सुफ़" म्हणजेच इंग्रजीत "बटरबॉल" अन मायबोलीत बोलल्यास "चरबीचा गोळा". युद्धकालिन फ़्रेंच मध्यमवर्गावर प्रकाश टाकणारी ही कथा समाजवादासोबतच वर्गविग्रह इत्यादी तात्कालिन फ़्रेंच समाजातल्या प्रॉब्लेम्स वर प्रकाश टाकत एक मनुष्य स्वभावाचा मासला देखील ठरते........ लेखक :- हेन्री रेने गाय दे मोपासां....... मी मुळ संकल्पना अन ढाचा तोच ठेवायचा प्रयत्न करुन ह्या नितांत वास्तवदर्षी कथेची पुनर्निर्मिती करायचे धैर्य केले आहे...... जसं जमलंय घ्या गोड मानुन..... आज सकाळपासुनच रोवेन गावावर मळभ पसरल्यागत होत होतं...... इतकं की कसतरीच व्हाव......

कुकी कप

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 19/08/2014 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - २ १/४ कप बटर - १/२ कप साधी साखर - १/२ कप ब्राउन शुगर - १/२ कप अंडे - १ व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब चॉकलेट चिप्स - १/२ कप कुकिंग चॉकलेट - १/२ कप मिठ १ चिमटी बेकिंग ग्लास मोल्ड दुध कृती: १. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे. c1 २.

शेजारी

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 18/08/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
ंई आनी माझे शेजरी आमच चन्गल पतत . ़आल माझ्या मुलिच्चा वाध्दीवस होता आनि मी तील घेउन हौल् वर जतना शेजरच्या मुलिची आजी तिला ने म्हनत होति तर मी सान्गितली पाहुने आलेले आहेत तर तिला आता मी नेत नाही. झाले काल रत्री पासुन बोलने बन्द आनी पुर्न दुरलक्श्या आम्च्या आय करावे अशा लोकान्चेख्प्प्ळ खूप दीवसानी मरथी लिहिले आहे शू ले चूका आहेत तर माफी असावी

झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 18/08/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.

पेरू : भाग ४ : अरेकिपा शहर

लेखक समर्पक यांनी सोमवार, 18/08/2014 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात देशांतर्गत प्रवासाविषयी… प्रत्येक देशाची प्रवासाची साधने ही त्याची एक वेगळी ओळख असते. आता भारताचेच म्हणाल तर रेल्वे प्रवास ही एक ख़ासियत, अनेक प्रकारचे लोक पहावयास, अभ्यासावयास या प्रवासात मिळतात. हे लक्षात घेऊन विदेशातील प्रवासाचे आराखडे बनवावेत असे माझे मत आहे. मोठ्या शहरात मध्यवर्ती बाजारपेठेत वगैरे पाईच फिरणे मस्त, पण थोड्या अधिक अंतरासाठी कॅब न करता सार्वजनिक वहा़तूकसाधने उत्तम. एक तरी रात्रीचा प्रवास बसने करावा (सुरक्षित असल्यास, पण थोड़ा रिस्क तो बनता है।) आणि रेल्वे तर नक्कीच. तसेच, जलवहातुक असल्यास तीही अनुभवावी.

तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 18/08/2014 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट मी खुप आधी दुरदर्शनवर पाहिला होता एका पावसाळी शनिवारी, काल असाच एक शनिवार होता अन मुख्य म्हणजे मी बंगालात होतो, तेव्हा हा नितांतसुन्दर प्लॉट परत आठवला, मी हा प्रयत्न फ़क्त त्या कलाकृतीच्या आठवणी जागवायच्या म्हणुन करतोय, पात्रांची नावे, अभिनेत्यांची नावे, अगदी फ़िल्म चे नाव हि मला आठवत नाहिए पण कथा पुसटशी आठवते आहे, तिची मागे केलेल्या “बुल दे सुफ़” अन “ दगडाच्या सुप सारखी ही एक भावनिक पुनर्बांधणी, कशी वाटते नक्की सांगा” तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत पुर्व बंगालात “बिक्रमपुर” नावाचा जिल्हा आहे, आता तिथे बांग्लादेश आह

गोविंदा आहे.....म्हणूनच

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 18/08/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्ण आमचा देव आहे दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे आज तरुणाईला चेव आहे म्हणूनच आयोजकांचा धंदा आहे सामान्यांचा वांदा आहे वर चढणारा गोविंदा आहे म्हणूनच जोश थोडा मनात आहे उसन्या नशेची साथ आहे ही संस्कृतीवर मात आहे म्हणूनच टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे ट्रकमधून ओसंडते विकृती आहे ही मुळी न आपली संस्कृती आहे म्हणूनच डीजेचा ठणाणा आहे गोविंदांचा धिंगाणा आहे आयोजकांचा ताठ बाणा आहे म्हणूनच थरावर लावायचा थर आहे समोर पैशाचा डोंगर आहे वाट बघणारं घर आहे म्हणूनच ही आयोजकांची स्पर्धा आहे गोविंदांची त्रेधा आहे बघ्यांचा जीव अर्धा आहे म्हणूनच स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही नशा आहे आता, केवळ गोडी नाही काळजी
काव्यरस