Skip to main content

तिखट-मिठाच्या पुर्‍या ----

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 19/08/2014 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
तिखट-मिठाच्या पुर्‍या ---- साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार, हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी. कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या. गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात. प्रवासात नेण्यास उत्तम, पोटभरीचा खाऊ.

वाचने 8805
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

तिखटमिठाच्य उर्फ खार्‍या पुर्‍या माझ्या अत्यंत आवडीच्या. सोबत उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी (सहल प्रसिद्ध) असेल तर काय विचारायलाच नको. पाककृती आवडली. करून पाहिनच पण छायाचित्राने जरा निराशा केली.

In reply to by निवेदिता-ताई

छायाचित्र आकर्षक वाटले नाही. जरा 'आऊट ऑफ फोकस' वाटले. बाकी कांही नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

(संबंधितांनी हलकं घ्या.) काका काय काय करायचं माणसानं एकावेळी सांगा बघू? मी मी म्हणून करते, कुण्णाकुण्णाची मदत नाही.... सग्गळं एकटीनं करायचं. जरा काय फोटो आऊट ऑफ फोकस झालं तर टोचून बोलताय. :-/

फोटु बरोबरच काढला आहे. पण तो एक्स्ल्प्ररर्मध्ये ओपन झाल्याने असा कोपर्‍यात दिसतो आहे. असे वाटते

पुऱ्या टम्म फुगल्यात पण फोटो फोकस झालेला नाही .पुन्हा तळून /अपडेट करूनही .मोबाईल असेल तर वेगवेगळ्या अंतरावरून पेपराचा फोटो काढून ते फोटो मोठे करून पाहा .अक्षरे स्पष्ट दिसतील ते अंतर ठेवून नेहमी फोटो काढा .याला कैमऱ्याचे 'मिनीमम फोकसिंग डिस्टन्स' महणतात .

माझा अत्यंत आवडीचा पदार्थ. पण काय करणार सध्या सौ.च्या निगराणीत असल्या मुळे तेल / तूप वर्ज्य. तूर्त काही महिने तरी तेल/ तुपात तळलेल्या पदार्थांचे नाव ही घेता येणार नाही. काय अवस्था झाली पहाच... चाटवाला आणि कावळा

In reply to by निवेदिता-ताई

धन्यवाद. राग मानू नये. तुमच्याच पाककृती अधिक आकर्षक दिसतील असं वाटल्याने टिप्पणी केली आहे.

बाय डिफॉल्ट ताई, पुर्‍या आवडल्या बरं का... जरा फोटु मस्त टाकण्यात पण पटाईत व्हा की.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis