Skip to main content

एकच तर जिंदगी हि...

लेखक मर्फी यांनी सोमवार, 25/08/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
एकच तर जिंदगी हि बालपण मार खाण्यात गेल जवानी अभ्यास करण्यात अभ्यास करण्याच्या वयात प्रेम केलं आन आयुष्य घातलं खड्ड्यात म्हणतात आपलं भविष्य आपण ठरवतो पण हे कोण सांगणार त्या गरीब मुलाला कि त्यावर ९५ टक्के प्रभाव घरात्ल्यांचाच असतो स्वप्न बघायला मन उघडं असते पण हे पण ऐका लोक्कांनो त्या पक्षीच्या शेपटीला एक दोरी पण बांधलेली असते आकाशाला जरी सीमा नसली तरी आता तुमच्या स्वप्नांना सीमा असते मजा करण्याचा वय त्या मुलाचं डिप्रेशन मध्ये अडकला सगळ्या चिंता विसरण्याचा सोडून प्रेयसीच्या रुसव्या-फुग्व्यान मध्ये लटकला हे म्हणजे आधीचा मर्कट त्यावर मद्यप्याला रस हळू हळू उडत जाई जीवनाचा इतक्या डिप्रेशन मध्ये पाहून सोडून गेली कि हो ती त्याला प्रेयसी गेली सोडून घरातल्यांशी तो भांडला मित्र मात्र अजूनही होते पण ह्याने आत्महत्येचा पर्याय निवडला

गुंफता कवन हे

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 25/08/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे. गुंफता कवन हे उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल. याकरिता, दोन काफ़िये दिले जात आहेत.

तवा पुलाव

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 25/08/2014 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
Final 1 तवा पुलाव....पावभाजीच्या गाडिवर मिळणारा अजुन एक झटपट आणि चविष्ट पदार्थ. त्या भल्या मोठ्या तव्यावर पसरलेल्या भाजीमधलीच थोडि भाजी परत बटरवर परतुन त्यात शीजवलेला मोकळा भात मिक्स केला कि झाला तवा पुलाव!!! ठण! ठण!! ठण!!! करीत मोठ्या कावीलथ्याने पुलाव तव्याच्या कडेवर आणतात आणि पटकन सार्विंग डिश मधे भरुन देतात. सोबत लिंबाची फोड आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा.

मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/08/2014 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती). (१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का? (२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात.

मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 25/08/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते. पूर्वी हे नव्हते. एखाद्याने प्राचीन काळी एखाद्या विषयावर जे लिहीले होते तेच त्याचे/तिचे सार्वकालिक मत आहे असे गृहीत धरून चालत असे. त्यामुळे त्याच्या/तिच्या इतर विषयांवरच्या इतर मुद्द्यांना प्रतिक्रिया म्हणून ते पूर्वग्रह पुढे आणता येत असत. पण आता असे करणे अवघड होऊ लागले आहे.

थोडे अद्भुत थोडे गूढ - १

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 25/08/2014 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता! तिचं एका दुसर्‍या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्‍या वार्‍याचा देव म्हणून ओळखला जात होता! आपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा तिने व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी तिला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली.

क्रिम पफ Swans

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 24/08/2014 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य Choux पेस्ट्रीसाठी: १/२ वाटी मैदा १/२ वाटी पाणी १/४ वाटी अनसॉल्टेड बटर २ अंडी १/४ टीस्पून मीठ १/२ टीस्पून साखर (ऑपश्नल) . पाकृ: एका नॉन-स्टीक पॅनमध्ये पाणी.

कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)

लेखक शरद यांनी रविवार, 24/08/2014 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर) संत साहित्याशी आवड तशी जरा लवकरच लागली म्हणावयास हरकत नाही. कॉलेजात असतांना एक मित्र गुणगुणत होता "उड उड रे काऊ. तुझे सोन्याने मढवीन पाऊ " मी खुश होऊन विचारले ’कोण कवी रे ?" तो म्हणाला "ज्ञानेश्वर" मी म्ह्टले " काय थापा मारतोस ! संत असे कधी लिहितील काय ?" तो म्हणाला, "खरेच ". मी लायब्ररीत जाऊन कविता (हो, कविताच, अभंग नाही ) शोधून काढली व असा प्रथम वाचनातच प्रेमात पडलो. तो पर्यंत वसंत बापट. मंगेश व विंदा, बोरकर यांच्याबरोबर म.वा. धोंड (मराथी लावंणी) हेच आमच्या वाचनात व पाठांतरात होते.

माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 24/08/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. सध्या तो जागेच्या शोधात आहे. आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम. बादवे, जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम. आणि इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम. कळावे लोभ आहेच, तो वाढावा... मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)